संगीत निर्मात्यांचे सबलीकरण करण्यासाठी डॉल्बी लॅबोरेटरीज आणि आयपीआरएस एकत्र

 संगीत निर्मात्यांचे सबलीकरण करण्यासाठी डॉल्बी लॅबोरेटरीज आणि आयपीआरएस एकत्र  

मुंबई, सप्टेंबर, 2020: डॉल्बी लॅबोरेटरीज आयएनसी. (NYSE:DLB) या त्रिमितीय ऑडीओ आणि व्हिडीओ मनोरंजनातील अग्रणी कंपनीने आज ‘द इंडियन पर्फोर्मिंग राईट सोसायटी लिमिटेड’ (आयपीआरएस) च्या सदस्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रमाची सुरुवात करत असल्याची घोषणा केली.  भारतातील सोल पर्फोर्मिंग राईट ऑर्गनायझेशनमध्ये संपूर्ण देशातील 6000 हून अधिक प्रख्यात संगीत लेखक, संगीतकार आणि प्रकाशक आहेत.  या कार्यक्रमाच्या माध्यमातून सदस्यांना इतर उपक्रमांच्या बरोबरीने तंत्रज्ञान आणि कार्यप्रवाह यांचा समावेश असलेल्या डॉल्बी अॅटमॉस® म्युझिक वेबीनार मालिका, डॉल्बी अॅटमॉस ट्युटोरिअल मालिका, डॉल्बी इन्स्टिट्यूट मास्टरक्लासला हजर राहण्याची संधी मिळणार आहे तसेच डॉल्बी अॅटमॉस प्रॉडक्शन सूट मोफत आजमावून पाहता येणार आहे.

या कार्यक्रमाविषयी बोलताना, डॉल्बी लॅबोरेटरीज इमर्जिंग मार्केट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पंकज केडिया म्हणाले, ”डॉल्बी अॅटमॉस हा रचनाकारांसाठी आणि संगीत प्रेमींसाठी नवा अनुभव असणार आहे. रचनाकारांना त्यांच्या रेकॉर्डिंग्जच्या माध्यमातून निरनिराळे प्रयोग करण्यासाठी आणि स्वत:ला व्यक्त करण्यासाठी विविध शक्यतांची मोठी संधी यातून मिळणार आहे.  आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगीत निर्मिती आणि अनुभवांची व्याख्या डॉल्बी अॅटमॉस कशाप्रकारे करते हे समजण्याची संधी भारतातील संगीत रचनाकारांना आणि प्रकाशकांना देऊ करणार आहोत.”

आयपीआरएसचे अध्यक्ष श्री. जावेद अख्तर म्हणाले, ”आमच्या सदस्यांना डॉल्बी अॅटमॉस संगीत शिकण्याची संधी मिळावी म्हणून डॉल्बीसोबत भागीदारी करण्यास आयपीआरएस उत्सुक आहे. डॉल्बीच्या या कार्यक्रमामुळे भारतातील संगीतप्रेमी समुदाय त्यांच्या संगीतात नेत्रदीपक आणि आश्चर्यकारक अनुभव निर्माण व्हावा यासाठी उद्युक्त होईल.  याखेरीज त्यांना नव्या संधी उपलब्ध होतील.”

आयपीआरएसचे सीईओ श्री. राकेश निगम म्हणाले, “झपाट्याने बदलत असलेल्या संगीत क्षेत्रात, संगीत रचनाकारांना तांत्रिक प्रगतीचा योग्य वापर करता यावा यासाठी नवनव्या बदलांची माहिती करून घेण्याची मोठी गरज आज निर्माण झाली आहे.  आमच्या सदस्यांना भविष्यासाठी सक्षम करण्यासाठी तसेच योजनाबद्ध रीतीने मूल्य वाढ करण्यासाठी आमच्या आयपीआरएस 2.0 पुढाकाराचा एक भाग म्हणून डॉल्बी लॅबोरेटरीजशी हातमिळवणी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.  या सहकार्यातून, ऑडिओ निर्मितीमधील या यशस्वी नैपुण्याद्वारे आमच्या सदस्यांच्या कौशल्यात वाढ करण्याचा आणि श्रोत्यांना अविस्मरणीय अनुभव देता यावा यासाठी प्राविण्य मिळवून देण्याचा आमचा हेतू आहे.”  

डॉल्बी अॅटमॉस म्युझिक काय आहे?
संपूर्ण क्षमतेने आणि सृजनशील संभाव्यतेने संगीताशी जोडले जाण्याचा एखादा मार्ग आहे अशी कल्पना करा- आज बहुतांश लोक ज्याप्रकारे संगीत ऐकतात त्या पद्धतीने नव्हे तर आपल्याला सुरावटीच्या हिंदोळ्यावर घेऊन जाणारे आणि पारंपारिक रेकॉर्डिंगमधले आपण काय गमावले आहे हे जाणवून देणारे खरे संगीत!!  डॉल्बी अॅटमॉस अगदी हेच करते.  श्रोत्यांच्या सभोवताली अतिशय किचकट असा वाद्यांचा मेळ असो की खोलीभर पसरणारी फक्त गिटारची सुरावट असो अथवा आपल्याला घेरून टाकणारा गूढ-गंभीर बास प्रभाव असो,  गायकाचा ऐकू येईल न येईल असा श्वास असो... कलाकाराला अपेक्षित असणारा प्रत्येक तपशील आणि भावनांना मोकळीक देणारे संगीत डॉल्बी अॅटमॉस देऊ करते.  

डॉल्बी अॅटमॉस म्युझिकबाबत जास्त माहिती घेण्यासाठी music.dolby.com या संकेतस्थळाला भेट द्या.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth