'पीएनजी ज्वेलर्स' तर्फे सर्व दालनांच्या माध्यमातून "माझं पीएनजी ज्वेलर्स माझ्या घरी" सेवा उपलब्ध

'पीएनजी ज्वेलर्स' तर्फे सर्व दालनांच्या माध्यमातून "माझं पीएनजी ज्वेलर्स माझ्या घरी" सेवा उपलब्ध

पुणे,13सप्टेंबर २०२० :- आपल्या सचोटीने सराफी व्यवसायात ठसा उमटविणाऱ्या दाजीकाका गाडगीळ यांच्या १०६व्या जयंती निमित्त पीएनजी ज्वेलर्सने "माझं पीएनजी ज्वेलर्स माझ्या घरी" ही सेवा सर्व दालनांच्या माध्यमातून सुरू केली आहे. ही नवीन पूर्णवेळ सेवा ब्रँडच्या कामकाजामध्ये एक नवीन विभाग म्हणून जोडली जात असून या माध्यमातून ग्राहकांना सुरक्षित वातावरणात पीएनजी ज्वेलर्सच्या माध्यमातून खरेदीचा अनोखा अनुभव देण्याचा प्रयत्न आहे.
३५ हून अधिक दालनांच्या माध्यमातून सुरू होत असलेली ही व्यापक सेवा म्हणजे ज्वेलरी या उद्योगातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे. या सेवेसाठी मोठ्या व छोट्या शहरातील सर्व दालनांमधील सर्व विक्री कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारचे दागिने सुरक्षित व अखंडपणे ग्राहकांसमोर प्रदर्शित करण्यासाठी सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे. महामारी दरम्यान आणि त्यानंतरही ग्राहकांच्या सुरक्षेविषयी गरजा लक्षात घेऊन ब्रँडने कामकाजाच्या प्रत्येक टप्प्यात विविध उपाय योजना केल्या आहेत.
महामारीचा महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणावर प्रभाव पडला असून घरातून बाहेर पडणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळेच वेगळा काहीतरी विचार करून नावीन्य पध्दतीने ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन व विशेष करून येणारा उत्सवकाळ आणि लग्नसराईचा मौसम यासाठी ग्राहकांपर्यंत पोहचणे गरजेचे होते.
या सेवेमध्ये खालील प्रक्रियांचा समावेश असेल. प्रत्येक ग्राहकाला आता टोल फ्री नंबरवर फोन करून 'होम शोकेसिंग' सुविधेसाठी ब्रँडच्या प्रतिनिधींची अपॉईंटमेंट घेता येइल . फोनवरच 'केवायसी' ची औपचारिकता पूर्ण केली जाईल. त्यानंतर विक्री विभागातील कर्मचारी ग्राहकांना उत्पादनांचा एक व्हिडिओ दाखवतील ज्यामुळे स्टोअरमध्ये असलेल्या दागिन्यांच्या अखंड संचांमधून त्यांच्या नेमक्या गरजा व पसंती लक्षात येतील. त्यानंतर ब्रँडचे प्रतिनिधी निवडक ज्वेलरी उत्पादनांसह अपॉईंटमेंट घेऊन वेळेप्रमाणे ग्राहकांच्या घरी जातील, जेणेकरून खरेदी करण्यासाठी संभाव्य पसंतीचे दागिने ग्राहकांना प्रत्यक्ष पाहून त्याचा अनुभव घेता येईल. ग्राहक, विक्री कर्मचारी आणि दागिने या सर्वांच्या सुरक्षेसाठी काटेकोर उपाययोजना ब्रँडतर्फे आखल्या गेल्या आहेत.
या प्रसंगी बोलताना 'पीएनजी ज्वेलर्स'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, 'आमच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सुरू करत असलेल्या "माझं पीएनजी ज्वेलर्स माझ्या घरी" ही सेवा सुरू करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. व ही सेवा म्हणजे दाजीकाका गाडगीळांच्या कार्याला एक मानवंदना आहे. या सेवेची संकल्पना लॉकडाऊनच्या काळातच आखली गेली होती. दालनांमध्ये येण्यासाठी ग्राहकांसमोरील आव्हाने लक्षात घेता 'होम शोकेसिंग' सुविधाही आम्ही प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली होती. ग्राहकांना आपल्या सोयीच्या ठिकाणी सुरक्षित वातावरणात चांगल्या खरेदीचा अनुभव यामुळे मिळत आहे, हे आमच्या लक्षात आले. त्यामुळेच आम्ही ही सेवा आता ग्राहकांसाठी व्यापक प्रमाणावर सुरू करीत आहोत. अनिश्चिततेच्या काळात एक जबाबदार कंपनी म्हणून ग्राहकांच्या सोयीसुविधेसाठी सतत प्रयत्नशील राहण्यावर आमचा भर असतो. ही सेवा म्हणजे ऑनलाईन व ऑफलाईन रिटेल व्यवसायाचा उत्तम मिलाप आहे. या पुढेही आम्ही आमच्या ग्राहकांसाठी नावीन्यपूर्ण पध्दतीने अशाच सेवा देत राहू.'

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth