गोदरेज अँड बॉयसने स्वयंचलित पिनाका रॉकेट असेम्ब्ली लाईन विकसित करण्यासाठी चंद्रपूरच्या ऑर्डनन्स फॅक्टरीसोबत केली हातमिळवणी

गोदरेज अँड बॉयसने स्वयंचलित पिनाका रॉकेट असेम्ब्ली लाईन विकसित करण्यासाठी
चंद्रपूरच्या ऑर्डनन्स फॅक्टरीसोबत केली हातमिळवणी
आत्मनिर्भर भारत: गोदरेज टुलिंगने संकल्पना तयार करून विकसित केल्या नवीन पिनाका रॉकेट असेम्ब्ली लाईनमुळे उच्च दर्जाच्या, अत्याधुनिक सुरक्षा सुविधांच्या उत्पादनात सुधारणा होणार

२५ ऑगस्ट, २०२०: गोदरेज उद्योग समूहातील अग्रणी कंपनी गोदरेज अँड बॉयसचे बिझनेस युनिट गोदरेज टुलिंगने महाराष्ट्रातील चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीसोबत हातमिळवणी केली आहे. पिनाका रॉकेट्स तयार करण्यासाठी स्वदेशी बनावटीची स्वयंचलित असेम्ब्ली लाईनची संकल्पना तयार करून ती विकसित करण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. १० ऑगस्ट २०२० रोजी देशाचे माननीय संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंह यांच्या हस्ते याचे उदघाटन करण्यात आले होते. या नवीन स्वयंचलित असेम्ब्ली लाईनमुळे उत्पादनक्षमतेमध्ये वाढ झाली आहे, इतकेच नव्हे तर यामध्ये अनेक अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे स्फोटके आणि जिवंत इग्निटर असलेली रॉकेट्स अधिक सक्षमतेने हाताळता येतात.
नवीन स्वयंचलित असेम्ब्ली लाईनची रचना करण्याची आणि ती विकसित करण्याची सुरुवात गोदरेज अँड बॉयसने २०१६ साली केली, त्यावेळी आपल्या संरक्षण दलांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उत्पादनक्षमतेमध्ये लक्षणी वाढ करण्यामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरीजना अनेक आव्हाने झेलावी लागत होती. गोदरेज टुलिंगने सुविधेची रचना करण्यापासून तिची उभारणी आणि काम सुरु करण्यापर्यंत संपूर्ण प्रोजेक्ट एका वर्षभरात पूर्ण केला. या स्वयंचलित लाईनमुळे चंद्रपूरच्या ऑर्डनन्स फॅक्टरीला पिनाका रॉकेट्सच्या उत्पादनाच्या आपल्या क्षमतेमध्ये चौपट वाढ करण्यात यश मिळाले आहे.
गोदरेज अँड बॉयसचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री. जमशेद एन गोदरेज यांनी सांगितले की, "सर्व महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये उत्पादन आणि विकासात आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या संकल्पाने वेग घेतला आहे, आमची बिझनेस युनिट्स ऑर्डनन्स फॅक्टरीजसारख्या महत्त्वाच्या संरक्षण संघटनांसोबत भागीदारी करून नवीन स्वयंचलित सुविधांची रचना व विकास करत आहेत. आत्मनिर्भर भारत प्रत्यक्षात साकारला जावा, संरक्षण सुविधा, साधनांच्या उत्पादनामध्ये वाढ व्हावी हा आमचा प्रयत्न आहे."
चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीच्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांमध्ये ऑपरेशन्सचे डिस्किलिंग, उत्पादनाच्या गुणवत्तेवर वास्तविक देखरेख, स्वयंचलित सुरक्षा सुविधा, उत्पादनक्षमतेमध्ये चौपट वाढ तसेच संरक्षण दलांना जास्त सुविधांची उपलब्धता इत्यादींचा समावेश आहे.
गोदरेज टुलिंगचे ईव्हीपी व बिझनेस हेड श्री. डी. के. शर्मा यांनी सांगितले, "पिनाका रॉकेट्सची वाढलेली मागणी आणि प्रक्रिया स्वयंचलनामध्ये असलेल्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने पिनाका असेम्ब्ली लाईनची निवड करण्यात आली. उच्च उत्पादनक्षमता आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता मिळवण्यासाठी या प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप कमी करणे देखील गरजेचे होते. ऑर्डनन्स फॅक्टरी आणि गोदरेज टुलिंगच्या टीम्सनी एकमेकांच्या सहयोगाने काम करत अतिशय मेहनतीने फक्त १२ महिन्यात नवी प्रणाली विकसित व एकीकृत केली."
गोदरेज टुलिंगने तयार केलेली स्वयंचलनाची संकल्पना सादर करण्यासाठी एक संपूर्ण मॉक-अप स्टेशन उभारण्यात आले. काही किचकट असेम्ब्लीज गोदरेज टुलिंग सुविधा वापरून स्वयंचलित पद्धतीने करता येतात हे सिद्ध करण्यासाठी व्यापक चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत हे पाहिल्यानंतरच ऑर्डनन्स फॅक्टरी टीमने स्वयंचलन प्रणालीला मान्यता दिली.
ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डने अंबाझरी, चंद्रपूर आणि भुसावळ येथील कारखान्यांमधील कोणकोणती कामे स्वयंचलित करता येतील हे ठरवण्यासाठी गोदरेज टुलिंगला एक सर्वेक्षण आणि अभ्यास करण्यास सांगितले. विविध ऑर्डनन्स फॅक्टऱ्यांच्या गरजा आणि आवश्यकतांच्या प्राथमिकतेनुसार त्यांच्यासोबत सल्लामसलत करून विशिष्ट प्रस्ताव देण्यास देखील सांगितले गेले होते. त्यानुसार गोदरेज टुलिंगच्या डिझाईन टीमने सध्याच्या उत्पादन प्रक्रियांचा सखोल अभ्यास केला, त्यासाठी फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांसोबत सखोल चर्चा केल्या, आणि त्यानंतर जी कामे स्वयंचलित करता येतील अशा कामांची यादी तयार करण्यात आली. या यादीमध्ये चंद्रपूर येथे पिनाका रॉकेट असेम्ब्ली लाईन स्वयंचलित करण्याच्या प्रोजेक्टचा समावेश होता.
सुरक्षा आणि व्याप्ती याबाबत जराही कमतरता राहू नये हे सुनिश्चित करण्यासाठी अनेक आव्हानांचा मुकाबला करावा लागला कारण या लाईनमार्फत हाताळल्या जात असलेल्या रॉकेट्समध्ये तब्बल ३०० किलो वजनाची स्फोटके आणि जिवंत इग्निटर होते. त्यामुळे सर्व इलेक्ट्रिकल उपकरणे ज्वालारोधी असणे आवश्यक होते आणि हाताळणी करताना त्यावर कमीत कमी किंवा अजिबात काहीही प्रभाव होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे होते. अनेक भाग एकमेकांना अशाठिकाणी जोडायचे होते जिथे पोहोचणे खूप कठीण होते आणि तिथे काही नीट दिसत देखील नव्हते. गोदरेज टुलिंगचे डिझायनर्स आणि इंजिनियर्सनी ही आव्हाने दूर करण्याचा नाविन्यपूर्ण उपाय शोधून काढला, ज्यामुळे लाईनला ओएफने पुरवलेल्या उपकरणांसोबत एकत्र जोडता आली.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.