कलर्स वरील महाभारतातील द्रौपदीची भूमिका करणाऱ्या रुपा गांगुली
प्रतिलेखः कलर्स वरील महाभारतातील द्रौपदीची भूमिका करणाऱ्या रुपा गांगुली
तुम्हाला गायनाचे राष्ट्रीय
पारितोषिक मिळाले आहे आणि महाभारतात सुध्दा तुम्ही एक गाणे गायले आहे. हा अनुभव
कसा होता?
मी महाभारतात नयनों के नावाचे
गाणे गायले होते आणि तो अनुभव खूप सुंदर होता. माझ्यावर चित्रीत करण्यात आलेले ते
गाणे गाण्यासाठी निर्मात्यांनी दुसऱ्या कोणाला घेतले असते तर काय झाले असते. रवि
सरांनी अचानक मला विचारले, तू एक गाणे गाणार का?’ मी त्यासाठी तयार होते आणि मी त्याचा जास्त विचार
केला नाही कारण मी लहानपणापासून गात आले होते. मीजेव्हा कबूल झाले तेव्हा मी रवि
सरांना सांगीतले होते की पहिल्या प्रयत्नात मी जर यशस्वी झाले नाही तर त्यांनी
त्यासाठी व्यावसायिक गायिकेला घेतले तरी मला चालेल. सुदैवाने मी ते गाणे पहिल्याच
प्रयत्नात गायले आणि सर्वांना ते आवडले. ते अतिशय सुंदर गाणे होते. आज सुध्दा
इतक्या वर्षांनंतर मी ते गाणे ऐकले की मला आनंद होतो की मी त्याला आवाज द्यायला कबुली
दिली.
महाभारत कलर्स वर परत आले
आहे. तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
माझ्या पिढीच्या अनेक लोकांना
महाभारत पहायचे होते. मला खात्री आहे की तरुण पिढीने सुध्दा या शो विषयीच्या
गोष्टी त्यांच्या आईवडिलांकडून किंवा आजीआजोबांकडून ऐकलेल्या असतील. आता कलर्स सारख्या
चॅनेलने ही कथा समाजाला पुन्हा निवेदित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे हा
शो बघण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला आता कलर्स वर हा शो पाहता येणार आहे.
महाभारताने भारतीय प्रेक्षकांवर
प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम केला आहे हे तुम्हाला जाणवले आहे का?
आम्हाला खूप कठोर परिश्रम
करावे लागले होते आणि आम्हाला आत्मविश्वास होता की लोकांना हा शो आवडेल. पण
लोकांवर त्याने केलेल्या परिणामाची कल्पना आम्हाला हळुहळु आली. आम्हाला बातमी
कळाली की ज्या स्टेशनवर टेलिव्हिजन आहे तेथे रेल्वे थांबत असे त्यामुळे लोकांना
महाभारत पहायला मिळत असे. त्यावेळी, शोच्या चित्रीकरणात आम्ही खूप गुंतलेलो होतो,
त्यामुळे आम्हाला हा शो इतका गाजत असेल याची कल्पनाच नव्हती. त्या वेळी मला तो शो
पूर्णपणे पाहताही आला नव्हता. मी आता हा शो कलर्स वर नीट पहात आहे आणि त्यात खूप
फ्लॅशबॅक आहेत, त्या सीनच्या चित्रीकरणाच्या अनेक आठवणी आहेत.
महाभारतात तुम्ही द्रौपदीची
भूमिका केली होती. त्यावेळच्या तुमच्या काय आठवणी आहेत?
द्रौपदी साकारताना मला खूप
छान वाटत होते. ते माझ्यासाठी एक आव्हानच होते कारण मला हिंदी चांगली बोलता येत
नव्हती, त्यामुळे मला दुप्पट मेहनत घ्यावी लागली होती. एक आठवण अशी आहे की सेटवर
येणारी मी पहिली होते त्या काळात. वेळापत्रक खूप काटेकोर असायचे आणि आम्हाला
सर्वांना वेळेवर यावे लागायचे. रविजी खूप सह्द्य होते पण ते सुध्दा आम्ही सेटवर
शिस्तीने वागतोय इकडे लक्ष देत असत. आणि मला काहीच समस्या नव्हती मी सकाळी ७च्या
डेडलाइनच्या आधीच सेटवर पोचले होते. मी पहाटे 5 वाजता सेटवर पोचले होते!
आपण सर्वजण क्वारंटाईन झालो
आहोत. तुम्ही तुमचा दिवस कसा घालवता?
लॉकडाऊनच्या काळात माझ्या
आरामाचा भाग म्हणून, मी घरातील कामे करते आहे. बालपणापासून, मला घरातील कामे
करायला आवडते. या काळात, मी घरातील प्रत्येक गोष्ट व कानाकोपरा नीट साफ करते आहे.
मी ज्याच्यावर लक्ष ठेवते अशी ती गोष्ट आहे. मला माझ्या डॉक्टर मित्रांनी बनविलेले
सॅनिटायझर मी घेतले आहेत आणि मी ते लोकांना वाटले आहेत.
पहा महाभारत दररोज
संध्याकाळी 7
वाजल्या पासून, फक्त कलर्स वर
Comments
Post a Comment