नोक्का रोबोटिक्सने हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस ‘नोकार्क एच२१० लाँच केले’

नोक्का रोबोटिक्सने हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस
‘नोकार्क एच२१० लाँच केले’
~ कोव्हिड-१९च्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी उपयुक्त ~


मुंबई, २६ ऑगस्ट २०२०: कोव्हिड-१९च्या रुग्णांची मदत करण्याकरिता पुणेस्थित कंपनी एसआयआयसी, आयआयटी कानपूरची इन्क्यूबेटी कंपनी नोक्का रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेड वैद्यकदृष्ट्या स्वीकारार्ह, प्रमाणित आणि उच्च गुणवत्तेचे क्रिटिकल केअर उपकरण सादर करत एक हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस लाँच केले आहे. हे अत्याधुनिक उपकरण कोव्हिड-१९ रुग्णांच्या उपचारात प्रभावी सिद्ध झाले असून रुग्णांच्या वापराकरिता सोपे आणि आरामदायी आहे. हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी इंट्युबेशनची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी करते.

नोकार्क एच२१० हे सध्याची साथ आणि कोव्हिड-१९च्या रुग्णांच्या वाढत्या प्रमाणामुळे देशभरात सध्या असलेल्या हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइसची प्रचंड गरज भागवते. एचएफओटी (हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस) नेजल कॅनुलाद्वारे रुग्णांना आर्द्रतायुक्त ऑक्सिजनची हवा देते, त्यामुळे रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपीमध्ये ओरल सक्शन देत कफ बाहेर काढणे सोपे होते. गरम आणि आर्द्रतायुक्त गॅस एपिथिलियल म्युको-सिलिअरीदेखील वाढवते, त्यामुळे श्वासासंबंधी समस्या उदा. न्युमोनिया आणि डेलिरियम यांचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. एचएफओटीमध्ये कॅनुलाचा वापर केल्यामुळे रुग्णाला आरोग्यसेवेतील व्यावसायिकांशी बोलणे सोपे जाते आणि इंट्युबेशनमुळे रुग्णाला होणा-या टॉमोफोबियाची जोखीमही कमी होते.

सर्वो ह्युमिडिफायरसह, नोकार्क एच२१० विशिष्ट नियंत्रित तापमान आणि आर्द्रतेच्या पातळीवर हवा प्रदान करते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मदतीने, नोकार्क एच२१०मध्ये सहज उपयोगासाठी ४.३ इंचाचे एक टच स्क्रीन इंटरफेस, उच्च आणि निम्न-दबावातील ऑक्सिजनसाठी इनपुट अशलेले इलेक्ट्रॉनिक एफआयओ२ कंट्रोल आणि एक टर्बाइनचे फ्लो जनरेटर आहे. या उत्पादनात सर्वसमावेशक हिटर आणि दोन तापमान सेंसर्सदेखील आहेत. या बहुगुणी उपकरणात एक ज्येष्ठ आणि पेडियाट्रिक मोडदेखील आहे. यामुळे आरोग्य सेवेतील व्यावसायिकांना वेग-वेगळ्या फ्लो रेटमध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ अशा दोघांवरही याचा वापर करण्याची मुभा मिळते.

सुविधा आणि वापर करण्यासाठी खबरदारीपूर्वक बनवण्यात आलेल्या नोकार्क एच२१० उपकरणात ट्युब ब्लॉकेज/ डिसकनेक्शन, तापमान सेंसर अनप्लग झाल्यास, हीटर वायर अनप्लग झाल्यास एवढेच नाही तर रुग्णांनाही खूप जास्त किंवा खूप कमी ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्यासही आरोग्यसेवा व्यावसायिकांना सतर्क करण्यासाठी विविध प्रकारचे अलार्म देण्यात आले आहेत.

नोक्का रोबोटिक्सचे सीईओ, निखिल कुरेले म्हणाले, “हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपीमध्ये अनेक फायदे मिळतात. उदा. ऑक्सिजन देण्याची स्थिती अधिक सुधारणे, इंट्युबेशन करण्याची गरज कमी करणे, आणि टोमोफोबिक अनुभव कमी करणे इत्यादी. यामुळे व्यक्तीला सहजपणे श्वास घेण्याची मदत मिळते. श्वास घेण्याची मेटॅबोलिक कॉस्ट कमी करण्यासाठी निर्माण केलेले नोकार्क एच२१० हे श्वासासंबंधी तीव्र आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांना जास्तीत जास्त आराम देते. सध्या दररोज कोव्हिड-१९च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे बाजारात एचएफएनसी उपकरणांची मागणी वाढत आहे. नोकार्क एच२१०चा सर्वांगिण सर्वो ह्युमिडिफायर हा उपकरणातील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे हवेचा पुरवठा उत्तम तापमान आणि आर्द्रतेच्या पातळीवर होईल, याची सुनिश्चिती होते. यामुळे एच२१० हे नियमित हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी उपकरणाच्या तुलनेत कार्यक्षमता आणि फायद्यांबाबत अधिक प्रगत सिद्ध होईल.”

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202