किराणा दुकानदारांसाठी शॉपमॅटिकचा पुढाकार
किराणा
दुकानदारांसाठी शॉपमॅटिकचा पुढाकार
~
ऑनलाईन व्यवहार करण्याकरिता बनविणार सक्षम ~
मुंबई,
२८ मे २०२०: लॉकडाउनमुळे देशभरातील स्थानिक किराणा
दुकानांच्या दैनंदिन कामावर परिणाम झालेला आहे. स्थानिक किराणा दुकानांना ऑनलाईन विक्री
करण्याकरिता सक्षम बनविण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय ईकॉमर्स कंपनी शॉपमॅटिकने
आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करताना ग्रॉसरी वेब स्टोअरची सुरुवात केली आहे. किराणा
व्यावसायिकांना अशी एक्सक्लुझिव्ह सुविधा देणारी शॉपमॅटिक ही पहिली ई कॉमर्स कंपनी
बनली आहे.
या नुकत्याच लाँच झालेल्या
सुविधेनुसार शॉपमॅटिक स्थानिक दुकान मालकांना तांत्रिक किंवा कोडिंग अनुभव नसतानाही
त्यांची वेब दुकाने सुरू करण्यासाठी मदत करेल. या अंतर्गत असंख्य याद्या असलेले प्री
बिल्ट कॅटलॉग्स, सुलभ यादी व्यवस्थापन, सुरक्षित आणि त्वरित ऑनलाइन पेमेंट्स आणि काळाची
गरज लक्षात घेऊन संपर्करहित डिलिव्हरी, सेल्फ-पिकअप आदी यशस्वी ऑनलाइन ग्रॉसरी स्टोअरच्या
सर्व वैशिष्ट्यांचा समावेश असेल.
शॉपमॅटिकचे
सह संस्थापक व सीईओ अनुराग अवुला म्हणाले, 'कोव्हिड-१९
च्या महामारीमुळे डिजिटल विक्री प्रासंगिक आणि गरजेची झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्व
लहान व्यवसायांना विशेषत: किराणा दुकानदारांना कोव्हिडच्या काळात प्रासंगिक राहत स्वत:चे
ऑनलाइन अस्तित्व निर्माण करण्यासाठी मदत करत आहोत. कोव्हिडदरम्यान फक्त किराणा दुकानदारांसाठी
सुरु केलेल्या या सुविधेबद्दल आम्ही खूप उत्साही आहोत. ग्रॉसरी किंवा किराणा दुकान
मालक आता शॉपमॅटिक मंचाचा वापर करून त्यांचे ऑनलाइन स्टोअर सुरु करू शकतात. यात प्री
बिल्ड कॅटलॉग्स असून यामुळे त्यांचा भरपूर वेळ आणि ऑनलाइन जाण्याच्या प्रयत्नांची बचत
होऊ शकते.'
Comments
Post a Comment