आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) तर्फे पहिल्या-वहिल्या आकाश स्टुडंट एल्युमनी पोर्टलची सुरुवात


आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएलतर्फे पहिल्या-वहिल्या आकाश स्टुडंट एल्युमनी पोर्टलची सुरुवात
  • या पोर्टलच्या माध्यमातून आकाशच्या माजी विद्यार्थ्यांना संस्थाशिक्षक आणि त्यांच्या बॅचमेट्सच्या संपर्कात राहण्याची संधी प्राप्त होणार आहे. 
  • alumni.aakash.ac.in या संकेतस्थळावर जाऊन माजी विद्यार्थी नाव नोंदणी करू शकतात.    
मुंबईऑगस्ट 262020:  आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएलही परीक्षा पूर्व तयारी सेवेतील राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी संस्था आहे.  आकाश क्लासरुम प्रोग्रामच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना संस्थाशिक्षक आणि त्यांच्या बॅचमेट्सच्या संपर्कात राहता यावे हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून त्यांनी पहिले-वहिले आकाश स्टुडंट एल्युमनी पोर्टल सुरू केले आहे.
जगभरातील विविध ठिकाणांवरून एकमेकांशी संवाद साधण्यासाठीचा एक प्रभावी मार्ग म्हणून हे पोर्टल उपयोगी ठरेल.  या पोर्टलच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांना आकाश इन्स्टीटयूटबाबतच्या ताज्या बातम्या आणि घडामोडींविषयी माहिती तर मिळत राहीलच; याखेरीज शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या महत्त्वाच्या उपक्रमांबाबत ते स्वत:ला जागरूक ठेवू शकतील.  या पोर्टलमध्ये जॉब सर्च विंडोजसारखी काही वैशिष्ट्ये असतील.  एईएसएल टीमद्वारे संस्थेतील नोकरीच्या संधीची माहिती येथे देण्यात येईल आणि माजी विद्यार्थ्यांना संबंधित संधीचा शोध घेता येईल.  या पोर्टलवर एक असे वैशिष्ट्य आहे ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार ठिकाणपद इत्यादीची निवड करून त्यांच्या बॅचमेट्सचा शोध घेऊ शकतील.  माजी विद्यार्थ्यांना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी या पोर्टलची मदत होईल.   
नवीन विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास जागृत करण्यासाठी या मंचावर प्रोत्साहनात्मक यशोगाथा आणि आकाशच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट प्रगती या विषयांना महत्त्वाचे स्थान दिले जाईल.  आगामी काळात होणाऱ्या वेबीनार्स, कॉनक्लेव्ह्जचर्चासत्रे ची माहिती या पोर्टलवर आधीच अपलोड केली जाणार असल्याने विद्यार्थी ही माहिती त्यांच्या समवयस्कांना देऊ शकतील.  माजी विद्यार्थ्यांच्या भेटीगाठीमाजी विद्यार्थी वेबीनारमाजी विद्यार्थी पुरस्कार विविध प्रकारांचे आयोजन करण्यासाठी हे पोर्टल सक्षम असल्याने भविष्यात संस्थाशिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील सातत्यपूर्ण संपर्क शक्य होणार आहे. 
या पोर्टलच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आकाश एज्युकेशनल  सर्विसेस लिमिटेड (एईएसएल)चे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीआकाश चौधरी म्हणाले, “आकाश स्टुडंट एल्युमनी पोर्टलच्या माध्यमातून जगभरात आपल्या उज्ज्वल कारकिर्दीचा परंपरा सुरू ठेवणाऱ्या आमच्या अनेक माजी विद्यार्थ्यांशी नव्याने संपर्कात येण्याची संधी आम्हाला प्राप्त होणार आहे.  त्यांच्या यशोगाथा आम्हाला इतरांपर्यंत पोहोचवता येतील आणि नवीन विद्यार्थ्यांना त्यांच्या समृद्ध अनुभवातून खूप काही शिकून प्रेरणा घेता येईल.  विद्यार्थीसंस्था आणि शिक्षक यांचे नाते हे सर्वात जास्त विनयशील आणि निर्भेळ असते. हे नाते केवळ विद्यार्थीच घडवत नाही तर यातून संस्थेची प्रगतीही होत असते.  आकाश एल्युमनी पोर्टलच्या माध्यमातून आगामी काळात एक ठोस आकाश समुदाय निर्माण होईल.”  

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.