आकाश इन्स्टिट्यूटच्या 24 हुशार विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स 2020 मध्ये महाराष्ट्रात 99 पर्सेंटाईलहून अधिक गुण मिळवत दमदार निकालांचे प्रदर्शन केले

आकाश इन्स्टिट्यूटच्या 24 हुशार विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स 2020 मध्ये 

महाराष्ट्रात 99 पर्सेंटाईलहून अधिक गुण मिळवत दमदार निकालांचे  प्रदर्शन केले  

14 सप्टेंबर 2020 : आकाश इन्स्टिट्यूटच्या महाराष्ट्रातील विविध शाखांमधील २४ बुद्धिमान विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा 2020 मध्ये 99 पर्सेंटाईलहून अधिक गुण मिळवत अप्रतिम निकालांचे प्रदर्शन केले. 

जेईई मेन्स 2020 परिक्षेत दमदार कामगिरी करणारे काही लक्षणीय विद्यार्थी म्हणजे आकाश इन्स्टिट्यूटच्या कल्याण शाखेतील यशवर्धन अग्निहोत्री. त्याने ९९.९५ पर्सेंटाईल मिळवले. तर आकाश इन्स्टिट्यूटच्या ठाणे शाखेतील श्रेयस प्रदीप पाखरे या विद्यार्थ्याने ९९.८९ पर्सेंटाईल, आकाश इन्स्टिट्यूटच्या कल्याण शाखेतील हेमंत सदवाना आणि रोहन सिदानकर या दोघांना अनुक्रमे ९९.८९ आणि ९९.८४ पर्सेंटाईल तर आकाश इन्स्टिट्यूटच्या बोरिवली शाखेतील प्रियल शहा हिला ९९.८० पर्सेंटाईल मिळाले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने या निकालांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील टॉपचे पाचही विद्यार्थी मुंबई भागातील आहेत. 

सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल)चे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीआकाश चौधरी म्हणाले, "आमचे 24 विद्यार्थी जेईई मेन्स 2020 प्रवेश परीक्षेत 99 आणि त्याहून अधिक पर्सेंटाईलची उत्कृष्ट कामगिरी करून पुढे गेले याचा आम्हाला अभिमान आहेया यशाचे श्रेय विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांना जाते, ज्यांनी त्यांना या संपूर्ण प्रवासात चांगले मार्गदर्शन दिले. विद्यार्थ्यांना वैद्यकी आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत उत्तम कामगिरीसाठी तयार करणाऱ्या आमच्या दर्जेदार सराव परीक्षा या क्षेत्रात नावाजल्या जातात. या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा." 

विद्यार्थ्यांनी या अप्रतिम यशाचे श्रेय मेहनत आणि आकाश आयआयटी-जेईईच्या शिक्षकांनी दिलेल्या अप्रतिम कोचिंगला दिलेजगातील काही सर्वाधिक कठीण परीक्षांमध्ये समावेश असलेल्या या परीक्षेसाठी त्यांनी उत्तम तयारी करून घेतलीजेईई मेन्स एक्झाममधून एनआयटीआयआयटी आणि सीएफटीआयमध्ये प्रवेश मिळतो. 

देशभरातून सहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई मेन्ससाठी नोंदणी केली होतीही अत्यंत आनंदाची आणि उत्तम बाब आहे. 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth