जागतिक विद्युत वाहन दिनाची संस्थापक-भागीदार, ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’तर्फे हलक्या विद्युत वाहनांसाठी जागतिक दर्जाचा विद्युतीकरण उपाय सादर


जागतिक विद्युत वाहन दिनाची संस्थापक-भागीदार, महिंद्रा इलेक्ट्रिकतर्फे
हलक्या विद्युत वाहनांसाठी जागतिक दर्जाचा विद्युतीकरण उपाय सादर
·         विद्युत वाहने जागतिक स्तरावर नेण्यासाठी महिंद्रा इलेक्ट्रिकची ग्रीन.टीव्हीशी हातमिळवणी
·         हलक्या विद्युत वाहनांसाठी मेस्मा 48’ प्लॅटफॉर्मचे जागतिक स्तरावर सादरीकरण

बंगळुरू9 सप्टेंबर2020 : विद्युत वाहनांचे महत्त्व अधोरेखीत करण्याच्या उद्देशाने पहिला जागतिक विद्युत वाहन दिन (वर्ल्ड इव्ही डे) आजदि. 9 सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. या विद्युत वाहन दिनाची संकल्पना मांडणाऱ्या संस्थांपैकी एक असल्याचा अभिमान महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड या कंपनीने व्यक्त केला आहे. ग्रीन.टीव्हीद्वारे हा जागतिक विद्युत वाहन दिन आयोजित केला जात आहे. विद्युत वाहनांबद्दल जागतिक स्तरावर जागरूकता वाढवण्यासाठी ही संस्था समर्पित आहे. या खास दिवशीविद्युत वाहनांच्या फायद्यांवर जागतिक नेते एकत्रितपणे प्रकाश टाकणार आहेत व जागतिक व्यासपीठावर या वाहनांना प्रोत्साहन देणार आहेत.
भविष्यातील वाहनांचा प्रवास आता सुरू झाला आहे’, असे सांगून महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटीइंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, विद्युत वाहनांच्या माध्यमातून वाहतुकीच्या क्षेत्रात आमुलाग्र क्रांती घडून आणण्याचे आणि ही वाहने जनतेपर्यंत नेण्याचे आमचे ध्येय आहे. जागतिक बाजारपेठेसाठी पुढील मोठ्या कल्पनांबद्दल चर्चा करण्यासाठी जागतिक विद्युत वाहन दिन’ हा एक चांगला मंच आहे. आम्ही आमच्या मेस्मा 48’ या प्लॅटफॉर्मचे जागतिक स्तरावर सादरीकरण करण्याची या ठिकाणी संधी घेत आहोत.
महिंद्रा इलेक्ट्रिकचा मेस्मा 48’ हा प्लॅटफॉर्म जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक गुणवत्ता असलेला आहे. तो कमी खर्चिक आहे. कंपनीच्या सर्वाधिक वापरल्या गेलेल्या इव्ही तंत्रज्ञान सोल्यूशन संरचनांपैकी तो  एक आहे. हा प्लॅटफॉर्म गरजेनुसार बदलता येण्याजोगा आहे. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवरील 11,000 विद्युत वाहने भारतीय रस्त्यांवर धावत आहेत. तीन चाकीक्वाड्रिसायकल आणि अगदी लहान कार या श्रेणीतील गाड्यांचे विद्युतीकरण या प्लॅटफॉर्मवर करता येते. या प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत..
वैशिष्ट्ये :
·         कार्यक्षमता व विस्तार कक्षा या दोन्ही बाबतींत हा प्लॅटफॉर्म गरजेनुसार बदलता येण्याजोगा आहे. 44 व्होल्ट ते 96 व्होल्ट या टप्प्यांतील व्होल्टेज सिस्टीम यामध्ये देता येते.
·         इंटर्नल कम्बश्चन इंजिन्सच्या (आयसीई) तुलनेत या प्लॅटफॉर्मवरील गाड्या अधिक प्रवेग (अॅक्सलरेशन) देऊ शकतात.
·         लिक्विड व एअर कूल्ड या दोन्ही प्रकारांमध्ये आवश्यकतेनुसार कॉम्पोनंट्स यामध्ये उपलब्ध आहेत.
·         6 किलोवॅट ते 40 किलोवॅट इतकी शक्ती आणि 40 एनएम ते 120 एनएम इतका टॉर्क असणारा ड्राईव्हट्रेन’, हा यामध्ये कार्यक्षमतेच्या आवश्यकतेनुसारतीन भिन्न ट्रान्समिशन रेशोंमध्ये उपलब्ध करून केला जाऊ शकतो.
·         मेस्मा 48 प्लॅटफॉर्ममधून 80 किमी प्रति तासापर्यंतची उच्च गती मिळविता येते. प्रवाशांसाठी तसेच मालवाहतुकीसाठी ती योग्य आहे.
·         कडक व लवचिक या दोन्ही अॅक्सल सिस्टीमसह सुसंगत असलेला मेस्मा 48 प्लॅटफॉर्म’ ‘एल 5’, ‘एल 6 आणि एल 7 श्रेणीसाठी योग्य आहे.
·         ड्राइव्हट्रेनबॅटरी पॅकइलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्सपॉवर इलेक्ट्रॉनिक्स (एमसीयूओबीसीएलडीसीपीडीयू)त्यांच्याशी संबंधित सॉफ्टवेअरसॉफ्टवेअर कॅलिब्रेशनव्हेईकल इंटिग्रेशन आणि चाचण्यांची क्षमता हे विद्युत वाहनाचे सर्व घटक या प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रित स्वरुपात उपलब्ध असल्यामुळे उत्पादन वेगाने सुरू होण्यास मदत होऊ शकते.
कमी खर्च :
·         या प्लॅटफॉर्ममधील एकात्मिक ड्राइव्हट्रेन सोल्यूशनमुळे उच्च स्वरुपाची उर्जा घनता मिळू शकते. ती कमी खर्चिक असते. .
·         कमी खर्चिकअत्यधिक मजबूततपमान सहन करणारे एलएफपी सेल्स आणि उच्च उर्जा घनतेच्या एनएमसी सेल्स यांचा वापर करीत असल्यानेकार्यक्षमताव्यापकताकिंमत आणि पर्यावरणीय आवश्यकतांशी जुळण्याची प्लॅटफॉर्ममध्ये क्षमता.
·         टर्नकी सोल्यूशन्स पुरवणारी कंपनी या नात्यानेमहिंद्रा इलेक्ट्रिक गुंतवणूक कमी करण्यास आणि कमी केलेल्या खर्चाचे लाभ ग्राहकांना मिळू देण्यात मदत करू शकते.
मानके :
·         चाडेमो’, जीबीटी’, सीसीएस व बीसीपी यां सारख्या सर्व प्रमुख चार्जिंग प्रोटोकॉल्सशी सुसंगत ऑन-बोर्ड चार्जर (ओबीसी)
·         18 सेल्स सिरीजमध्ये असलेल्या सिस्टीमसाठी यातील बीएमएस डिझाईन केलेला आहे आणि तो आयएसओ 26262 एएसआयएल-बीला जुळणारा आहे.
कामगिरी :
·         महिंद्राच्या विद्युत वाहनांनी आतापर्यंत भारतीय रस्त्यांवर 23.4 कोटी किलोमीटर्सचे अंतर पार पाडले आहे.
·         दशकभराचा अनुभव असलेले कंपनीचे 600 सदस्यांचे कुशल पथक विद्युतीकरण तंत्रज्ञानातील विविध सोल्युशन्स देऊ करते.
·         कंपनीने जागतिक पातळीवर 50 हून अधिक पेटंट दाखल केले आहेत.
ग्रीन.टीव्ही’ या शाश्वत विचारांच्या माध्यम कंपनीचे संस्थापक एड थॉमस म्हणाले: वाहन उद्योगात शाश्वत स्वरुपाचे तंत्रज्ञान रुजावेयाकरीता मदत करणारा दिवस म्हणून मी जागतिक विद्युत वाहन दिनाकडे पाहतो. महिंद्रा इलेक्ट्रिक ही भारतात विद्युत वाहन तंत्रज्ञानातील प्रवर्तक कंपनी आहे आणि हा आमचा दृष्टिकोन तीही मानते. मला हे सांगण्यात आनंद होतो कीमहिंद्रा इलेक्ट्रिकइतर जागतिक ओईएमचार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या आणि वाहन उद्योगातील स्टार्ट-अप्स या सर्वांनी एकत्र येऊन हा प्रत्यक्ष बदल घडवणारा दिवस साजरा केला आहे.
मेस्माविषयी
महिंद्रा इलेक्ट्रिक स्केलेबल मॉड्यूलर आर्किटेक्चर (एमईएसएमए - मेस्मा) हे भारतातील पहिले इलेक्ट्रिक आर्किटेक्चर आहे. विद्युत वाहन तंत्रज्ञानात दशकभराचा अनुभव असलेल्या आमच्या तज्ज्ञांनी व अभियंत्यांनी त्याचे डिझाइन केले आहे. बॅटरी सेल्स वगळता या आर्किटेक्चरचे सर्व घटक आमच्या भारतातील कारखान्यात तयार करून जुळवले जात आहेत. विद्यमान आयसीई वाहनांचे विद्युत वाहनांमध्ये रूपांतर करण्यासाठीतसेच नवीन विद्युत वाहने तयार करण्यासाठी हे आर्किटेक्चर उपयुक्त आहे. मेस्मा तत्वज्ञानाअंतर्गतआमच्याकडे मेस्मा 48’, ‘मेस्मा 72 आणि मेस्मा 350’ यांसारख्या प्लॅटफॉर्मची श्रेणी आहे. ती विविध प्रकारच्या वाहनांसाठी उपयोगात आणली जाऊ शकते.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.