रुग्णांच्या नव्या लाटेमुळे युरोवर करडी नजर

 रुग्णांच्या नव्या लाटेमुळे युरोवर करडी नजर

(लेखक: श्री. वकारजावेद खान, रिसर्च अॅनलिस्ट, एंजल ब्रोकिंग लिमिटेड)

२०२० या वर्षाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत युरो आणि अमेरिकन डॉलर या जोडीमध्ये ६.१९ टक्क्यांची वाढ झाली असून युरो आणि रुपाया या जोडीत जवळपास ८.९३ टक्क्यांची घसरण झाली. दरम्यान याच काळात डॉलरच्या निर्देशांकात ३.५८ टक्क्यांची घट झाली. असे असले तरीही, सध्याच्या काळात प्रमुख युरो ब्लॉक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांची दुसरी लाट आल्यामुळे युरोचे मूल्य काही प्रमाणात घटले आहे. यामुळे युरोपच्या आर्थिक सुधारणेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

स्पेन आणि फ्रान्स हे युरोपमधील नवे हॉटस्पॉट ठरले: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे युरोपमधील प्रमुख भागाला हादरा बसला असून यापैकी स्पेन आणि फ्रान्सला अधिक गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.. फ्रान्समध्ये दररोज सुमारे १०,००० पेक्षा जास्त रुग्ण निघत असून स्पेननेही एकूण ६,००,००० ची रुग्णसंख्या ओलांडली आहे. शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये स्पेनच्या आरोग्य अधिका-यांनी १,२०,००० संसर्गांचे निदान केले असून तपासण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. दोन्ही सरकारांनी, यापुढे देशव्यापी लॉकडाऊन नाकारले आहे. देशात लॉकडाऊन नसले तरी, उपभोग खर्चावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण कोव्हिड-१९ च्या वाढत्या रुग्णांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण कायम असेल.

मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत सुरूच: ईसीबीच्या चलनविषयक धोरणाच्या ताज्या बैठकीत समितीने, ब्लॉकमधील साथग्रस्त देशांना आधार देण्यासाठी व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचे व मदतीचे पॅकेज प्रदान करण्याचे निश्चित केले आहे. आधीच्या बैठकीत, ईसीबीने जून २०२१ पर्यंत किंवा साथीचे संकट संपेपर्यंत प्रोत्साहन कार्यक्रमाचे प्रमाण १.३५ ट्रिलियन युरो एवढ्यापर्यंत आणण्यासाठी महामारी आपत्कालीन खरेदी कार्यक्रमाचा विस्तार ६०० अब्ज युरो एवढा केला.

२०२० मध्ये युरोचे मूल्य वाढल्याबद्दल, क्रिस्टीन लेगार्डे यांनी नमूद केले की, केंद्रीय बँक युरोमधील चढ-उतारावर बारकाईने लक्ष ठेवेल. केंद्रीय बँकेने जूनच्या बैठकीत वृद्धीचा अंदाज २०२० मधील -८.७ वर नोंदवला. मागील बैठकीत तो -८ एवढा होता. २०२१ मध्ये, ईसीबीला आणखी ५ टक्क्यांनी तर २०२२ मध्ये ३.२ टक्क्यांनी सुधारणा अपेक्षित आहे.

२०२० मधील दुस-या तिमाहीत युरोझोनचा जीडीपी आकसला: कोव्हिड-१० मुळे झालेले देशांमध्ये झालेले लॉकडाऊन, बंद उद्योग आणि ग्राहकांची क्रयशक्तीवर परिणाम झाल्याने युरोझोनमधील अर्थव्यवस्था २०२० मधील दुस-या तिमाहीत १२.१ टक्क्यांनी घसरली.

स्पेनसह इटली या देशांची अर्थव्यवस्था १८.५ टक्क्यांनी घसरून अधिक खालावली आहे. फ्रान्स, पोर्तुगाल आणि इतर देशांनीही या तिमाहीत तीव्र घट सहन केली. साथीच्या आजाराचा परिणाम प्रत्येकच देशाला भोगावे लागत आहेत. १९९५ च्या सुरुवातीपासूनच संपूर्ण चलन समूहात मोठी घसरण दिसून येत आहे.

आऊटलुक: अमेरिकेतील कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येने गाठलेले शिखर हळू हळू कमी होत आहे. मात्र, दैनंदिन रुग्णात अजूनही वाढ होतच आहे. दैनंदिन रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असतानाच मृत्यूदरही कायम आहे. तथापि, जागतिक आरोग्य संघटनेने, यापूर्वीच युरोपमधील विषाणूच्या संभाव्य दुसऱ्या लाटेविषयी युरोपियन देशांना इशारा दिला होता. स्पेन, फ्रान्स आणि इटलीसाठी तो खरा ठरला. मात्र या देशांतील नेत्यांनी पुढील देशव्यापी लॉकडाऊनची शक्यता फेटाळली आहे.

ताज्या चलन धोरणाच्या बैठकीत अमेरिकी फेडरलने म्हटले की, २०२३ या वर्षापर्यंत जवळपास शून्य व्याजदर ठेवला जाईल. ईसीबीचे तसे धोरणही आहे. ईसीबी ढेपाळलेल्या अर्थव्यवस्थांनाही सातत्याने पाठिंबा देण्यास तयार आहे. परंतु, आणखी आर्थिक मदतीची अपेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, साथीचा आजार सुरू झाल्यापासून, अमेरिकेच्या १० वर्षाच्या खजिन्यातही घट होत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील सुधारणा प्रगतीपथावर असण्याबाबत गुंतवणूकदार अजूनही सावध आहेत. अमेरिकेच्या १० वर्षांचे उत्पादन फेब्रुवारी २०२० मधील साथपूर्वी काळातील १.६८४% वरून सप्टेंबर २०२० मध्ये ०.६६६% पर्यंत घसरले आहे.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy