शतकपूर्ती साजरी करण्‍यासाठी नवीन स्थान व नवीन दृष्टिकोनासह कन्साई नेरोलॅक न्यु नॉर्मल साठी सज्‍ज


शतकपूर्ती साजरी करण्यासाठी नवीन स्थान  नवीन दृष्टिकोनासह 
कन्साई नेरोलॅक न्यु नॉर्मल साठी सज्

~ ब्रॅण्‍डचा 'कलर्स दॅट केअर' निर्मितीचा मनसुबा ~
मुंबई, २ सप्‍टेंबर २०२०: कन्‍साई नेरोलॅक पेंट्स लि.ने त्‍यांच्‍या शतकपूर्तीनिमित्त नवीन स्थान व नवीन ब्रॅण्‍ड दृष्टिकोनाचे अनावरण करत या प्रसंगाला साजरे करण्‍याचे ठरवले आहे. नवीन व्हिज्‍युअल ओळख शुद्ध, निर्मळ व सर्वात महत्त्वपूर्ण घटकांना वेगळे करण्‍यासाठी निसर्गाच्‍या प्रत्‍येक घटकाचा समावेश असलेल्‍या 'मंथन'मधून प्रेरित आहे. ही ओळख काळाच्‍या गरजेची आणि नेरोलॅकची ग्राहक व भागधारकांना पुढील दिशेने वाटचाल करण्‍यामध्‍ये मदत करणा-या मनसुब्‍याचे प्रतीक आहे. आरोग्‍यदायी घरगुती पेंट्समध्‍ये (अल्‍ट्रा-लो व्‍हीओसी व अल्‍ट्रा-लो ओडर) अग्रस्‍थानी असलेल्‍या ब्रॅण्‍डचा आरोग्‍यदायी व सुरेख भविष्‍यासाठी पेंट्स व सोल्‍यूशन्‍सची निर्मिती करत ग्राहकांच्‍या जीवनांमध्‍ये सक्रिय भूमिका बजावण्‍याचे कार्य सुरू ठेवण्‍याचा मनसुबा आहे. हा दृष्टिकोन आपण मानवतेसंदर्भात पूर्वी सामना न केलेल्‍या आव्‍हानांच्‍या सध्‍याच्‍या अनपेक्षित काळाशी अत्‍यंत संबंधित आहे.
'कलर्स दॅट केअर' हे ब्रॅण्‍डचे नवीन स्थितीमधील निवेदन आहे आणि 'आज केअरफुल तो कल कलरफुल' नावाची नवीन मोहिम सुरू करण्‍यात आली आहे. ही मोहिम हॅशटॅग #ACKC ला चालना देते, जी नवीन स्थितीला आजच्‍या काळातील संदर्भाशी संलग्‍न करते. ब्रॅण्‍डकडून डिजिटल जाहिरातींची शृंखला सादर करण्‍यात आली आहे. या जाहिराती लोकांना सध्‍याच्‍या काळात जग शाश्‍वत व उज्‍ज्‍वल भविष्‍याची पुनर्निर्मिती करण्‍याचा प्रयत्‍न करत असताना जबाबदारीने वागण्‍यास प्रोत्‍साहित करत आहेत.
वर्ष १९२० मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेली कन्‍साई नेरोलॅक पेंट्स ही भारतातील सर्वात मोठी पेंट कंपनी आहे, तसेच ही ऑटोमोटिव्‍ह, पावडर कोटिंग व उच्‍च कार्यक्षमता अशा हाय-टेक विभागांमधील अग्रणी आणि औद्योगिक विभागातील उच्‍च कार्यक्षम कंपनी आहे. १०० वर्षांचा अनुभव व कौशल्‍ये आणि नाविन्‍यतेसंदर्भात अग्रस्‍थानी असण्‍याच्‍या इतिहासासह ब्रॅण्‍ड दर्जेदार औद्योगिक व घरगुती पेंट्सची व्‍यापक रेंज निर्माण करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी राहिला आहे. यामध्‍ये लो व्‍हीओसी, लो ओडर, नो अॅडेड लीड, अॅण्‍टी-बॅक्‍टेरिअल उत्‍पादने, एचडी फिनिशेस्, फास्‍ट ड्राइ, टेम्‍परेचर रिडक्‍शन यांसह विविध लाभ देणा-या पेंट्सचा समावेश आहे.
याप्रसंगी बोलताना कन्‍साई नेरोलॅक पेंट्स लि.चे उपाध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. एच. एम. भारूका म्‍हणाले, ''नेरोलॅकचा नेहमी भावी पिढ्यांसाठी आरोग्‍यदायी व सुरेख वातावरणाला प्राधान्‍य देणारी उत्‍पादने व सोल्‍यूशन्‍स निर्माण करण्‍यावर विश्‍वास राहिला आहे. आम्‍ही पुढील १०० वर्षांसाठी नवीन दृष्टिकोन व सुधारित फोकससह आमच्‍या व्‍यवसाय कार्यसंचालनाकडे लक्ष देण्‍याचे ठरवले तेव्‍हा आम्‍हाला आजच्‍या काळामध्‍ये ब्रॅण्‍ड म्‍हणून ते आमच्‍यासाठी किती लक्षणीय पाऊल असेल हे माहित नव्‍हते. आम्‍हाला आमच्‍या १०० वर्षे प्रवासाचा अभिमान वाटतो. आम्‍ही आमच्‍या प्रवासाचा भाग राहिलेले आमचा प्रत्‍येक भागीदार व ग्राहक यांच्‍याकडून सातत्‍याने मिळालेला पाठिंबा व प्रोत्‍साहनासाठी त्‍यांचे आभार मानतो. आता पुढील दिशेने वाटचाल करण्‍याची वेळ आली आहे.'' 
कन्‍साई नेरोलॅक पेंट्स लि.चे कार्यकारी संचालक श्री. अनुज जैन म्‍हणाले, ''नवीन ओळख ही सोल्‍यूशन्‍स व पद्धती निर्माण करण्‍यासाठी आमच्‍या तंत्रज्ञान कौशल्‍यांचा लाभ घेत अंतर्गत व बाहेर सादर करण्‍यास सज्‍ज असलेल्‍या धोरणात्‍मक उपक्रमांची फक्‍त सुरूवात आहे. हे सोल्‍यूशन्‍स व पद्धती लोक व समाजासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्‍यदायी व सुरक्षित वातावरणाची निर्मिती करण्‍यामध्‍ये मदत करतील.''

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.