प्रुडंट इन्शुरन्स ब्रोकर आणि रिस्क अॅण्ड इन्शुरन्स मॅनेजमेंट सोसायटी यांच्यात भारतातील रिस्क मॅनेजमेंट समुदायाला पाठबळ देण्यासाठी धोरणात्मक भागीदारी

प्रुडंट इन्शुरन्स ब्रोकर आणि रिस्क अॅण्ड इन्शुरन्स मॅनेजमेंट सोसायटी यांच्यात भारतातील रिस्क मॅनेजमेंट समुदायाला पाठबळ देण्यासाठी धोरणात्मक भागीदारी

-      रिस्क मॅनेजमेंट शिक्षणसंशोधन आणि नेटवर्किंगसाठी बहूवार्षिक बांधिलकी

मुंबई (22 जून 2020) – प्रुडंट इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड (पीआयबीएलआणि रिस्क अॅण्ड इन्शुरन्स मॅनेजमेंट सोसायटी (RIMSयांनी भारतातील रिस्क मॅनेजमेंट समुदायाला पाठबळ देण्यासाठी आज बहूवार्षिक धोरणात्मक भागीदारीची घोषणा केलीभारतातील महात्कांक्षी उद्योजक समुदायाला रिस्क अॅण्ड इन्शुरन्स मॅनेजमेंटसंदर्भात विचारपूर्वक कंटेंट देऊ करण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे.

पीआयबीएल आणि आरआयएमएसतर्फे देशातील उद्योगांमधील महत्त्वाचे धोके तसेच संस्थात्मक विकासनाविन्यता आणि धोरणात्म निर्णयप्रक्रियेला पाठबळ देण्यासाठी रिस्क अॅण्ड इन्शुरन्स व्यवस्थापकांसाठीच्या संधी अशा विषयांवर वेबिनार्स आणि मास्टरक्लासेसची मालिका तातडीने सुरू करण्यात येणार आहेत्याचप्रमाणेया दोन संस्थांमार्फत बाजारपेठ पृथ्थकरणाचे अहवालव्हाईट पेपर्स प्रसिद्ध केले जातील आणि भविष्यात प्रत्यक्ष कार्यक्रमांसाठी सहकार्य केले जाईल.

"मागील दहा वर्षांत आम्ही वैचारिक नेतृत्वधोक्यांवर आधारित मार्गदर्शन आणि वैशिष्ट्यपूर्ण सेवेमुळे 250 दशलक्ष डॉलर्सहून अधिक प्रीमिअम गाठला आहे आणि ३० टक्क्यांहून अधिक सीएजीआर अशी प्रगती केली आहेपुढील टप्प्यातील धोरण म्हणून आरआयएमएससारख्या माननीय संस्थेसोबत भागीदारी करून आम्ही रिस्क अॅण्ड इन्शुन्स परिसंस्था एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे,असे प्रुडंट इन्शुरन्स ब्रोकर्सचे संचालक पवनजीत सिंग धिंगरा म्हणाले. "या क्षेत्रातील आघाडीचे आणि क्लायंटला केंद्रस्थानी ठेवणारे आमचे वितरण जाळे वापरून आरआयएमएस-प्रुडंट भागीदारीच्या माध्यामून विविध पर्याय देणे हे आमचे लक्ष्य आहे,असे ते पुढे म्हणाले.

"प्रुडंटकडे स्थापनेपपासूनच अमूल्य ज्ञान आणि तज्ज्ञता आहे आणि दर्जा आणि उत्कृष्टतेवर आम्ही भर देत असल्याने आमचे क्लाएंट आमच्यावर विश्वास टाकत असतातरिस्क मॅनेजमेंट व्यवसाय आणि या क्षेत्रासाठी आरआयएमएसने केलेल्या कामाचे आम्हाला नेहमीच कौतुक वाटले आहे आणि त्यांच्यासोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो,असे प्रुडंट इन्शुरन्स ब्रोकरचे व्यवस्थापकीय संचालक अजित सिंग धिंगरा म्हणाले.

शैक्षणिककंटेंट आणि इव्हेंट या पातळ्यांवर काम करण्यासोबतच आरआयएमएस आणि पीआयबीएल स्थानिक बाजारपेठेत आरआयएमएस-सीआरएमपी प्रमाणन आणण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न करणार आहेतआरआयएमएस-सीआयएमपी सर्टिफिकेशन  हा मान्यताप्राप्त ओळख असलेला हा जगातील एकमेव रिस्क मॅनेजमेंट प्रमाणन उपक्रम आहे( ISO/IEC 17024:2012 अंतर्गत ANSI).

"संवेदनक्षम राहण्यासाठी संस्थांनी सक्रिय असणे आणि आपल्या व्यवसाय आणि सामाजिक परिघात होणारे बदल तातडीने अंगिकारणे आवश्यक असते," असे आरआयएमएसच्या सीईओ मेरी रोथ म्हणाल्या. "रिस्क प्रोफेशनल्ससाठी शिक्षण आणि ज्ञानाचे आदानप्रदान हा बळकट रिस्क उपक्रम आणि निर्णयप्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहेभारतातील रिस्क मॅनेजमेंट समुदायाला सातत्याने पाठिंबा देत असल्याचा आरआयएमएसला अभिमान वाटतो आणि पीआयबीएलसोबत आम्ही विस्तृत शिक्षण अनुभव देऊ,असे त्या पुढे म्हणाल्या.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24