मेडविन हेल्थकेअर’च्या वतीने देशातील करोना विषाणू प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी उत्तुंग झेप

मेडविन हेल्थकेअर’च्या वतीने देशातील करोना विषाणू प्रादुर्भावाला 
अटकाव करण्यासाठी उत्तुंग झेप  

~सादर आहे शायकोकॅन, युएसएफडीए आणि ईयू कन्फर्मीटे यूरोपीनेद्वारे 
मान्यता लाभलेले ‘मेड इन इंडिया उपकरण~ 

25 ऑगस्ट 2020, राष्ट्रीय: गरज ही शोधाची जननी आहे. कोविड-19 सारख्या महासाथीने भारताच्या जीव विज्ञान आणि जैविक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असलेल्या असंख्य क्षमतांना चालना दिली आहे. अचानक उदभवलेल्या या महासाथीने देशामधील कल्पक वातावरणाला नवसंजीवनी प्रदान केली. तसेच संशोधन आणि विकासाचा विस्तार होत आहे. सध्याच्या चिघळलेल्या स्थितीवर नियंत्रण आणण्याच्या दिशेने स्कलेन हायपरचार्ज करोना कॅनॉन (शायकोकॅन) हे एक वैज्ञानिक संधोधन ठरावे. हे अशाप्रकारचे एकमेव उपकरण असून त्यात करोना विषाणूचा प्रसार रोखण्याची क्षमता आहे. मेडविन हेल्थकेअर या कोलकाता स्थित कंपनीने आज जनतेसाठी शायकोकॅनचे अनावरण केले. ही कंपनी व्हर्च्युअल सत्रांच्या माध्यमातून आरोग्य निगा तसेच सोशल इंजिनिअरिंगसंबंधी अनेक प्रकल्प राबवत असते. मेडविन हेल्थकेअर ही इंटरनॅशनल ह्युमनिटेरियन अॅग्रीमेंट होल्डर असून ती भारतात तसेच दक्षिण आशियात शायकोकॅन’ची निर्मितीदार तसेच बाजार कामकाज सांभाळणारी कंपनी म्हणून कार्यरत आहे. डॉ. राजा विजय कुमार हे शायकोकॅनचे संस्थापक असून स्वत: सुप्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक आणि अध्यक्ष तसेच चीफ सायंटीफिक ऑफिसर आहेत व ऑर्गनायजेशन डे स्कलेन आणि स्कलेन सायबरनेटीक्स लिमिटेड, बंगळूरू’शी संलग्न आहेत. त्यांच्या सोबत मेडविन हेल्थकेअरचे सीईओ देबाशिस बोस आणि मेडविन हेल्थकेअरचे सीएफओ धृबज्योति बोस हे या व्हर्च्युअल लॉन्चप्रसंगी उपस्थित होते. उपकरणाच्या कामकाजाविषयीची माहिती देताना ऑर्गनायजेशन डे स्कलेन आणि स्कलेन सायबरनेटीक्स लिमिटेड, बंगळूरूशी संलग्न भारतीय वैज्ञानिक आणि अध्यक्ष व चीफ सायंटीफिक ऑफिसर डॉ. राजा विजय कुमार म्हणाले की, “करोना विषाणूमध्ये उपस्थित असलेले स्पाईक-प्रोटीन किंवा एस-प्रोटीनला तटस्थ करण्यासाठी शायकोकॅन 99.9% प्रभावी ठरले आहे. हे उपकरण प्राधान्याने फोटोन-मेडीयाटेड इलेक्ट्रोन एमीटर्स (पीएमईई’ज) चा निपटारा आमच्या तज्ज्ञांनी तयार केलेल्या तंत्राच्या मदतीने करते, उत्सर्जित झालेल्या फोटोनसाठी कायनेटीक उर्जेची आवश्यकता भासते. मोठी क्षमता असलेले फोटोन वेगाने एखाद्या पृष्ठभागावर पडल्यास कणरुपाने विषाणू फैलाव अवतीभवतीच्या वातावरणात करतात, इलेक्ट्रोन क्लाऊड सक्रीय पद्धतीने संक्रमित हवेचा तसेच करोना विषाणूजन्य पृष्ठभागाचा ताबा घेते. जर एखादी संक्रमित व्यक्ती खोलीत चालत आली असेल, तर शिंका किंवा खोकताना हवेतील एअरोझोलमध्ये पसरलेल्या विषाणूंना इलेक्ट्रोन्स नियंत्रित करतात. आम्हाला या उपकरणासाठी युएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) तसेच युरोपियन युनियन कन्फर्मीटे यूरोपीने (युरोपीय समुहाकडून) संमती मिळाली आहे.” युरोपियन युनियन-सीईद्वारे स्थापित अटी शायकोकॅन’ने पूर्ण केल्या असून हे उपकरण कोविड-19 सार्वजनिक आरोग्य आपतकालीन स्थितीत युएस एफडीएकडून जारी करण्यात आलेल्या अमलबजावणी मार्गदर्शक तत्त्वांनुसार बाजारात उपलब्ध करून देण्यात आले आहे.संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी शायकोकॅन’चा वापर करता येणार आहे. ते बाधित रुग्णाला निरोगी करणारे औषध किंवा लशीकरिता असलेला पर्याय नाही. डॉ. राजा विजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त टीमने या उपकरणाचे डिझाईन तयार केले आहे. यापूर्वी डॉ. राजा यांनी कर्करोगावर अधिक प्रभावीपणे उपचार करणाऱ्या सिटोस्ट्रोन हे मशीन तयार केले होते. हे उपकरण 1,000 चौ. फू. किंवा 10,000 घन मीटर आकाराच्या बंद जागा जसे की, वेटींग रूम (प्रतीक्षा खोल्या), कार्यालये, मॉल आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांकरिता उपयुक्त ठरेल. या तंत्रज्ञानामागे मुलभूत तत्त्वज्ञान आहे, जे विषाणू वाढीला अटकाव करते आणि प्रादुर्भावाला आळा घालते. शायकोकॅनचा कोणत्याही सजीवावर जसे की, बुरशी अथवा मानवावर विपरीत परिणाम होत नाही. त्याचा वापर सर्व प्रकारच्या वातावरणात शक्य आहे. याचे कोणतेही हानिकारक परिणाम नाहीत. शायकोकॅन अन्य कोणतीही सेवा अथवा कार्यप्रणाली; जसे की दूरध्वनीवर येणारे कॉल किंवा इंटरनेट कनेक्शनमध्ये सुधारणा किंवा अडथळा निर्माण करत नाही. शायकोकॅन’ची संकल्पना महासाथीचा फैलाव होण्यापूर्वी डिसेंबर 2018 मध्ये रुजली. कोणत्याही प्रकारचा संसर्ग कमी करण्यासाठी निर्माण केलेले हे तंत्र होते. व्हर्च्युअल सत्रादरम्यान बोलताना मेडविन हेल्थकेअरचे सीईओ देबाशिस बोस म्हणाले की,“मेडविन हेल्थकेअरने कठीण काळात कायमच समाजासाठी मदतीचे प्रयत्न केले. महामारी दरम्यान आम्ही प्राधिकरणांना अनेक प्रकारचे साहित्य पुरवले. ज्यामुळे विषाणूला अटकाव करणे शक्य होईल. शायकोकॅन’चे इंटरनॅशनल ह्युमनिटेरियन पार्टनर असल्याचा आम्हाला फारच आनंद वाटतो. आम्ही भारतभर उपकरणांची निर्मिती आणि पुरवठा करतो. आगामी सहा महिन्यांत सुमारे 1,30,000 शायकोकॅन उपकरणे पुरवायचा आमचा मानस आहे. या जीवघेण्या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी मानव जातीला मदत मिळावी म्हणून शक्य तितक्या मोठ्या संख्येने या उपकरणाची निर्मिती तसेच वितरण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आर्थिक वर्ष 21च्या अखेरीस 250 कोटींची उलाढाल होण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्नशील आहोत.” मेडविन हेल्थकेअरचे सीएफओ धृबज्योति बोस म्हणाले की, “शायकोकॅनमुळे आम्हाला घरी, कार्यालयांत, आरोग्य सुविधा केंद्रे, शाळा, उपहार गृहे इ. ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करणे शक्य होईल. आपल्या समाजातील अधिकातील लोकांना या उपकरणाचा लाभ घेता यावा, हे लक्षात ठेवूनच उपकरणाची किंमत ठरवण्यात आली आहे. हे भारतीयांनी भारतात (मेड इन इंडिया, बाय इंडियन्स) तयार केलेले उपकरण असून सध्याच्या चिंतेच्या वातावरणात दिलासा मिळवून देईल. याच्या वापराने करोना विषाणू बाधितांची संख्या कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे दिवसेंदिवस वाढता रुग्ण आलेख आटोक्यात आणता येईल. आपले सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी रुजवलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या दिशेने उचललेले हे सकारात्मक पाऊल ठरावे.” शायकोकॅन’ची किंमत जीएसटी’सह रुपये 19,999 असून हे उपकरण मेडविन हेल्थकेअरच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करता येईल. (अधिक चौकशीसाठी, कृपया www.medwin.co.in किंवा 6292000000 वर संपर्क करा). शायकोकॅन प्लग अँड प्ले मोड’वर चालते. मेडविन हेल्थकेअरची कोलकाता येथे दोन तर बंगळूरू, पुणे तसेच गुरुग्राममध्ये एक-एक निर्मिती केंद्रे आहेत. देशभर वितरण करण्याचा त्यांचा मानस असून परदेशातही जाण्याची योजना आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24