ओरिफ्लेमचे महिलांकरिता नवे उत्पादन
ओरिफ्लेमचे महिलांकरिता नवे उत्पादन
~ 'फेमिनेल' घेते महिलांच्या अंतर्गत स्वच्छतेची काळजी ~
मुंबई, ३० जून २०२०: स्त्रियांच्या विविध अंतर्गत काळजीच्या गरजा लक्षात घेता, थेट विक्री करणारा स्वीडिश अग्रगण्य ब्रँड असलेल्या ओरिफ्लेमने भारतीय महिलांकरिता 'फेमिनेल' ही कस्टमाइज्ड इंटिमेट केअर रेंज आणली आहे. याद्वारे अंतर्गत आरोग्य सौम्य व प्रभावीपणे सांभाळले जाते.
अद्वितीय अशा नैसर्गिक स्वीडिश अर्कांनी प्रभावित प्रत्येक सूत्र महिलांच्या प्रत्येक गरजांनुसार काळजीपूर्वक बनवण्यात आले आहे. लॅक्टीक अॅसिड आणणि इतर पीएच संतुलन राखण्यासाठी तसेच स्वच्छ आणि निरोगी अंतर्गत मायक्रो बायोमची हमी घेण्यासाठी लॅक्टिक अॅसिड आणि इतर प्रीबायोटिक घटक यात समाविष्ट करण्यात आले आहेत.
कस्टमाइज्ड इंटिमेट केअर रेंजमध्ये ३ प्रकार आहेत.- प्रोटेक्टिंग, रिफ्रेशिंग आणि सूदींग असे हे प्रकार असून ते विविध प्रकारच्या अंतर्गत काळजीच्या गरजांनुसार बनवले आहेत. प्रोटेक्टिंग इंटिमेट वॉशमध्ये कोरफड आणि कोरडेपणा, अस्वस्थता रोखणारी जीवनसत्वे आहेत. रिफ्रेशिंग इंटिमेट वॉशमध्ये त्वचा उत्साही ठेवण्यासाठी ब्लॅककरंट आणि कमळाच्या फुलाचा अंश, विशेषत: सक्रीय महिलांसाठी आहे. सुदिंग इंटिमेट वॉशमध्ये कोरफड आणि त्वचेतील दाह कमी करत ती शांत ठेवण्यासाठी मॅलोचा वापर करण्यात आला आहे.
ओरिफ्लेमची कस्टमाइज्ड फेमिनेल रेंज महिलांना योग्य वैयक्तिक स्वच्छता राखण्यास मदत करेल असा विश्वास ओरिफ्लेम साऊथ आशियाचे विभागीय मार्केटिंग वरिष्ठ संचालक श्री नवीन आनंद यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment