‘गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट’चा वनस्पती पोषण क्षेत्रात प्रवेश

गोदरेज अ‍ॅग्रव्हेटचा वनस्पती पोषण क्षेत्रात प्रवेश

27 ऑगस्ट, 2020 :गोदरेज अ‍ॅग्रव्हेटया कंपनीने आज बायोइबरका या स्पॅनिश संघटनेच्या संयुक्त विद्यमाने वनस्पती पोषणासाठीची विविध उत्पादने सादर करण्याची घोषणा केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश / तेलंगणा, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशात हा उत्पादनांचा पोर्टफोलिओ उपलब्ध असणार आहे. वनस्पतींमधीलाण कमी करण्याची गरज असल्याने या उत्पादनांचे महत्त्व मोठे आहे.
वनस्पतींचा ताण हा अजैविक (अत्यधिक किंवा अत्यंत कमी तपमान, कमी किंवा जास्त पाऊस, दुष्काळ इ. कारणांमुळे) किंवा जैविक (कीटकांचा संसर्गामुळे) असू शकतो. हवामानातील बदल आणि ग्लोबल वर्मिंग अशा विविध घटकांचा वनस्पतींवर थेट परिणाम होतो. सेंद्रिय उत्पादनांच्या कमतरतेमुळे कीटकनाशकाचा जास्त प्रमाणात वापर केल्या, वनस्पतीच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यातिच्या आरोग्याची हानी होणे, विशिष्ट पीक, फळ आणि फूल यांच्या उत्पादनात घट होणे ही वनस्पतीवर ताण आल्याची सामान्य लक्षणे आहेत.
वनस्पतीवर ताण आल्याचा गंभीर परिणाम वनस्पतींच्या आरोग्यावर आणि शेतीच्या अर्थकारणावर होतो, तरीही बहुसंख्य शेतकरी वनस्पतीवरील ताण हा शेती व्यवस्थापनाचा महत्वाचा पैलू मानत नाहीत.  तंत्रज्ञानाच्या आधारे सादर करण्यात आलेल्या सोल्युशनमुळे आता वनस्पती ताण कमी करण्याच्या या सुप्त गरजेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यास शेतकऱ्यांना शक्य होईल. या समस्या दूर करण्यासाठी आणि निरोगी शेतीची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटतर्फे पीकनिहाय पौष्टिक उत्पादने देण्यात येतात.

गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटचे व्यवस्थापकीय संचालक बलरामसिंग यादव म्हणाले, “वनस्पतींच्या ताणामुळे निर्माण झालेल्या शेतीविषयक प्रश्नांचा थेट परिणाम शेती अर्थशास्त्रावर होतो. तो कमी करण्यासाठी  त्वरित जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. पीक उत्पादन सुधारण्यासाठी कृषी-इनपुट उत्पादनांच्या विविध श्रेणी सादर करीत गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट ही कंपनी भारतीय शेतकर्‍यांची सेवा करत आहे. वनस्पतींच्या पोषणासाठीची उत्पादने आणण्याचा प्रारंभ या नीतिशी सुसंगत आहे. यामुळे शेतकर्‍यांना विशिष्ट पिकाचे अपेक्षेएवढे उत्पन्न मिळू शकेल.
वनस्पती पोषण उत्पदनांच्या पोर्टफोलिओमध्ये पुढील पीकनिहाय उत्पादनांचा समावेश आहे:
टेरा सॉर्ब कॉम्प्लेक्स - द्राक्ष, सफरचंद, मिरची, बटाटा
आर्मुरॉक्स - द्राक्ष, सफरचंद, मिरची, कापूस
इक्विलिब्रियम - टोमॅटो, वांगी, भेंडी, तोंडली, ढोबळी मिरची, काकडी आणि केळी या फळभाज्या.
ही उत्पादने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश / तेलंगणा, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशात उपलब्ध असतील.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.