टीसीएस आयओएनच्या इंटेलिजेमच्या तिसऱ्या आवृत्तीची घोषणा


टीसीएस आयओएनच्या इंटेलिजेमच्या तिसऱ्या आवृत्तीची घोषणा

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतून विद्यार्थ्यांना जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आवश्यक असणाऱ्या कौशल्यांनी सक्षम केले जाईल आणि कोविड-१९ नंतरच्या वास्तविक जगाला सामोरे जाण्यासाठी त्यांना तयार केले जाईल

मुंबई28 ऑगस्ट२०२०:  माहिती तंत्रज्ञान सेवासल्ला आणि व्यावसायिक सुविधा पुरवणारी जागतिक स्तरावरील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) (बीएसई: ५३२५४०एनसीई: टीसीएस) टीसीएस आयओएन इंटेलिजेम या स्पर्धेच्या तिसऱ्या आवृत्तीसाठी रजिस्ट्रेशन्स स्वीकारण्यास सुरुवात झाली असल्याची घोषणा केली आहे.  टीसीएस आयओएन इंटेलिजेम ही इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठीची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आहे.

टीसीएस आयओएन इंटेलिजेम ही आधीपासून डिझाईन करण्यात आलेलीपद्धतशीरपणे घेतली जाणारी परीक्षा आहे.  या स्पर्धेतून युवा विद्यार्थ्यांना जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करण्यात मदत मिळते.  स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली कौशल्ये पाच प्रमुख क्षेत्रांशी निगडित आहेत - सर्जनशीलता व नावीन्यसंभाषणआर्थिक साक्षरतासार्वत्रिक मूल्ये आणि जागतिक नागरिकत्व.

सध्याच्या कोविड-१९ जगात शिक्षण क्षेत्रात अतिशय वेगाने बदल घडून येत आहेत.  अनिश्चितताजटिल परिस्थितीजागतिकीकरण झालेल्या आणि सातत्याने बदलणाऱ्या डिजिटल जगामध्ये विद्यार्थ्यांना अधिक जास्त कौशल्येअधिक जास्त क्षमता आत्मसात करून स्वतःला सिद्ध करावे लागते आणि अधिक जास्त स्पर्धेला सामोरे जाणे देखील अपरिहार्य बनले आहे.  देशभरातील शाळा आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने टीसीएस आयओएनने इंटेलिजेमची निर्मिती केली.  एका अनोख्या स्पर्धेच्या स्वरूपात अशाप्रकारचा हा पहिलाच मेटा-अकॅडेमिक प्लॅटफॉर्म आहे.

या स्पर्धेमध्ये तीन पायऱ्या आहेतज्यामध्ये पात्रता फेरीचाही समावेश आहे.  घरी बसून ऑनलाईन परीक्षेमार्फत ही पात्रता फेरी पार करता येते.  त्यानंतर फिजिटल मोडमध्ये उपांत्य व महाअंतिम फेरी राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येते.  इंटेलिजेमच्या विजेत्यांना व अंतिम फेरीत पोहोचणाऱ्यांना आकर्षक रोख बक्षिसेअत्याधुनिक खेळणीट्रॉफीमेडल्सप्रमाणपत्रेपुस्तके व सब्स्क्रिप्शन्स यांनी गौरविले जाते.  त्याचबरोबरीने त्यांना लीडरशिप ट्रेनिंगमध्ये देखील सहभागी होण्याची संधी मिळते.  इंटेलिजेममध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या शाळांना स्कूल एक्सेलन्स अवॉर्ड्स तसेच राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवता येतो.

टीसीएस आयओएनचे ग्लोबल हेड श्री. वेन्गुस्वामी रामास्वामी यांनी सांगितले, "नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये व्यावहारिक कौशल्ये विकसित व्हावी आणि पाठांतरावर आधारित शिक्षण पद्धती बंद व्हावी  यादृष्टीने शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीसंस्था व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले आहे.  हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तसेच सध्याच्या जगातील गुंतागुंत लक्षात घेत टीसीएस आयओएनने इंटेलिजेमची रचना केलीजेणेकरून विद्यार्थ्यांना संपूर्ण जगभरात जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करता येतील."       

त्यांनी पुढे असेही सांगितले"आम्हाला याची जाणीव आहे की पूर्वी एकच करिअर केले जात असे पण त्याच्या उलट  आजच्या काळातील विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामेकरिअर्स करण्यासाठी उत्सुक असतात.  त्यामुळे या चाचणीमधून वैविध्यपूर्ण क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहेसध्याच्या किचकटजागतिकीकरण झालेल्या आणि वेगाने बदलत असलेल्या डिजिटल जगामध्ये स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी उच्च दर्जाची कौशल्ये आत्मसात करण्यात ही स्पर्धा विद्यार्थ्यांना मदत करते."

आकर्षक रोख बक्षिसे जिकंण्याबरोबरीनेच स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत आणि मजेशीर शिक्षण साहित्य देखील उपलब्ध करवून दिले जाते.  एकविसाव्या शतकात आवश्यक असणारी विविध कौशल्ये शिकवणारी डिजिटल बुकलेट्सवेबिनार्सपझल्सगेम्स आणि अशा अनेक रोचक व माहितीपूर्ण गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.  इंटेलिजेमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील दिग्गजांसोबत संवाद साधण्याची देखील संधी मिळेलयामुळे त्यांच्या ज्ञानमाहितीच्या कक्षा रुंदावण्यात मदत होईल.

स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्यांना इंटेलिजेम कोशंट रिपोर्ट दिला जाईल.  यामुळे आपले ज्ञानमाहितीएकविसाव्या शतकात आवश्यक असणारी कौशल्ये यांची पातळी किती आहे हे पारखता येईल.

टीसीएस आयओएन इंटेलिजेमच्या तिसऱ्या आवृत्तीसाठी देशभरातील शाळा नोंदणी करू शकतात.  ही नोंदणी प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२० रोजी समाप्त होईल.  अधिक माहितीसाठी आणि तुमच्या शाळेची नोंदणी करण्यासाठी कृपया येथे लॉग ऑन करा - http://intelligem.tcsion.com/ 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202