प्रतिलेखः कलर्स वरील बीआर चोप्रांच्या महाभारतामधील कर्णाची भूमिका करणारे पंकज धीर
प्रतिलेखः कलर्स वरील बीआर चोप्रांच्या महाभारतामधील कर्णाची भूमिका करणारे
पंकज धीर
महाभारतात असे काय आहे की ते आज सुध्दा लोकप्रिय होत
आहे?
हा एक सुंदररित्या लिहिलेल्या
ग्रंथामधील एक ग्रंथ आहे. लोकांमध्ये 26 प्रकारची नाती असतात आणि महाभारतात मानवाला माहित असलेली
सर्व नाती हाताळली गेली आहेत. या ग्रंथाचा सर्वात चांगला भाग हा आहे की हा एकमेव
ग्रंथ आहे जो तुम्हाला काय करू नका याची शिकवण देतो. महाभारताबाबत बोलायचे झाले तर
हे लक्षात घेतले पाहिजे की हा एक उत्कृष्ट संयोग आहे जो तयार केला गेला आहे.
मोठ्या मनाच्या लोकांचा हा एक मेळा आहे. पंडित नरेंद्र शर्मा सारखे चांगले लेखक,
राही मासूम रझा यांच्या सोबतीने आम्हाला लाभले होते व त्यांच्या सोबत होते बीआर
चोप्रा आणि रवि चोप्रा. यातील कलाकार सुध्दा विस्मयकारक होते. ते अतिशय विलक्षण
होते. तुम्ही दुसऱ्या शकुनीची, भीष्माची किंवा कृष्णाची किंवा दुर्योधनाची कल्पनाच
करू शकत नाही. आजसुध्दा तुम्ही जेव्हा कलर्स वर महाभारत पाहता तेव्हा त्यावेळी
लागू असणाऱ्या गोष्टी आज सुध्दा लागू होत आहेत. महाभारत हा असा शो आहे जो
सगळ्याच्या पलीकडे गेला होता.
कर्णाची तुम्ही साकारलेली
भूमिका सुध्दा वाखाणली गेली होती. तुम्ही या पात्रावर कसे काम केले?
आपल्याकडे कर्णाचा काहीही
उल्लेख नाही. महाभारतावर बनवला गेलेला एक 2 तासांचा एक सिनेमा फक्त होता आणि त्यात कर्णाची भूमिका करणारा
अभिनेता खूप अयोग्य होता. त्यामुळे, कर्ण कसा चालत असे, बोलत असे किंवा बसत असे,
यातील काहीच आम्हाला माहित नव्हते? मग अशा स्थितीत तो काय करत असे? त्यामुळे, माझी
बुध्दी चालवून मी एक अभिनेत्याच्या नात्याने हे सर्व शोधून काढले होते. माझ्या जवळपास
दोन मोठी नाट्यमय पात्रे आहेत हे मी विसरलो नव्हतो, दुर्योधन, आणि शकुनी. त्या
दोघांमध्ये मी कर्ण अतिरंजित रंगवला असता तर वेगळा दिसलो असतो. मी ती भूमिका खूप
संयतपणे साकारली आणि त्याच मला फायदा झाला. लोकांनी त्यासाठी माझ्यावर प्रेम केले.
त्यामुळे मला सहानुभूती मिळाली. त्याचप्रमाणे, कलाकारांमध्ये अनेक अभिनेते होते,
जेव्हा तुम्ही एखादा सीन करायचा असे किंवा क्षण असे, तुम्हाला स्वतःला सादर करावे
लागे. महाभारताच्या सेटवर प्रचंड प्रमाणात निरोगी स्पर्धा असे. तसेच, प्रत्येक
गोष्ट आमच्या विरुध्द असे. आमच्याकडे डिजीटल कॅमेरे नव्हते. स्पेशल इफेक्ट किंवा
ग्राफिक्स नव्हते. कोणतीही आधुनिक उपकरणे नव्हती. या सर्व गोष्टींनी शो खूप सुंदर,
आकर्षक आणि प्रचंड बनतो, बाहुबली सारखा. त्यामुळे, या सर्वांशिवाय, साध्या व्हिडिओ
कॅमेऱ्याने, आम्ही चाचणी व दुरूस्त करा पध्दतीने चित्रीकरण केले होते. महाभारत
बनवण्यातील सर्व गोष्टींची माहिती हे देते.
कर्ण साकारत असताना तुम्हाला
कोणत्या प्रकारचे कौतुक अनुभवता आले?
लोकांनी माझ्यावर प्रेम केले
आणि अनेक वर्षे माझा आदर करत आले आहेत. मी त्या भूमिकेला योग्य असल्याचेच ते
दर्शवते. शाळेतील इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सुध्दा कर्णाचा संदर्भ येतो तेथे
माझेच चित्र छापलेले आहे. तेव्हा, जोपर्यंत शाळेतील पुस्तके छापली जातील तोपर्यंत
मी नेहमीच कर्ण म्हणूनच त्यांच्या मनात राहीन. माझी दोन मंदिरे उभारण्यात आली आहेत
आणि तेथे दररोज पूजा केली जाते. कर्ण मंदिरात माझीच पूजा केली जाते. मी त्या
मंदिरात गेलो आहे. एक कर्नल येथे आहे आणि दुसरे बस्तर मध्ये आहे. तेथे माझा आठ फूट
उंचीचा पुतळा आहे, आणि लोक तेथे माझी पूजा करतात. मी जेव्हा तेथे गेलो तेव्हा
लोकांनी माझ्यावर मनापासून प्रेम केले. त्यातून असे दिसते की त्यांनी मला
कर्णाच्या रुपात स्वीकारले आहे. त्यामुळे ते पात्र पुन्हा साकारणे इतरांसाठी अवघड
झाले. महाभारताच्या इतर आवृत्तीत मला इतर पात्रांच्या भूमिका ऑफर केल्या गेल्या
होत्या पण मी त्या नाकारल्या. मी कर्णाची भूमिका साकारली आणि माझ्यासाठी तेवढेच
पुरेसे आहे. हा पैशांचा प्रश्न नाही. मी पैसे कमावू शकतो इतर मार्गांनी. पण मी
माझ्या चाहत्यांना गोधळात टाकू इच्छित नाही. माझ्या चाहत्यांसाठी ते न्याय्य झाले
नसते.
महाभारताच्या काही आठवणी
तुम्हाला आठवतात का?
समयचे (हरिश भिमानी) पात्र
निर्माण कसे केले हे जाणणे रोमांचक आहे. याची जबाबदारी डॉ. राही मासूम रझांनी
घेतली होती. सुरूवातीला, इतर अनेक अभिनेत्यांचा विचार निवेदक म्हणून करण्यात आला
होता, पण निवेदक भौतिक स्वरुपात असावा की नाही हे निर्माते ठरवू शकत नव्हते.
त्यामुळे समयची किंवा काळाची निवेदक म्हणून कल्पना जेव्हा राही साहेबांनी मांडली
तेव्हा ते ट्रंप कार्ड बनले. ही साधी पण उत्कृष्ट कल्पना होती. हा आर्किमिडीजच्या
युरेका क्षणासारखा क्षण होता तो. ही अगदी साधी कल्पना होती पण ती चालली. काळाच्या
भूमिकेसाठी एका विलक्षण आवाजाची योजना करणे ही चमकदार चाल होती.
महाभारत पहा सोमवार ते
रविवार संध्याकाळी 7 ते
रात्री 9 पर्यंत फक्त कलर्स वर
Comments
Post a Comment