आर्थिक सुधारणेच्या चिंतेमुळे कच्च्या तेलाचे दर घसरले

 आर्थिक सुधारणेच्या चिंतेमुळे कच्च्या तेलाचे दर घसरले

मुंबई, ११ सप्टेंबर २०२०: गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक सुधारणांबद्दलच्या वाढत्या चिंतेमुळे पिवळ्या धातूचे दर उच्चांकी स्थितीत गेले. तर कच्चे तेल, बेस मेटलचे दर जागतिक मागणी कमकुवत ठरल्याने तसेच अमेरिका-चीनदरम्यानच्या वाढत्या तणावामुळे घसरले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

अमेरिकी कच्च्या तेलाच्या साठ्यातील वाढ तसेच तरल सोन्याची मागणी कमी राहिल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर गुरुवारी २ टक्क्यांनी घसरले व ३७.३ डॉलर प्रति बॅरल एवढे झाले. अमेरिकेच्या एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (इआयए) ने कच्च्या तेलाच्या साठ्यात वाढ होऊन ती ४ सप्टेंबर २०२० पर्यंत २.० दशलक्ष बॅरल एवढी झाल्याचे नोंदवले. यासोबतच कच्च्या तेलाची घटती मागणी पाहता, सौदी अरबने (क्रूडचा मोठा निर्यातदार) आशियासाठी अधिकृत विक्री किंमत (ओएसपी) ऑक्टोर महिन्यासाठी कमी केली. त्यामुळेही कच्च्या तेलाच्या दरांवर दबाव आला.

अमेरिकी डॉलरचे अवमूल्यन आणि कमकुवत वृद्धी यामुळे स्पॉट गोल्डचे दर ०.३८% नी वाढले व १९५४.१ डॉलर प्रति टनांवर बंद झाले. युरोपियन मध्यवर्ती बँकेने तिचे धोरण कायम ठेवल्याने युरो मजबूत स्थितीत आला व परिणामी डॉलर कमकुवत ठरला. डॉलरचे मूल्य घसरल्याने पिवळा धातू इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाला. अमेरिकेतील बेरोजगारीच्या वाढत्या आकड्यांवरून कामगार बाजार कमकुवत असल्याचे संकेत मिळाले. रोजगारातील कमी वृद्धी आणि परमनंट नोकरीतील नुकसान यामुळे गुंतवणुकदारांमध्ये गतिशील आर्थिक सुधारणेबाबतच्या आशा मावळल्या. त्यामुळे ते सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याकडे वळताना दिसून आले.

अमेरिका-चीनमधील वाढता तणाव तसेच जागतिक आर्थिक सुधारणांसाठीच्या वाढत्या चिंता यामुळे एलएमईवरील बेस मेटलचे दर घसरले. डॉलरचे मूल्य वाढल्याने बेस मेटलमधील नफाही मर्यादित राहिला. नोव्हेंबर २०२० मध्ये आयोजित अमेरिकेच्या निवडणुकीनंतर चीनशी असलेले सर्व करार संपुष्टात आणण्याचे अमेरिकी अध्यक्षांनी सुचवले आहे. यामुळे जगातील सर्वात मोठ्या दोन महासत्तांमधील संबंधावर परिणाम झाला असून यामुळे औद्योगिक धातूंवर याचे सावट आले आहे. मार्च २०२० पासून लाल धातूतील धक्कादायक घसरणीच्या चिंतेमुळे एलएमई कॉपरचे दर ०.९७% नी घसरले व ६६६८.५ डॉलर प्रति टनांपर्यंत आले आहेत.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202