कमकुवत डॉलरमुळे सोने व बेस मेटलच्या दरांना आधार
कमकुवत डॉलरमुळे सोने व बेस मेटलच्या दरांना आधार
मुंबई, ३० सप्टेंबर २०२०: अमेरिकी डॉलरचे अवमूल्यन झाल्याने स्पॉट गोल्ड आणि बेस मेटलच्या किंमतींना आधार मिळाला. अमेरिकेकडून अतिरिक्त मदतीच्या सुविधा मिळण्याच्या आशेनेही पिवळा धातू तसेच औद्योगिक धातूंच्या किंमतींना आधार मिळाला. तथापि, कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येतील वाढीमुळे तसेच जागतिक मागणीत घट झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घट दिसून आली असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
सोने: डॉलरची घसरण झाल्याने स्पॉट गोल्डचे दर ०.९०% नी वाढले व १८९७.७० डॉलर प्रति औसांवर बंद झाले. तसेच अमेरिकेकडून अतिरिक्त प्रोत्साहनपर मदतीच्या आशेनेही पिवळ्या धातूच्या दरांना आधार मिळाला. अर्थव्यवस्थेतील तफावत दूर करण्यासाठी अमेरिकन ट्रेझरी सेक्रेटरी स्टीव्ह म्युचिन आणि हाऊस स्पीकर नॅन्सी पॉवेल प्रयत्न करत आहेत. साथीच्या काळानंतर आर्थिक सुधारणेसाठी अमेरिकेकडून अतिरिक्त मदतीच्या उपाययोजना मिळण्यासंबंधीच्या आशा वाढल्या आहेत. त्यामुळेही सोन्याच्या दरांना आधार मिळाला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे डेमोक्रेटिक प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्यादरम्यान झालेल्या अध्यक्षीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर राजकीय अनिश्चिततेमुळे बाजारपेठ सावधगिरी बाळगून आहे. यामुळे सोन्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
कच्चे तेल: साथीच्या आजाराचा विस्तार वाढतच असल्याने डब्ल्यूटीआय क्रूड ३.२३% टक्क्यांनी घसरला आणि ३९.३ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाला. साथीमुळे मागणीत घट झाल्यानेही कच्च्या तेलाचे दर आणखी घसरले. कोव्हिड-१९च्या रुग्णसंख्येत जगभरात नव्याने वाढ झाल्याने जागतिक तेल बाजारात घसरण दिसून आली. यासोबतच प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानेही कच्च्या तेलाच्या अर्थकारणावर परिणाम दिसून आला.
ओपेकने उत्पादन कपातीचा निर्णय घेतल्यानंतरही लिबिया आणि ईराणने तेल निर्यात वाढवली. त्यामुळेही लिक्विड गोल्डचे दर घसरले.
बेस मेटल्स: अमेरिकी डॉलरचे अवमूल्यन झाल्यामुळे एलएमईवरील बेस मेटलचे दर सकारात्मक राहिले. अमेरिकेच्या प्रोत्साहनपर मदतीच्या आशेमुळे औद्योगिक धातूंच्या किंमती आणखी वाढल्या. तसेच विविध अर्थव्यवस्थांमध्ये साथीची दुसरी लाट आल्यानेही औद्योगिक धातूंचे अर्थकारण ढेपाळले.
चीनच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि मोठ्या प्रमाणावरील उपाययोजना यामुळे बेस मेटलचे दर सुधारले. तथापि, दीर्घकालीन सुधारणेच्या उणीवेमुळे या किंमतींबाबत सावधगिरी बाळगली जात आहे. आंतरराष्ट्रीय निकेल स्टडी ग्रुपने दिलेल्या वृत्तानुससार, जुलै २०१२ मध्ये जागतिक निकेल बाजाराची उलाढाल ८,९०० टनांवर घसरली.
तांबे: अमेरिकी डॉलरमध्ये घसरण आणि चीनमधील मजबूत सुधारणा यामुळे एलएमई कॉपरचे दर ०.४१% नी घसरले व ते ६,५७२.० डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. एलएमई साठ्यात अचानक वृद्धी झाल्यानेही तांब्यातील नफा मर्यादित राहिला. चीनकडून वाढती मागणी आणि अमेरिकेकडून अतिरिक्त मदतीच्या उपाययोजननांची आशा वाढल्याने औद्योगिक धातूंच्या दरांना आणखी आधार मिळू शकतो.
Comments
Post a Comment