साथीच्या आजाराचा धोका वाढल्याने सोन्याचे दर वाढले
साथीच्या आजाराचा धोका वाढल्याने सोन्याचे दर वाढले
मुंबई, ३० जून २०२०: अर्थव्यवस्थेत मंदी येऊ नये याची काळजी घेतानाच कोरोनाच्या रुग्णांमधील वाढ कशी नियंत्रणात येईल, हे जागतिक स्तरावरील सरकारांचे एकमेव उद्दिष्ट आहे. जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांसमोर कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेची भीती कायम आहे. सोन्याच्या किंमतींवरही याचा परिणाम होत असून सोमवारी स्पॉट गोल्डचे दर ०.०५ टक्के असे काही प्रमाणात वाढून १७७१.५ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. विषाणूभोवतीचा तणाव वाढत असल्याने सामान्य स्थितीत परतण्याच्या आशा खालावत आहेत. यामुळे सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याचे दर वाढले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
शून्याजवळ फिरणा-या व्याजदराव्यतिरिक्त मध्यवर्ती बँकांनी व्यवहार्य आणि प्रत्यक्ष प्रोत्साहनपर पॅकेज जाहीर केल्यामुळे पिवळ्या धातूचे दर वाढण्यास मदत झाली आहे. तसेच अमेरिकी डॉलरचे मूल्य वाढल्याने इतर चलनधारकांना सोने महाग होते व यामुळे त्याच्या आणखी दरवाढीवर मर्यादा येतात.
स्पॉट सिल्व्हरचे दर ०.६२ टक्क्यांनी वाढून ते १७.९ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. एमसीएक्सवरील दर ०.५० टक्क्यांनी घसरून ते ४८१२३ रुपये प्रति किलोवर बंद झाले.
युरो झोनमध्ये बहुतांशी सुधारणा दिसून आल्याने सोमवारी कच्च्या तेलाचे दर ३.१४ टक्क्यांनी वाढले. चीनने सकारात्मक व्यापारविषयक आकडेवारी जाहीर केल्याने कच्च्या तेलाचे दर वाढले. तसेच ओपेकने मे २०२० मध्ये ९० टक्के उत्पादन कपात केल्यानेही क्रूडचे दर मर्यादित राहिले. २०२० मधील पुढील
महिन्यांमध्येही तीव्र उत्पादन कपात करण्याचा निर्णय ओपेक देशांद्वारे घेतला जाईल. जगातील विविध भागातील उद्योग सुरू झाल्याने बेरोजगारीचा दर वेगाने कमी होत आहे.
सोमवारी, लंडन मेटल एक्सचेंज (एलएमई) बेस मेटलचे दर वाढले. कारण चीनमधील औद्योगिक कामकाज वाढल्याने मागणीलाही बळ मिळाल्याचे दिसून आले. शांघाय एक्सचेंजमधील औद्योगिक यादीची पातळी मोठ्या प्रमाणावर कमी झाली. त्यामुळे बेस मेटलच्या दरात काहीशी वाढ झाली.
एलएमई कॉपरचे दर सोमवारी ०.०८ टक्के अशा काहीशा प्रमाणात वाढून ५,९६१ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. कारण साथीसंबंधी अनिश्चितता वाढत असल्याने खाणी बंद पडतील व पुरवठ्यातही कपात होण्याची भीती आहे.
Comments
Post a Comment