आकाश इन्स्टीट्युटच्या वतीने मुख्य राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा, ‘ANTHE 2020’ची घोषणा; परीक्षा कालावधी 26 नोव्हेंबर – 06 डिसेंबर 2020 दरम्यान होणार आयोजित

आकाश इन्स्टीट्युटच्या वतीने मुख्य राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा, ANTHE 2020ची घोषणापरीक्षा कालावधी 26 नोव्हेंबर – 06 डिसेंबर 2020 दरम्यान आयोजित 

  • शेकडो पात्र विद्यार्थ्यांचा 100% शिष्यवृत्ती देऊन सन्मान करणार, डॉक्टर आणि आयआयटीयन होण्याच्या त्यांच्या प्रयत्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यात मदत. 
  • देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा, 2019 दरम्यान ANTHE करिता 3.4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी. 
  • 2010 मध्ये शुभारंभ झाल्यापासून ANTHE करिता 19 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाममध्ये सहभागी. 
  • या शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी इयत्ता VII- XII मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ. 
  • शिष्यवृत्ती वगळता, विद्यार्थ्यांना मोफत मिळू शकणार मेरीटनेशन स्कूल बुस्टर कोर्स.  

 


09 सप्टेंबर, 2020: आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल), हे डॉक्टर आणि आयआयटी इच्छुक विद्यार्थ्यांकरिता परीक्षांची तयारी करून घेणारे राष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य नाव आहे. देशात त्यांची 200 हून अधिक सेंटर असून त्यांनी त्यांच्या वार्षिक शिष्यवृत्ती परीक्षा, आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम (ANTHE)च्या अकराव्या आवृत्तीची घोषणा केली. देशाची 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत 26 नोव्हेंबर- 06 डिसेंबर 2020 दरम्यान रखडलेल्या सत्राची सुरुवात होण्याचा अंदाज आहे.     

ऑनलाईन परीक्षा 26 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर 2020 (नियमित) दरम्यान दुपारी 02:00 – संध्याकाळी 07:00 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहेत. या लॉगइन विंडो दरम्यान कधीही विद्यार्थ्यांना परीक्षा देता येतील. ऑफलाईन परीक्षा दोन शिफ्ट (पाळ्यांमध्ये) दिनांक 06 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10:30 ते सकाळी 11:30 आणि संध्याकाळी 04:00 ते 5:00 या वेळेत सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करून घेण्यात येतील.  

आकाश संस्थेमार्फत घेण्यात येणारी ही राष्ट्रीय स्तरावरील खासगी क्षेत्रामधील सर्वात मोठी परीक्षा मानली जाते. ANTHE च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. डॉक्टर आणि आयआयटीयन होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या दिशेने पहिले पाऊल उचलण्याच्या दृष्टीने फारच मदतीचे ठरते. केवळ 2019 वर्षातपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 3.4 लाखांहून अधिक होती. ANTHE 2020 साठी प्रवेश अर्ज दाखल करण्याची शेवटची दिनांक ऑनलाईन परीक्षेच्या 3 दिवस अगोदर आणि ऑफलाईन परीक्षेच्या 7 दिवस अगोदर असणार आहे. परीक्षा शुल्क अगदी नाममात्र रु. 200 इतके असेल. ते नेट बँकिंग माध्यमातून, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड किंवा आकाश इन्स्टीट्युटच्या शाखेत/ सेंटरवर थेट जमा करता येईल.  

अतिरिक्त लाभ म्हणजे ANTHE ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरीटनेशन स्कूल बुस्टर कोर्सचा मोफत फायदा घेता येईल. मेरीटनेशन ही एईएसएलची उपशाखा आहे.  

इयत्ता X, XI, XII मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल 15 डिसेंबर 2020 तर इयत्ता VII, VIII आणि IX च्या विद्यार्थ्यांचे निकाल 17 डिसेंबर 2020 रोजी घोषित करण्यात येतील.  

 इयत्ता VII ते XII मध्ये शिकणारे2000+ विद्यार्थी ट्युशन फी’वर 100% शिष्यवृत्ती मिळवण्यास पात्र असतील, तसेच 700 विद्यार्थी रोख पारितोषिकांकरिता पात्र ठरणार आहेत.    

सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच, ज्यांनी ANTHE परीक्षेत चांगले गुण मिळवले आहेत त्यांना ट्युशन फी’वर आकर्षक शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल.  

देशभर टॅलेंट हंट आयोजित करण्यात येणार असून त्यात आसाम, आंध्रप्रदेश, बिहार, चंडीगड, छत्तीसगढ, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडीशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालसारखी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असणार आहे. विद्यार्थी, पालक किंवा शालेय प्राधिकरणाने विनंती केल्यास किमान नियमांच्या आधारे कोणत्याही शहरात अधिक ANTHE सेंटर सुरू करता येतील अशी घोषणा AESL कडून करण्यात आली.  

ANTHE 2020च्या लॉन्चविषयी बोलताना आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (AESL) चे डायरेक्टर आणि सीईओ आकाश चौधरी म्हणाले की, “मागील दशकापासून ANTHE ला मिळालेला प्रतिसाद पाहून आमचे मन भरून आले. आज वैद्यकीय किंवा आयआयटीचे स्वप्न पाहणाऱ्या देशातील शालेय विद्यार्थ्यांकरिता एक सर्वात मोठा पर्याय म्हणून आमचा उदय झाला आहे. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा यासाठी इयत्ता VII-XII मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवत आहोत. मागच्या वर्षीप्रमाणे या प्रतिष्ठीत टॅलेंट हंट परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी अर्ज करून करीयरमधील उद्दिष्ट गाठण्यासाठी उपलब्ध असलेल्या या उत्तम संधीचा लाभ घेतील, हा विश्वास वाटतो. 

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.