या हंगामात तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी फलादा प्युअर आणि शुअरचा सेंद्रिय रोग प्रतिकारशक्ती बूस्टर लाँच
या हंगामात तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी फलादा प्युअर आणि शुअरचा
सेंद्रिय रोग प्रतिकारशक्ती बूस्टर लाँच
~ सेंद्रिय सुपरफूड आवळा पावडर आणि सेंद्रिय सुपरफूड त्रिफला पावडर ची नवीन श्रेणी ~
फलादा प्युअर आणि शुअर, भारताचा अग्रगण्य सेंद्रिय खाद्यपदार्थांचा ब्रँड, त्यांच्या ब्रँड पोर्टफोलिओमध्ये दोन नवीन सुपरफूड जोडली गेली आहेत. नवीनतम अद्ययावत सेंद्रिय सुपरफूड आवळा पावडर आणि सेंद्रिय सुपरफूड त्रिफळा पावडर ही स्वच्छ आणि निरोगी उत्पादने रोग प्रतिकारशक्ती आणि संक्रमणाशी लढण्यासाठी वापरली जाऊ शकतात. सद्य परिस्थिती पाहता, शरीराच्या प्रतिकार शक्तीची पातळी कायम ठेवणे आणि समृद्ध पोषक तत्वांनी भरलेल्या उत्पादनांचे सेवन करणे अत्यावश्यक आहे.
फलादा प्युअर आणि शुअर सेंद्रिय सुपरफूड आवळा पावडर वाळलेल्या एम्बेलिका ऑफिसिनेलिस फळापासून बनविलेले आहे जे व्हिटॅमिन सी आणि आयरन ने समृद्ध असते, ज्यामुळे रक्तवाहिन्या अधिक मजबूत आणि दाट होतात. समृद्ध अँटिऑक्सिडंट्स शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यासाठी आणि पेशींचे नुकसान आणि कर्करोग आणि जळजळ होण्याचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात. उच्च फायबर सामग्री बद्धकोष्ठतेसाठी एक प्रभावी उपचार आहे आणि हायपरऍसिडिटी आणि पोटातील अल्सरसाठी हा एक उत्तम घरगुती उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे. आवळ्याचे कोणत्याही स्वरूपातील सेवन दररोज वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करते आणि आपल्याला सुंदर, निरोगी त्वचा देते. फलादा प्युअर आणि शुअर सेंद्रिय सुपरफूड आवळा पावडरचा एक चमचा फलादा प्युअर आणि शुअर सेंद्रिय मधात मिसळून एक महान रक्त शुद्ध करण्याचे काम करते. सेंद्रीय सुपरफूड आवळा पावडरचे नियमित सेवन केल्याने नैसर्गिकरित्या हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
निव्वळ वजन: 100 ग्रॅम / नग | एमआरपीः रु. 210 / नग
फलादा प्युअर आणि शुअर सेंद्रिय सुपरफूड त्रिफळा पावडर 3 औषधी वनस्पतींचे एक मिश्रण आहे - आवळा (एम्ब्लिका ऑफिसिनलिस), बिभीताकी (टर्मिनलिया बेलीरिका), आणि हरिताकी (टर्मिनलिया चेबुला). पोटाच्या आजारांपासून दंत पोकळी या लक्षणांसमवेत असलेल्या विविध समस्यांच्या उपचारांसाठी आयुर्वेदिक औषधामध्ये हे मुख्य आहे. पॉलीहर्बल औषध म्हणून, त्रिफळा पावडर दीर्घायुषी बनवते आणि जुन्या/तीव्र आजारांना प्रतिबंधित करते. तिन्ही वनस्पतींच्या वाळलेल्या फळांमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरासाठी विविध संरक्षणात्मक कार्ये करतात. सेंद्रिय सुपरफूड त्रिफळा पावडरमध्ये व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनॉइड्स, पॉलिफेनॉल, टॅनिन आणि सॅपोनिन्स आणि इतर शक्तिशाली वनस्पती संयुगे देखील असतात जे अँटी-इंफ्लेमेटरी म्हणून कार्य करतात. नियमित सेवनाने हृदयरोग, काहीप्रकारचे कर्करोग, मधुमेह आणि अकाली वृद्धत्व येण्याचा धोका देखील कमी होतो.
निव्वळ वजन: 100 ग्रॅम / नग | एमआरपीः रु. 190 / नग
नवीन प्रतिकारशक्ती बूस्टर्सवर बोलताना फलादा सेंद्रिय ग्राहक उत्पादने प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक श्री. सूर्य शास्त्री. म्हणतात, “फलादा प्युअर आणि शुअर मध्ये आमच्या ग्राहकांना स्वच्छ आणि निरोगी खाद्य पर्याय उपलब्ध आहेत हे सुनिश्चित करणे हे आमचे ध्येय आहे. कोविड -१९ ची परिस्थिती लक्षात ठेवून आमच्या सुपरफूड्स प्रकारात, आम्ही सेंद्रिय सुपरफूड आवळा पावडर आणि सेंद्रिय सुपरफूड त्रिफळा पावडर आणले आहेत ज्यात आजार बरे करणारे, रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी आणि रोगापासून बचाव करण्यासाठी लागणारे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. सध्याचे वातावरण पाहता, आपण पोषक अन्न खाणे आणि ह्या विषाणूमुळे निर्माण होणा-या धोक्यांविरूद्ध लढाई करणे आवश्यक आहे. कच्चा माल थेट शेतकर्यांकडून घेतला जातो आणि आमच्या कडक गुणवत्तेवर पडताळून प्रक्रिया केली जात असल्याने, आमची उत्पादने नैसर्गिक पोषक तत्वांसह पॅक केली जातात ह्या उत्पादनांमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह किंवा कृत्रिम घटक नसतात.”
बेंगळुरूमधील फलादा प्युअर आणि शुअर स्टोअरमध्ये उत्पादने उपलब्ध आहेत. ब्रँड, त्यांच्या ई-कॉमर्स वेबसाइट https://pureandsure.in/ आणि सेंद्रीय स्टोअरद्वारे देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर किरकोळ विक्री करीत आहे.
Comments
Post a Comment