युनियन बँकेने देशभरात १२५ प्रादेशिक कार्यालये सुरु करण्याची घोषणा केली

युनियन बँकेने देशभरात १२५ प्रादेशिक कार्यालये
सुरु करण्याची घोषणा केली

मुंबई, ३० जून २०२०:युनियन बँक ऑफ इंडियाने देशभरात १२५ प्रादेशिक कार्यालये सुरु करण्याची घोषणा केली आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि मुख्यकार्यकारी अधिकारी श्री राजकिरण राय जी म्हणाले, “याद्वारे आम्ही एकत्रिकरणाच्याप्रवासातील महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. संस्थात्मक दृष्टीकोनातून सर्व ३ बँका आताजवळजवळ पूर्णपणे एकिकृत झाल्या आहेत.”१एप्रिल २०२० रोजी आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये एकत्रिकरणझाले. त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाने संपूर्ण देशभरात ९५००+ शाखा आणि १३,५००+ एटीएमचेनेटवर्क विस्तारले. एकत्रिकरणानंतर युनियन बँक ऑफ इंडिया ही भारतातील पाचव्या क्रमांकाचीसर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक तसेच देशातील प्रत्येक राज्यात शाखा आसलेल्याचौथ्या क्रमांकाचे बँकिंग नेटवर्क आहे. एकत्रित संस्थांचे मध्यवर्ती कार्यालय (सीओ)हे त्याच्या पूर्वीच्याच मुंबईतील नरीमन पॉइंट येथील मुख्यालयात असेल. या मध्यवर्तीकार्यालयाला १८ विभागीय आणि १२५ प्रादेशिक कार्यालये सहाय्य करतील. १२५पैकी ३३ प्रादेशिक कार्यालये अमृतसर, आनंद, भागलपूर, अनंतपूर, राजामुंद्री, सिमला,अमरावती इत्यादी संपूर्णपणे नवीन ठिकाणी आहेत. नव्या कार्यलयांकडून तेलंगना, आंध्रप्रदेश,उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या पारंपरिक राज्यांतील बँकेचे कमांडींग मार्केटशेअर अधिक मजबूत करण्याची अपेक्षा आहे. एवढेच नव्हे तर गुवाहटी , सिलिगुडी, दुर्गपूरइत्यादीसारख्या प्रादेशिक कार्यालयांच्या अस्तित्वाद्वारे विशेषत: ईशान्य भारतासह संपूर्णदेशात आपले अस्तित्व विस्तारण्याचे उद्दिष्ट यामागे आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE