‘अशोक लेलँड’ने ‘बडा दोस्त’ सादर करून ‘एलसीव्ही पोर्टफोलिओ’चा केला विस्तार

 अशोक लेलँडने बडा दोस्त’ सादर करून एलसीव्ही पोर्टफोलिओचा केला विस्तार

 


                                  
 

चेन्नई14 सप्टेंबर 2020 - भारतातील आघाडीच व्यावसायिक वाहन उत्पादक व हिंदुजा समुहाची एक प्रमुख कंपनी, अशोक लेलँड’ हिने हलक्या व्यावसायिक वाहनांच्या (लाईट कमर्शियल व्हेइकल - एलसीव्ही) विभागात बडा दोस्त ही उत्पादन श्रेणी सादर करून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. ही श्रेणी सादर करून कंपनीने आपल्या एलसीव्ही वाहनांच्या बाजारपेठेचा विस्तार केला आहे. या कंपनीची दोस्त या नावाची श्रेणी विश्वासार्हताइंधनाची बचत आणि आरामदायीपणा या वैशिष्ट्यांमुळे या पूर्वीच लोकप्रिय झालेली आहे. तिच्या आधारावरच बडा दोस्त ही नवी मालिका सादर करण्यात आली आहे. ग्राहकाभिमुख तंत्रज्ञान आणि चालकाची आरामदायी सोयअशी वैशिष्ट्ये असलेली ही उत्पादन मालिका समकालीन आणि भविष्यकालीनही आहे. नवीन बीएस-6’ इंजिनसह सुसज्ज असलेल्या या मालिकेत आय-4’ व आय-3’ ही दोन मॉडेल्स सादर करण्यात आली आहेत. त्यांची वजन पेलण्याची क्षमता अनुक्रमे 1,860 किलो आणि 1,405 किलो इतकी आहे. या श्रेणीत ही सर्वोत्तम क्षमता मानली जाते. सुरुवातीस 7  राज्यांमध्ये बडा दोस्त सादर करण्यात येत असून पुढील महिन्यांत हा श्रेणी देशभरात हळूहळू उपलब्ध होईल. तिची नोंदणी व डिलिव्हरी प्रत्यक्ष स्वरुपात व डिजिटल या दोन्ही पद्धतींनी उपलब्ध करून देण्यात येत आहे. बडा दोस्तच्या किंमती आय-3 एलएस व एलएक्स या मॉडेल्ससाठी अनुक्रमे 7.75 लाख व 7.95 लाख रु. आणि आय-4 एलएस आणि एलएक्स या मॉडेल्ससाठी अनुक्रमे 7.79 लाख व 7.99 लाख रु. (एक्स शोरूममुंबई) अशा आहेत.

अशोक लेलॅंडचे अध्यक्ष धीरज हिंदुजा या प्रसंगी म्हणाले, “व्यावसायिक वाहन निर्मितीमध्ये जागतिक स्तरावर पहिल्या 10 कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याच्या आमच्या ध्येयाच्या मार्गात आजचा दिवस हा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. एलसीव्ही क्षेत्रात महत्त्वाची कंपनी म्हणून प्रस्थापित होण्याच्या आमच्या दीर्घकालीन धोरणाचा आम्ही नव्याने विकसीत केलेला प्लॅटफॉर्म हा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्लॅटफॉर्मवर बडा दोस्त’ ‘आय-3 व आय-4’ या दोन मॉडेल्सची बांधणी करण्यात आली आहे. याशिवाय इतरही अनेक वैशिष्ट्ये या मॉडेल्समध्ये असल्याने त्यामुळे कंपनीचा एलसीव्ही उत्पादनांचा पोर्टफोलिओ परिपूर्ण होत आहे. या श्रेणीतील वाहनांमध्ये लेफ्ट हॅंड ड्राईव्ह व राईट हॅंड ड्राईव्ह हे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात येत असल्यानेतिचे आंतरराष्ट्रीय बाजारात आक्रमकपणे मार्केटिंग करणे सोयीचे होणार आहे. आगामी काळात ही वाहने विद्युत स्वरुपातही सादर करण्याचा आमचा विचार आहे.’’

अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन सोंधी म्हणाले, “एलसीव्ही विभागात आमच्यासाठी प्रचंड संधी आहेत. सध्याच्या बाजारपेठेमध्ये व्यावसायिक वाहन (सीव्ही) उद्योगाच्या वाढीमध्ये या एलसीव्ही विभागाचे योगदान मोठे आहे. एलसीव्हीच्या बाजारपेठेत प्रचंड वाव आहे. बडा दोस्तच्या सहाय्याने आम्ही त्यात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये आमच्या एकूण विक्रीमध्ये एलसीव्हींचा वाटा 40 टक्के इतका असल्यानेहा विभाग आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चालू आर्थिक वर्षातही एलसीव्ही विभागात आम्ही आणखी वाढ पाहात आहोत. नवीनदणकट अशी बडा दोस्त श्रेणी सादर झाल्यानेगुणवत्ता व फायदेशीरपणा यांना महत्त्व देणाऱ्या जगभरातील आमच्या ग्राहकवर्गाचा विस्तार होईल, अशी आम्हाला आशा आहे.’’

अशोक लेलॅंडचे सीओओ नितीन सेठ यांनी नमूद केले, “आमची दोस्त एलसीव्ही वाहने आपापल्या विभागातील सर्वात यशस्वी वाहने ठरली आहेत. 2011-12 मध्ये दोस्त श्रेणी सुरू झाल्यापासूनमॉडेल्सची संख्या कमी असूनही आम्ही बाजारपेठेतील मोठा वाटा उचलत राहिलो आहोत. दोस्त श्रेणीच्या एसलीव्हीमध्ये चालकाला कारसारखा अनुभव येत असल्यानेआणि आम्ही ग्राहक केंद्रित दृष्टिकोन बाळगत असल्याने, दोस्त ब्रॅंडने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. मला खात्री आहे की बडा दोस्त’ हे योग्य वेळी आलेले योग्य उत्पादन आहे आणि त्यातून दोस्त’ ब्रँडचा वारसा अधिक उंचीवर नेला जाईल. होसूर येथे नव्याने सुरू झालेल्या आमच्या अत्याधुनिक व पूर्णपणे रोबोटिक क्यूबिंग लाइनवर बडा दोस्तचे उत्पादन होईल. 24 तास सेवा आणि सर्वोत्कृष्ट अनुभव यातून आपकी जीतहमारी जीत हे आमचे ब्रॅंड तत्वज्ञान ग्राहकांच्या मनावर ठसेल.’’

नवीन मजबूत एलसीव्ही प्लॅटफॉर्मवर तयार केले गेलेले बडा दोस्त हे सर्वात पहिले उत्पादन आहे. या श्रेणीतील आय-3 व आय-4 ही दोन मॉडेल्स सर्वप्रथम सादर होतील. या वाहनात 80 एचपी बीएस-6’ इंजिन बसविण्यात आले आहे. ते या श्रेणीतील सर्वोत्तम शक्ती व इंधन-बचत क्षमता देते. तसेच यामध्ये श्रेणीतील सर्वोत्तम अशी वजन पेलण्याची क्षमता आणि भार वाहून नेणाऱ्या बॉडीची लांबी देण्यात आली आहे. या वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांना प्रत्येक फेरीमध्ये अधिक नफा मिळविण्यास मदत होते. गाडी कमी जागेत वळण्याची क्षमता व या श्रेणीमधील सर्वोत्तम ग्राऊंड क्लीअरन्स यांमुळे बडा दोस्त हे शहरांतर्गत फेऱ्या व दोन शहरांमधील प्रवास यासाठीचे आदर्श वाहन ठरतेतसेच सर्व प्रकारच्या रस्त्यांवर ते सहजपणे धावते.

बडा दोस्तमध्ये या प्रकारच्या गाड्यांमध्ये प्रथमच सादर होणारे 3-सीटर वॉकथ्रू केबिन आहेजे चालकाला उत्कृष्ट आराम देते. फोल्डेबल बॅक रेस्ट आणि कोलॅप्सिबल हँड-ब्रेक असल्यामुळे ग्राहक दोन फेऱ्यांमधील वेळेत चांगल्याप्रकारे आराम करू शकतो. एर्गोनॉमिकल स्थितीत डॅश माउंट केलेली गीअर शिफ्ट लीव्हर’, ‘ड्युअल टोन डॅशबोर्ड आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर’ यांमुळे हे वाहन अतिशय आकर्षक दिसते आणि ग्राहकाला प्रीमियम कारसारखा अनुभव देते. हे वाहन पॉवर स्टीयरिंगसह सुसज्ज आहे आणि यामध्ये एसीचादेखील पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे चालकाला लांबवरच्या प्रवासात आनंददायक अनुभव मिळतो.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.