आगामी काळातील सणांमुळे ई-कॉमर्सची चलती लक्षात घेऊन ईकॉम एक्सप्रेस 30000+ कर्मचारी नियुक्त करणार

आगामी काळातील सणांमुळे ई-कॉमर्सची चलती लक्षात घेऊन ईकॉम एक्सप्रेस  30000+ कर्मचारी नियुक्त करणार  

~30 टक्क्यांएवढ्या हंगामी नियुक्त कर्माचाऱ्यांना ईकॉम एक्सप्रेसमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची शक्यता~ 

~फूलफिलमेंट सेंटर्स, डिलिव्हरी सेंटर्सची सुविधा उपलब्ध करून देणार, सोबतच ऑटोमेशनमध्ये गुंतवणुकही करणार~ 

~अंदमान आणि निकोबारमध्ये प्रवेश~ 

 


14 सप्टेंबर 2020: ईकॉम एक्सप्रेस, हा तंत्रज्ञान-युक्त असा सर्वांकष स्वरुपाचा ई-कॉमर्स क्षेत्राला लॉजिस्टीक पर्याय उपलब्ध करून देणारा अग्रगण्य पुरवठादार आहे. आज त्यांच्या वतीने फूलफिलमेंट सेंटर्स, हब्ज, सॉर्टेशन सेंटर्स आणि डिलिव्हरी सेंटर्सच्या माध्यमातून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत 30,000+ हंगामी रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आगामी काळात सणासुदीच्या दिवसांत ऑनलाईन खरेदीला उधाण येणार असल्याने कंपनीने तयारी सुरू केली आहे. घरपोच डिलिव्हरीचा पर्याय अनेक ग्राहक स्वीकारताना दिसतील. या सर्व कामांकरिता मोठ्या प्रमाणावर डिलिव्हरी कर्मचारी, हब आणि सॉर्टींग सेंटर्स असोसिएट्स तसेच गोदाम कामांसाठी कामगार बळाची आवश्यकता भासेल.  

 

ही हंगामी पदे देशभर निर्माण करण्यात आली असून एकूण भरतीच्या ¾ नियुक्त्या या उपनगरे आणि शहरांमधून करण्यात येणार आहेत. अहमदाबाद, सुरत, विजयवाडा, चंडीगड, इंदूर, पटना, लखनऊ, कानपूर, भोपाळ आणि जयपूरमधून या नियुक्त्या होणार आहेत.  

 

ईकॉम एक्सप्रेस’चे एक्झिक्यूटीव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि चीफ ह्यूमन रिसोर्स ऑफिसरसौरभ दीप सिंगला म्हणाले की, कोविड – 19 महासाथीमुळे आमच्या सेवेला कधी नव्हे इतके समर्पक बनवले आहे. आम्ही हंगामी कामांसाठी 30,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या विचारात आहोत. सणासुदीच्या काळानंतरही काही व्यक्तींना आम्ही कायमस्वरूपी नोकरीत घेऊ. सध्या लक्षावधी भारतीय नोकऱ्यांच्या शोधात आहेत, या अशा कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने त्यांना मदत करणार आहोत तसेच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ. आम्ही नियुक्ती प्रक्रिया सुरळीत असावी यासाठी विविध मॉडेलद्वारे आमची सहभागिता वाढवून आवश्यक रोजगार गरज पूर्ण करत आहोत.’’ 

 

मागील काही वर्षांपासून हंगामी स्वरुपाच्या नोकऱ्यांसाठी कंपनीकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या लोकांपैकी 30 टक्के लोकांना सणासुदीचा काळ सरल्यानंतर कायमस्वरूपी नोकरीवर ठेवले जाते. जून आणि जुलै दरम्यान कंपनीद्वारे विविध व्यवसाय विषयक कामांसाठी कंपनीद्वारे 7000 हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले. जेणेकरून ई-कॉमर्स उद्योग क्षेत्रासाठी पुरवठा साखळी सुरू राहील आणि सुरक्षित तसेच वेळेवर डिलिव्हरीची खातरजमा असेल.   

 

सणासुदीला मागणीनुसार पुरवठा करता यावा याकरिता कंपनीने दिल्ली एनसीआर, कोलकाता, मुंबई, बंगळूरू आणि विजयवाडा येथील हब्ज, सॉर्टेशन आणि फूलफिलमेंट सेंटरकरिता लक्षावधी चौरस फुटांचा भूभाग समाविष्ट करून घेतला आहे.  

 

भारतात 200 डिलिव्हरी सेंटर्सची भर कंपनीने घातली असून हिमाचल प्रदेश आणि ईशान्येकडे नवीन विस्ताराच्या योजना सुरू आहेत, सोबतच अंदमान आणि निकोबारमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या डिलिव्हरी सेंटरची संख्या 3000 हून अधिक झालीकंपनी या विस्तारामुळे आपल्या देशामधील सुमारे 27,000+ पिन कोडवर उपलब्ध आहे.  

 

कंपनीने सर्व सेंटरमध्ये इन्ही-स्पीड ऑटोमेटेड सॉर्टर्सकरिता गुंतवणूक केली असून त्यामुळे अधिक मागणी क्षमतेला हातभार लागेल.  

 

ईकॉम एक्सप्रेसचे उपाध्यक्ष आणि स्ट्रॅटेजी अँड प्लानिंग हेड सिद्धार्थ अगरवाल म्हणाले की, “भारतात 2000 हून अधिक ई-कॉमर्स कंपन्यांसाठी लॉजिस्टीक पार्टनर म्हणून काम करताना आम्ही सणासुदीला ग्राहकांना चांगला अनुभव मिळावा यासाठी पायाभूत सुविधेची पुनर्रचना करण्याच्या दृष्टीने आमचे सर्व धोरणात्मक विस्तार आखले आहेत. प्रामुख्याने महामारी-पश्चात काळात ऑनलाईन खरेदीला उधाण येणार असून मनुष्यबळ, विस्तार आणि ऑटोमेशनला चालना दिल्याने ईकॉम एक्सप्रेसची शक्ती बळकट होणार आहे. जेणेकरून ग्राहकांना सातत्याने सुलभ सेवा आणि अनुभवाची खातरजमा राहील. 

 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth