मागणीतील अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या

मागणीतील अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या

मुंबई, १ सप्टेंबर २०२०: कच्च्या तेलाची किंमत सोमवारी ०.८२ टक्क्यांनी घटली व ती सुमारे ४२.६ डॉलर प्रति बॅरल एवढी झाली. बाजारात तेलाचे दर आणखी कमी करण्यात आले. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की ओपेक आणि सदस्य संघटनांनी ऑगस्ट २०२० पासून दररोज ९.७ दशलक्ष बॅरलवरील उत्पादन ७.७ दशलक्षांपर्यंत आणले आहे. जागतिक बाजारातील तेलाची मागणी अजून मौनातच आहे. तेलाच्या मागणीतील अनिश्चितता तसेच पुन्हा संसर्ग झालेल्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीवर बराच परिणाम झाला. तथापि, डॉलरचे मूल्य कमकुवत होणे आणि चीनच्या सेवा क्षेत्रातील बळकटी यामुळे तेलाच्या किंमती घसरण्यावर मर्यादा आल्या.

सोने: सोमवारी, सोन्याचे दर ०.३ टक्क्यांनी घसरले व १९६९.८ डॉलर प्रति औंसावर बंद झाले. घसरलेल्या डॉलरमुळे सोने इतर चलनधारकांसाठी काहीसे स्वस्त झाले. त्यामुळे गुंतवणुकीसाठी ते आकर्षक ठरले. डॉलरच्या अवमुल्यनासोबतच, अमेरिकेतील निवडणुकांपूर्वी अमेरिका-चीनमधील तणाव तसेच मोठ्या प्रमाणातील प्रोत्साहनाची अपेक्षा हे घटक पिवळ्या धातूच्या किंमतींना आधार देणारे घटक ठरले.

अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी रोजगार वाढ आणि लक्ष्यित महागाई दराचे व्यवस्थापन करण्यासाठी नवे धोरण आखले आहे. या धोरणांनी कमी व्याजदराच्या दिशेने संकेत दर्शवले, त्यामुळे सोन्याच्या किंमतीत अधिक वाढ झाली. पिवळ्या धातूची पाच महिन्यातील पहिल्या नुकसानीकडे वाटचाल झाली. सोने ०.४९ टक्क्यांनी वाढून एमसीएक्सवर ५१,७०१ रुपये प्रति १० ग्राम एवढे झाले. आज त्याचे दर आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

बेस मेटल्स: वृद्धीच्या पैलूने औद्योगिक धातूच्या मागणीने परिणाम केल्याने एमसीएक्सवरील धातूच्या किंमती काहीशा कमी झाल्या. फेब्रुवारी २०२० मध्ये घसरण झाल्यानंतर चीनच्या कारखान्यांतील कामकाज हळू हळू वाढ होत आहे. २०२० च्या सुरुवातीच्या महिन्यांत धातूच्या किंमती घसरल्यानंतर आता पायाभूत सुविधा आणि उत्पादन दोन्ही क्षेत्रात पूर्णपणे कामकाज सुरू झाल्याने धातूच्या किंमती वाढल्या. चीनमधील पोलाद कंपन्यांनी कामकाज सुरू केले. म्हणून पोलाद, झिंक आणि निकेलच्या किंमतीत वाढ झाली.

तांबे: सोमवारी तांब्याच्या दरात ०.५४ टक्क्यांनी घट झाली. ते ५२७.५ रुपये प्रति किलोवर स्थिरावले. अमेरिकेतील निवडणुकीच्या तोंडावर अमेरिका-चीनमधील तणावामुळे तांब्याच्या किंमतींवर परिणाम झाला.
एलएमई प्रमाणित गोदामांमधील तांब्याचा साठा १४ वर्षांच्या तुलनेत ८९,३५० टनांनी घटला.जागतिक अर्थव्यवस्थेत मागणीतील औदासिन्याच्या शक्यतेमुळे तांब्याच्या किंमतीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. आज तांब्याचे दर आणखी कमी होऊ शकतात.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy