शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी

शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी
मुंबई, २७ ऑगस्ट २०२०: बेंचमार्क निर्देशांकांनी आज सलग पाचव्या दिवशी सकारात्मक व्यापार केला. निफ्टी ०.०८% किंवा ९.६५ अंकांनी वधारला आणि ११,५५९.२५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.१% किंवा ३९.५५ अंकांनी वाढला व ३९,११३.४७ अंकांवर स्थिरावला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की इंडसइंड बँक ( ६.५३%), टाटा मोटर्स (४.१३%), एमअँडएम (४.१८%), एसबीआय (२.९३%) आणि ग्रासीम (२.५२%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर ओएनजीसी (१.२९%), बजाज ऑटो (१.२७%), रिलायन्स इंडस्ट्रीज (१.३७%), झी एंटरटेनमेंट (१.१८%) आणि कोल इंडिया (०.९९%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. तेल व वायू, टेलिकॉम, युटिलिटीज आणि एफएमसीजी सेक्टर्सनी हिरव्या रंगात व्यापार केला. बीएसई मिडकॅप ०.०१% आणि बीएसई स्मॉलकॅप ०.३५% नी वाढले.
इंडसइंड बँक: ग्लोबल फायनान्शिअल फर्म युबीएसने विक्रीवरून विकत घेण्याकडे स्टॉक्सची रेटिंग अपग्रेड केली. त्यानंतर कंपनीचे शेअर्स ६.५३% नी वाढले व त्यांनी ६०४.७० रुपयांवर व्यापार केला.
रॅम्को सिस्टिम्स: एचडीएफसी म्युच्युअल फंडने कंपनीचे १.५७ लाख शेअर्स २४० रुपये प्रति शेअरमध्ये विकत घेतले. यासाठी कंपनीत ०.५१% स्टेक खरेदी केला. त्यानंतरर कंपनीचे स्टॉक्स ४.९९% नी वाढले व त्यांनी २५७.७५ रुपयांवर व्यापार केला.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स अँड भारत डायनॅमिक्स: भारत सरकारने वित्तीय वर्षातील दुस-या तिमाहीत ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत दोन्ही कंपन्यांतील स्टेक विक्रीची योजना जाहीर केली. त्यानंतर दोन्ही कंपन्यांचे शेअर्स घसरले. हिंदुस्तान एअरोनॉटिक्सच्या शेअर्समध्ये १४.२३% ची वृद्धी झाली व त्यांनी १,०१० रुपयांवर व्यापार केला. तर भारत डायनॅमिक्सचे शेअर्स ३.७९% नी घसरले व त्यांनी ४१३.२५ रुपयांवर व्यापार केला.
ब्लू स्टार लिमिटेड: कंपनीला इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल कामांसाठी १४९ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली. ही मुंबई मेट्रो लाइन ३ साठीची ऑर्डर आहे. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ८.९८% नी वाढले व त्यांनी ६७७.५० रुपयांवर व्यापार केला.
भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये खरेदी दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने उच्चांकी पातळी गाठत ७३.८१ रुपयांचे मूल्य कमावले.
जागतिक बाजारपेठ: कोव्हीड-१९ चा उद्रेक झाल्यामुळे गुंतवणुकादारांनी लार्ज कॅप मोमेंटम स्टॉकवर लक्ष केंद्रित केल्याने अमेरिकी शेअर्सनी उच्चांक गाठला. नॅसडॅकने १.७३% ची वृद्धी घेतली. तथापि एशियन आणि युरोपियन स्टॉकने लाल रंगात व्यापार केला. निक्केई २२५ चे शेअर्स ०.३५% नी घसरले. हँगसेंगचे शेअर्स ०.८३% नी घसरले. तर एफटीएसई १०० आणि एफटीएसई एमआयबीचे शेअर्स अनुक्रमे ०.२५% आणि ०.६३% नी घसरले.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.