भारतीय विद्यार्थ्यांसाठी यूके एज्युकेशनची द्वारे खुली



भारतीय विद्यार्थ्यांसाठी यूके एज्युकेशनची द्वारे खुली

~ शिक्षणानंतर व्हिसा परत करण्याची घोषणा केली ~

मुंबई, १ जुलै २०२०: ब्रिटनमधील विद्यापीठ राज्य मंत्री मिशेल डोनलॅन एमपी, स्कॉटलँड, वेल्स, नॉदर्न आयर्लंडमधील शिक्षण मंत्री तसेच इंटरनॅशनल ट्रेड डिपार्टमेंटमधील एक्सपोर्ट्स मंत्र्यांनी भारतीय विद्यार्थ्यांसह आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना संबोधून एक खुले पत्र लिहिले आहे. यूके अजूनही शिक्षणासाठी स्वागतार्ह ठिकाण असल्याचे सुनिश्चित करण्यात आले असून शिक्षणानंतर व्हिसा परत करण्याची घोषणादेखील करण्यात आली आहे. या पात्रात व्हिसा, आरोग्य, विद्यापीठातील तयारी यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे तसेच जगभरातील बुद्धिमान विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची ब्रिटनमधील परंपरा अधोरेखित करण्यात आली असल्याचे स्टडी ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इमा लान्सकास्टर यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या 'हे व्यावहारिक बदल आणि उपक्रम अभ्यासाकरिता ब्रिटनकडे पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट संबोधित करणारे आहे. विशेषत: पोस्ट स्टडी वर्कमध्ये नुकतेच बदल केले असून ते आंतरराष्ट्रीय पदवीधरांसाठी आता दोन वर्षे लागू होतील. यात कोव्हिड-१९ मुळे ऑनलाइन अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यूके हे अजूनही विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता सर्वोत्कृष्ट ठिकाण असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न करण्यात येतील.

स्टडी ग्रुपचे युके व युरोपचे व्यवस्थापकीय संचालक आणि एक्सपोर्टिंग एज्युकेशन युकेचे अध्यक्ष जेम्स पिटमॅन यांनी सांगितले की 'कोव्हिड-१९ च्या समस्येत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना सकारात्मकता देण्यासाठी युकेची ही धोरणे महत्त्वाची ठरतील. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासाच्या पर्यायांचा विचार करता, एक मोठा कठीण काळा आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाला यूकेमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अगदी योग्य असल्याची खात्री होणे आवश्यक आहे. त्यांना मिळणा-या आधाराद्वारे गुंतवणूक सफल होईल. एकदा ते पदवीधर झाल्यानंतर त्यांना काही काळासाठी लवकरात लवकर करिअरच्या संधी मिळवून देण्यासाठीही योगदान लाभेल.'

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy