एएससीआय अध्‍यक्षपदी सुभाष कामत यांची नियुक्‍ती

एएससीआय अध्‍यक्षपदी सुभाष कामत यांची नियुक्‍ती



मुंबई, १० सप्‍टेंबर २०२०: बीबीएच अॅण्‍ड पब्लिसिस वर्ल्‍डवाइड, इंडिया येथील मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुभाष कामत यांची एकमताने अॅडव्‍हर्टायझिंग स्‍टॅण्‍डर्डस कौन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय)च्‍या प्रशासकीय मंडळाच्‍या अध्‍यक्षपदी नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. आज दुपारी घेण्‍यात आलेल्‍या ३४व्‍या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनंतर संचालकीय मंडळाच्या बैठकीमध्‍ये मतदान प्रक्रिया पार पाडण्‍यात आली. कामत दिग्‍गज उद्योजक असून त्‍यांना विविध विभागांमध्‍ये ब्रॅण्‍ड्स उभारणीचा ३२ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे.

केचम संपर्क प्रा.लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक एन. एस. राजन यांची उपाध्‍यक्ष म्‍हणून निवड करण्‍यात आली आणि मीडियाब्रॅण्‍ड्स इंडिया प्रा. लि.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शशिधर सिन्‍हा याना त्‍याच बैठकीमध्‍ये पुन्‍हा मानद कोषाध्‍यक्ष म्‍हणून नियुक्‍त करण्‍यात आले.

प्रशासकीय मंडळामध्‍ये आयएसडब्‍ल्‍यूएआयचे सह-अध्‍यक्ष व बोर्ड सदस्‍य अबांती शंकरनारायण, आदित्‍य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशन प्रा.लि.चे समूह कार्यकारी अध्‍यक्ष डी. शिवकुमार, दैनिक भास्‍कर ग्रुपचे संचालक गिरीश अग्रवाल, टाटा कन्‍झ्युमर प्रॉडक्‍ट्स लि.चे संचालक हरिश भट, निहिलण्‍ट लि.चे मुख्‍य सर्जनशील अधिकारी (ग्‍लोबल) के. व्‍ही. श्रीधर, प्रॉक्‍टर अॅण्‍ड गॅम्‍बल हायजिन आणि हेल्‍थ केअर लि.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मधुसुदन गोपालन, सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍स इंडिया प्रा. लि.च्‍या नेटवर्क सेल्‍स अॅण्‍ड इंटरनॅशनल बिझनेसचे अध्‍यक्ष रोहित गुप्‍ता, सेंटर फॉर डेव्‍हलपमेंटल एज्‍युकेशन, आयएफआयएम बिझनेस स्‍कूलचे प्रो. एस. के. पालेकर, हिंदुस्‍तान युनिलिव्‍हर लि.च्‍या ब्‍युटी अॅण्‍ड पर्सनल केअरच्‍या कार्यकारी संचालक प्रिया नायर, निल्‍सेन (इंडिया) प्रा. लि.चे दक्षिण आशियामधील अध्‍यक्ष प्रसून बासू, बेनेट कोलेमन अॅण्‍ड कं. लि.च्‍या महसूल विभागाचे अध्‍यक्ष शिवकुमार सुंदरम आणि टॅपरूट इंडिया कॉम. प्रा. लि.चे मुख्‍य कार्यकारी संचालक उमेश श्रीखंडे या मान्‍यवरांचा समावेश आहे.

नवनिर्वाचित अध्‍यक्ष सुभाष कामत म्‍हणाले, ''एएससीआयच्‍या अध्‍यक्षपदाची धुरा सांभाळण्‍याचा सन्‍मान अत्यत खास आहे. संचालकीय मंडळामध्‍ये दहा वर्षे कार्यरत असताना मला उद्योगक्षेत्रातील अनेक वरिष्‍ठ व अनुभवी प्रमुखांसोबत काम करण्‍याची आणि त्‍यांच्‍याकडून शिकण्‍याची सधी मिळाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे मला स्‍वयं-नियमनाचे महत्त्व, तसेच एएससीआयने वर्षानुवर्षे केलेल्‍या कार्याचा दीर्घकालीन परिणाम समजला आहे. आज आमचे उद्योगक्षेत्र एका महत्त्वाच्‍या टप्‍प्‍यावर आहे. डिजिटल क्रांतीचा ब्रॅण्‍ड संदेश व ग्राहकांसोबत सहभागावर मोठा प्रभाव पडत असताना जाहिरात क्षेत्र झपाट्याने सर्वसमावेशक होत आहे. आणि सरकारने नुकतेच स्‍थापन केलेल्‍या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणासह स्‍वयं-नियमन ग्राहक आत्‍मविश्‍वास व विश्‍वासाला चालना देण्‍यामध्‍ये अधिक महत्त्वपूर्ण ठरेल. मी नेहमीच म्‍हणत आलो आहे की, उत्तम सर्जनशील क्षमता असल्‍यास तितकीच सक्षम जबाबदारी देखील मिळते. म्‍हणून मी माझ्या अगोदर असलेल्‍या अध्‍यक्षांनी केलेले चांगले कार्य कायम ठेवण्‍यासाठी आणि काही नवीन, अधिक भविष्‍य-केंद्रित उपक्रम सादर करण्‍यासाठी एएससीआय टीमसोबत सहयोगाने काम करण्‍यास उत्‍सुक आहे.''

एएससीआय येथे वर्षभर केलेल्‍या कार्याला उजाळा देत मावळते अध्‍यक्ष रोहित गुप्‍ता म्‍हणाले, ''मी माझे सर्व सहकारी, एएससीआय सदस्य आणि या अविश्‍वसनीय प्रवासाचे भाग राहिलेल्‍या प्रत्‍येकाचे आभार मानतो. मी जाहिरात क्षेत्रामध्‍ये महत्त्वपूर्ण बदलांचे नेतृत्‍व केलेल्‍या मंडळाचे अध्‍यक्षस्‍थान भूषवण्‍याची संधी दिल्‍याबद्दल आनदित आहे. हे वर्ष एएससीआयसाठी सर्वात घटनापूर्ण राहिले आहे. आम्‍ही अनेक आव्‍हानांचा सामना केला. या महामारीदरम्‍यान अनेक दिशाभूल करणा-या जाहिराती दिसण्‍यात आल्‍या, ज्‍यासंदर्भात त्‍वरित कारवाई करण्‍यात आली. आयुष मंत्रालयाने कोविड-१९ चा प्रतिबंध व उपचारासंदर्भात दिशाभूल करणा-या जाहिरातींविरूद्ध कारवाई करण्‍यामध्‍ये मदत केली. आम्‍ही दिशाभूल करणा-या क्‍लेम्‍ससंदर्भात ३,००० डिजिटल पोर्टल्‍सची देखरेख करण्‍यासाठी टीएएमसोबत देखील सहयोग केला. आम्‍ही स्‍थापित केलेली तीन ध्‍येये यशस्‍वीरित्‍या संपादित केली: आमच्‍या ग्राहकवर्गामध्‍ये वाढ, डिजिटल क्षेत्रावर देखरेख आणि सरकारी संस्‍थांसोबत सहयोगाने कार्य. माझ्याकडून कामत यांना आणि संचालकीय मंडळाला भावी वाटचालीसाठी शुभेच्‍छा.''

गेल्‍या वर्षभरात एएससीआयच्‍या स्‍वतंत्र ग्राहक तक्रार परिषदेचे ४५ वेळा आयोजन करण्‍यात आले आणि त्‍यामध्‍ये ३,७७३ जाहिरातींविरोधातील तक्रारींवर चर्चा करण्‍यात आली. 

·         ,१२६ जाहिरातींविरोधात (२०१८-१९ मध्‍ये १,४८६) तक्रार करण्‍यात आली, तर तक्रार न करण्‍यात आलेल्‍या २९८ जाहिरातींनी एएससीआयच्‍या नियमांचे उल्‍लंघन केले नाही असे मानण्‍यात आले.

·         १९२ जाहिरातींनी ड्रग्‍स अॅण्‍ड मॅजिक रेमीडीज (डीएमआर) कायदा किंवा ड्रग्‍स अॅण्‍ड कॉस्‍मेटिक्‍स रूल्‍स (शेड्यूल जे) यांचे उल्‍लंघन केल्‍याचे आढळून आले. यासंदर्भात त्‍वरित कारवाई करण्‍यासाठी आयुष मंत्रालय किंवा आरोग्‍य मंत्रालयाला याबाबत कळवण्‍यात आले.

·         अनेक प्रकरणांमध्ये राज्य आयुष अधिकारीएफडीए किंवा भारतीय औषधासाठी केंद्रीय परिषद यांनी जाहिरातदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली.  

जुलैमध्‍ये मृत्‍यू झालेले हॉकिन्‍स कूकर्सचे अकार्यकारी अध्‍यक्ष आणि एएससीआयचे पहिले अध्‍यक्ष ब्रह्म वासुदेव यांना मानवंदना देत बैठकीची सांगता झाली. जाहिरातीमधील स्‍वयं-नियमनाप्रती आणि एएससीआयमधील कार्याप्रती त्‍यांच्‍या कटिबद्धतेला उजाळा देण्‍यात आला.  

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24