बँकिंग क्षेत्रात सुधारणा; बेंचमार्क निर्देशांकात वाढ


  • बँकिंग क्षेत्रात सुधारणा; बेंचमार्क निर्देशांकात वाढ


मुंबई, ७ सप्टेंबर २०२०: बँकिंग क्षेत्रात सुधारणा दिसल्यानंतर अस्थिर व्यापारी सत्रात भारतीय निर्देशांकांनी काहीसा नफा कमावत वृद्धी घेतली. निफ्टी ०.१९% किंवा २१.२० अंकांनी वाढला व ११,३५५.०५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील ०.१६% किंवा ६०.०५ अंकांनी वाढला व ३८,४२७.२३ अंकांवर विसावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १२१२ शेअर्सनी वृद्धी घेतली, १४६१ शेअर्स घसरले आणि १८७ शेअर्स स्थिर राहिले. भारती इन्फ्राटेल (५.७५%), एचडीएफसी लाइफ (३.२८%), डॉ. रेड्डीज लॅब्स (२.५२%), आयटीसी (१.९३%) आणि हिंदुस्थान युनिलिव्हर (१.९०%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर एमअँडएम (३.४३%), युपीएल (२.६१%), बजाज फायनान्स (२.४७%), गेल (२.२४%) आणि एनटीपीसी (२.२२%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.

निफ्टी एफएमसीजी हा आज सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा ठरला. तर आयटी सेक्टरदेखील वाढीसह बंद झाले. ऑटो, बँक, एनर्जी, इन्फ्रा मात्र लाल रंगात बंद झाले. बीएसई मिडकॅप ०.७८% नी घसरले तर स्मॉलकॅपने ०.२०% नी घसरण केली.

तेजस नेटवर्क्स लि.: कंपनीने फायबर टू द होम जीपीओएन इक्विपमेंटसाठी स्टरलाइट टेक्नोलॉजीज आणि एलअँडटी कंस्ट्रक्शनकडून ३२ कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली. कंपनीचे स्टॉक्स वाढून ४.९७% नी वाढून ६४.४० रुपयांवर व्यापार केला.

मॅन इंडस्ट्रिज (इंडिया)लि.: कंपनीने नुकतेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कडून ३७० कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स २.३०% नी वाढले व त्यांनी ६२.४० रुपयांवर व्यापार केला.

व्होडाफोन आयडिया लि.: कंपनीने तिचा ब्रँड लोगो “Vi” हा एकत्रित केला, यातून दोन दूरसंचार कंपनीचा बोध होतो. यानंतर कंपनीचे स्टॉक्स २.९०% नी वाढून त्यांनी १२.४० रुपयांवर व्यापार केला.

स्टर्लिंग अँड विल्सन सोलर लि.: कंपनीने ३०० मेगावॅट क्षमतेच्या देशातील दोन मोठ्या सौर प्रकल्पांसाठी ३०० दशलक्ष एयुडी ऑर्डरवर स्वाक्षरी केली. कंपनीच्या शेअर्समध्ये २.०५% ची वाढ झाली व त्यांनी २७४.३० रुपयांवर व्यापार केला.

स्टील स्ट्रिप्स व्हिल्स लि.: कंपनीने अमेरिका व युरोप ट्रेलर मार्केटसाठी जवळपास १२,००० चाकांची निर्यात ऑर्डर मिळवली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स १.०२% नी वाढले व त्यांनी ४६०.०० रुपयांवर व्यापार केला.भारतीय रुपया: अस्थिर देशांतर्गत बाजारामुळे आजच्या व्यापारी सत्रात भारतीय रुपया खालावला व अमेरिकी डॉलरच्या तुलनेत त्याने ७३.३५ रुपयांचे मूल्य कमावले.

भारतीय रुपया: अस्थिर देशांतर्गत बाजारामुळे आजच्या व्यापारी सत्रात भारतीय रुपया खालावला व अमेरिकी डॉलरच्या तुलनेत त्याने ७३.३५ रुपयांचे मूल्य कमावले.

जागतिक बाजार: आजच्या सत्रात कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या मंदीमुळे युरोपियन स्टॉक्सनी उच्चांकी व्यापार केला तर आशियाई स्टॉक्सनी घसरणीचा व्यापार केला. नॅसडॅक, निक्केई २२५ आणि हँगसँगने अनुक्रमे १.२७%, ०.५०% आणि ०.४३% घट अनुभवली तर एफटीएसई एमआयबी आणि एफटीएसई १०० ने अनुक्रमे १.२६% आणि १.५८% नी वृद्धी घेतली.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth