‘महिंद्रा’तर्फे ‘बीएस-6’ अनुपालन असलेली ‘मराझो’ सादर


महिंद्रातर्फे बीएस-6 अनुपालन असलेली मराझो सादर
नवीन स्वरुपाच्या मॉडेल्समुळे गुणवत्ता मूल्यांमध्ये वाढ
मुंबई, 28 ऑगस्ट2020 : 19.4 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या महिंद्रा समुहातील महिंद्रा अॅंड महिंद्रा लि.ने मराझो ही मल्टी-पर्पज वेहिकल गाडी बीएस-6’ तंत्रज्ञानासह सादर करीत असल्याची घोषणा आज केली. भारतातील सर्वात सुरक्षित एमपीव्ही असलेली मराझो’  आता बीएस-6 पॉवरट्रेनसह 11.25 लाख रुपये या प्रारंभिक किंमतीत उपलब्ध होईल.
नवीन प्रकारामध्ये ग्राहकांना अधिक मूल्य देण्याच्या हेतूने विविध पर्याय देण्यात आले आहेत. मराझो आता एम2’, ‘एम4+ आणि एम6+ या तीन रूपांमध्ये उपलब्ध असेल.
एम6+’ हे मॉडेल या ब्रँडमधील सर्वात अव्वल असणार आहे. 17 इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स’, ‘स्टीयरिंग-अ‍ॅडॉप्टिव्ह मार्गदर्शनानुसार रिअर पार्किंग कॅमेरा’, स्वयंचलित तापमान नियंत्रण आणि चालकाच्या बाजूला स्वयंचलित विंडो ही वैशिष्ट्ये यात आहेत. एम 6+सारख्या टॉप-एंड गाड्यांमध्ये अपेक्षित असतेत्याप्रमाणे 7 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि या उद्योगात प्रथमच सादर होणारे सराऊंड कूल तंत्रज्ञान या मॉडेलमध्ये आहे. हे सर्व 13.51 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
नवीन मिड-व्हेरिएंट एम4+’ हे मॉडेल आता 16 इंचाच्या अ‍लॉय व्हील्स व इतर आकर्षक वैशिष्ट्यांसह ग्राहकांना 12.37 लाख रुपयांना मिळू शकेल.
एमअँडएम लि.चे  ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीजय नाकरा या प्रसंगी म्हणाले, बीएस-6 अनुपालन असलेली क्लीनर-टेक्नॉलॉजी मराझो सादर करताना आम्ही आनंदित आहोत. अत्युत्कृष्ट अभियांत्रिकी असलेली मराझो प्रशस्तआरामदायीसुरक्षितएखाद्या कारसारखी स्मूथ राइड देणारीहाताळणीस सोपी आणि चालविण्याचा खर्च कमी असणारी आहे. नवीन एम4+’ व एम6+’ या गुणवत्तेचे अधिक मूल्य असणाऱ्या मॉडेल्समुळे मराझो ही तिच्या श्रेणीत सर्वात पसंतीची गाडी ठरेल, याची आम्हाला खात्री आहे.
मराझोबद्दल
·         ग्लोबल एनसीएपीतर्फे प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चार-तारांकित मानांकन मिळालेली मराझो ही भारतातील सर्वात सुरक्षित एमपीव्ही आहे.
·         मराझोतील पहिल्या व दुसऱ्या रांगेतील प्रवाशांना मिळते सर्वोत्कृष्ट शोल्डर रूम’, तसेच तिसऱ्या रांगेतील प्रवाशांना मिळते सर्वाधिक लेग रूम.
·         245 मिमी लांबीचे सर्वात मोठे सस्पेंशन असल्याने मराझोमध्ये खड्डे अजिबात जाणवत नाहीत व त्यामुळे एखाद्या कारसारखी स्मूथ राईड प्रवाशांना मिळते. तसेच तिची केबिन सर्वात शांत आणि लवकर थंड होणारी असल्याने प्रत्येक प्रवास आरामदायक होतो.
·         मराझोमधील फ्रंट व्हील ड्राईव्ह’, ‘इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंग आणि 5.25 मीटर शॉर्ट टर्निंग रेडियस यामुळे गर्दीच्या रस्त्यांवरही ती व्यवस्थित हाताळता येते.
·         मराझो बीएस-6मध्ये 5 वर्षांची / 1,00,000 कि.मी.ची स्टॅंडर्ड वॉरंटी मिळते. या श्रेणीत ती सर्वात चांगली मानली जाते. तसेचदेखभालीसाठी तिच्यावरील खर्च 58 पैसे / कि.मी. इतका कमी येतो.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.