राष्‍ट्रीय क्रिडा दिनानिमित्त सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनने व्‍हर्च्‍युअल क्विझ स्‍पर्धेमध्‍ये गरीब पार्श्‍वभूमी असलेल्‍या ५०० हून अधिक मुलांना सामावून घेतले को

राष्‍ट्रीय क्रिडा दिनानिमित्त सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनने व्‍हर्च्‍युअल क्विझ स्‍पर्धेमध्‍ये गरीब पार्श्‍वभूमी असलेल्‍या ५०० हून अधिक मुलांना सामावून घेतले
कोविड-१९ महामारीदरम्‍यान आयोजित करण्‍यात आलेला व्‍हर्च्‍युअल कार्यक्रम भारताचे दिग्‍गज हॉकी खेळाडू ध्‍यानचंद आणि आंतरराष्‍ट्रीय व्‍हॉलिबॉल खेळाडू - स्‍वर्गीय श्री. जहांगीर शेख यांना मानवंदना
मुंबई, २९ ऑगस्‍ट २०२०: 'खेळाचा जादूगार' म्‍हणून ओळखले जाणारे भारताचे दिग्‍गज हॉकी खेळाडू ध्‍यानचंद १९३६ बर्लिन ऑलिम्पिक्‍समधील अंतिम सामन्‍यादरम्‍यान जर्मनीविरोधात नाट्यमय पुनरागमनासाठी ओळखले जातील. दरवर्षी या भारतीय दिग्‍गज खेळाडूचा जन्‍मदिवस 'ध्‍यानचंद जयंती' २९ ऑगस्‍ट भारतभरात 'राष्‍ट्रीय क्रिडा दिन' म्‍हणून साजरा केला जातो.
या दिवशी प्रत्‍येकामध्‍ये विशेष क्षमता असते आणि विषमतेवर मात करून यश मिळू शकते हे जगाला दाखवून देणा-या दिग्‍गज हॉकी खेळाडूला मानवंदना देत, तसेच आंतरराष्‍ट्रीय व्‍हॉलिबॉल खेळाडू स्‍वर्गीय श्री. जहांगीर शेख यांच्‍या स्‍मरणार्थ सलाम  बॉम्‍बे फाऊंडेशनने आर्य स्‍टुडिओ व पीईएफआय (फिजिकल एज्‍युकेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया) सोबत सहयोगाने मुंबईच्‍या महापालिका व अनुदानित शाळांमधील ५०० हून अधिक विद्यार्थ्‍यांसाठी व्‍हर्च्‍युअल स्‍पोर्टस् क्विझ स्‍पर्धेचे आयोजन केले. ही मॅरेथॉन ऑनलाइन क्विझ २८ व २९ ऑगस्‍ट २०२० या दोन दिवशी राबवण्‍यात आली.
सहभागी सर्व विद्यार्थ्‍यांना व्‍हॉट्सअॅपवर डिजिटल वेब लिंक शेअर करण्‍यात आली आणि त्‍यांना क्रिकेट, फूटबॉल, हॉकी व व्‍हॉलिबॉलशी संबंधित प्रश्‍न विचारण्‍यात आले. सहभागी विद्यार्थ्‍यांना ई-सर्टिफिकेट्स मिळाले आहेत आणि अव्‍वल १० विद्यार्थी - ५ मुली व ५ मुलांना त्‍यांच्‍या संबंधित खेळानुसार स्‍पोर्टस् किटसह सन्‍मानित करण्‍यात आले आहे. सर्व स्‍पोर्टस् किट्स स्‍वर्गीय श्री. जहांगीर शेख यांच्‍या कुटुंबाने दान केले आहेत.
याप्रसंगी बोलताना सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनचे उपाध्‍यक्ष श्री. गौरव अरोरा म्‍हणाले,''आम्‍हाला माहित आहे की, शिक्षणासोबतच क्रीडा व खेळाच्‍या माध्‍यमातून विद्यार्थी अन्‍वेषण करण्‍यास, नवीन शोध घेण्‍यास, निर्मिती करण्‍यास, सामाजिक कौशल्‍ये विकसित करण्‍यास, भावना व्‍यक्‍त करण्‍यास आणि आत्‍मविश्‍वास मिळवण्‍यास शिकतात. सध्‍या महामारीची स्थिती पाहता भौतिक संपर्क आव्‍हानात्‍मक बनले आहे. म्‍हणून आम्‍ही आमच्‍या विद्यार्थ्‍यांना मानसिकदृष्‍ट्या सक्रिय ठेवण्‍यासाठी आणि सध्‍याच्‍या आव्‍हानात्‍मक काळादरम्‍यान त्‍यांच्‍या नैतिकतेला चालना देण्‍यासाठी राष्‍ट्रीय क्रिडा दिनानिमित्त त्‍यांच्‍याशी व्‍हर्च्‍युअली संलग्‍न होण्‍याचे ठरवले. सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनमध्‍ये आमचा दृढ विश्‍वास आहे की, महामारीचा सामना करण्‍यासाठी शारीरिक फिटनेस आणि जीवन कौशल्‍यांच्‍या माध्‍यमातूनमानसिक शक्‍ती प्रबळ असणे हे सर्व विद्यार्थ्‍यांसाठी महत्त्वाचे आहे.''
मुंबईतील फिजिकल एज्‍युकेशन फाऊंडेशन ऑफ इंडियाचे सचिव डॉ. निसार हुस्‍सैन म्‍हणाले,''आमची सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनसोबत सहयोग जोडण्‍याची इच्‍छा राहिली आहे. आम्‍ही संसाधनांची कमतरता असलेल्‍या किशोरवयीनाच्‍या बाबतीत त्‍यांच्‍या कार्याचे कौतुक करतो. यंदा आम्‍हाला आनंद होत आहे की, आम्‍ही राष्‍ट्रीय क्रिडा दिनानिमित्त फाऊंडेशनच्‍या स्‍पोर्टस् अकॅडमीमधील विद्यार्थ्‍यांसाठी स्‍पोर्टस्क्विझ स्‍पर्धेचे आयोजन करू शकलो.''
सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनची स्‍पोर्टस् अकॅडमी परिवर्तनासाठी माध्‍यम म्‍हणून खेळाचा वापर करते. वर्षानुवर्षे फाऊंडेशनने किशोरवयीन मुलांना नेतृत्‍व, शिस्‍तबद्धता, सांघिक वृत्ती आणि ध्‍येयनिश्‍चत्ती शिकवण्‍यासाठी क्रिडा प्रशिक्षणाचा वापर केला आहे. अकॅडमीने माध्‍यमिक शाळेच्‍या विद्यार्थ्‍यांना क्रिडा शिष्‍यवृत्ती, विविध कंपन्‍यांमधील इंटर्नशिप्‍सच्‍या माध्‍यमातून आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धा, दर्जेदार शिक्षण दिले आहे. तसेच प्रशिक्षक,स्‍कोअरकिपर्स, पंच अशा अर्धवेळ रोजगारांच्‍या माध्‍यमातून शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्‍याची क्षमता दिली आहे. महामारीदरम्‍यान अकॅडमीने विद्यार्थ्‍यांना मानसिकदृष्‍ट्या व शारीरिकदृष्‍ट्या तंदुरूस्‍त ठेवण्‍यासाठी क्रिडा कौशल्‍यांसह फिटनेस व योगा सत्रे सादर केली आहेत. विद्यार्थ्‍यांची प्रगती जाणून घेण्‍याकरिता प्री- व पोस्‍ट- स्किल्‍स अॅण्‍ड फिटनेस मूल्‍यांकने देखील करण्‍यात येत आहेत.
पालक व विद्यार्थ्‍यांसोबत केलेल्‍या अंतर्गत सर्वेक्षणाच्‍या आधारावर सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनने यंदाचे शैक्षणिक वर्ष दोन विभागांमध्‍ये डिझाइन केले आहे - डिजिटल लर्निंग आणि ऑन-ग्राऊण्‍ड ट्रेनिंग. 'डिजिटल लर्निंग' मॉड्युलमध्‍ये ४० तासांच्‍या फूटबॉल, हॉकी व क्रिकेट सरावांचा समावेश असेल. 'ऑन-ग्राऊण्‍ड ट्रेनिंग' मॉड्युलमध्‍ये भारतीय क्रिडा प्राधिकरणाने जारी केलेल्‍या सोशल डिस्‍टन्सिंग नियमांचे पालन करण्‍यासंदर्भातील ३२ तासांच्‍या शिक्षणाचा समावेश असेल. मैदानी स्‍पर्धांना आता डिजिटल फिटनेस चॅलेंजमध्‍ये बदलण्‍यात आले आहे. योगा, शारीरिक फिटनेस, जीवन कौशल्‍ये, मूल्‍यांकन व अतिथी व्‍याख्‍याने यासारखी मुलभूत क्रिडा कौशल्‍ये वर्ष २०२०-२१ साठी फाऊंडेशनच्‍या स्‍पोर्टस् अकॅडमी येथील क्रिडा प्रशिक्षणाच्या मूलभूत गोष्‍टी आहेत.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.