स्टेपॲपची सरकारच्या आदिवासी विकास विभागाशी भागीदारी, वंचित विद्यार्थ्यांना गेमिफाइड लर्निंग उपलब्ध करून देणार

स्टेपॲपची सरकारच्या आदिवासी विकास विभागाशी भागीदारी, 
वंचित विद्यार्थ्यांना गेमिफाइड लर्निंग उपलब्ध करून देणार



स्टेप ॲप (स्टुडंट टॅलेंट एनहान्समेंट प्रोग्राम अॅप्लिकेशन)ला आदिवासी विकास मंत्रालयातर्फे भारतातील सर्व आदिवासी शाळांमध्ये त्यांच्या गेमिफाइड लर्निंग ॲपची अमलबजावणी करण्याची परवानगी मिळाल्याने विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.
या कराराच्या निमित्ताने पहिल्यांदाच शासनाने निधीचा समावेश असलेल्या एखाद्या प्रकल्पासाठी भारतीय एडटेक स्टार्टअपसह सहकार्य केले आहे.
या उपक्रमामुळे देशातील पहिली ते बारावीच्या 1.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लगेचच लाभ मिळणार आहेत आणि येत्या काही वर्षांत या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यात येईल. या सहकार्याच्या माध्यमातून स्टेपॲप विद्यार्थ्यांची शालेय परीक्षा तसेच स्पर्धात्मक परीक्षांमधील कामगिरी उंचावेल. शिवाय, डॅशबोर्डच्या माध्यमातून शाळांना मुलांची शैक्षणिक प्रगतीही मोजता येईल. हा कंटेंट इंग्रजी भाषेतून पुरवला जाणार आहे.
गणित आणि विज्ञानातील संकल्पना गेमिफाइड स्वरुपात समजावून घेत विद्यार्थ्यांना हसतखेळत, आनंद घेत शिकता यावे यादृष्टीने स्टेपॲप या गेमिफाइल लर्निंग सोल्युशनवर सेवा पुरवली जाते. यात सहजसोपी परीक्षा पद्धती, शैक्षणिक परिणाम मोजण्याची सोय, सेल्फ-पेस्ड लर्निंग, 400 हून अधिक आयआयटीअन्स आणि डॉक्टरांनी तयार केलेला कंटेंट तसेच सन्मान आणि बक्षिसे अशी विविध वैशिष्ट्ये यात आहेत.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नांना वेग देण्याचे साधन बनणे आणि भारतातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षणासाठी वैश्विक उपलब्धता मिळवून देणे हा स्टेपॲपचा उद्देश आहे. यातून प्रतिभावान मुलांची मोठी फौज उभी करून देशासाठी मनुष्यबळाची संपत्ती निर्माण केली जात आहे. ॲपस्टेपने 31 ऑगस्ट 2020 पर्यंत 21 राज्यांमधील (गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, नागालँड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, केरळ, उत्तराखंड, मणिपूर, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, सिक्किम, हिमाचल प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, मिझोराम आणि कर्नाटक) 242 शाळांमधील 35,167 नोंदणीकृत विद्यार्थ्यांना ही सोय उपब्लध करून दिली आहे.
एड्यूइजफन टेक्नॉलॉजिज (स्टेपॲप)चे संस्थापक आणि पेस-आयआयटीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रवीण त्यागी म्हणाले,
"भारत सरकार आणि आदिवासी शिक्षण विभागाचा हा फारच चांगला उपक्रम आहे. या संकटकाळात शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व द्यायला हवे आणि त्यादृष्टीने योग्य पाऊल उचलण्यात आले आहे. या आदिवासी मुलांना ऑनलाइन शिक्षणाचे पर्याय देण्यासाठी आम्ही ईएमआरएस शाळा आणि शिक्षकांना सक्षम करत आहोत आणि यामुलांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याच्या आमच्या समान ध्येयाप्रति कार्यरत आहोत, याचा मला अत्यंत आनंद वाटतो. या अत्यंत कठीण काळात राष्ट्रउभारणीच्या कार्यात सहभागी होऊ शकल्याचा मला अभिमान वाटतो."
आदिवासी विकास मंत्रालय, भारत : "विद्यार्थ्यांना विविध संकल्पना मजेशीर पद्धतीने शिकता याव्यात यासाठी गणित आणि विज्ञानाच्या संकल्पना गेमिफाइड पद्धतीने उपलब्ध करून देणारे एक अत्यंत उपयुक्त साधन म्हणजे स्टेपॲप. मंत्रालयाच्या बाजूनेही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो आणि याचाच एक भाग म्हणजे स्टेपॲप. या माध्यमातून मिळणारे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे."
स्टेपॲप बद्दल
स्टेप (स्टुडंट टॅलेंट एनहान्समेंट प्रोग्राम) हे एक क्रांतीकारी गेमिफाइड लर्निंग अॅप्लिकेशन आहे. 400 हून अधिक आयआयटीअन्स आणि डॉक्टरांनी या अॅपच्या निर्मितीत हातभार लावला आहे. विद्यार्थ्यांमधील कमाल शैक्षणिक कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक मुलाला मजेशीर आणि गुंतवून ठेवणारा अभ्यासक्रम परवडणाऱ्या दरात आणि न्याय्य आणि समान पद्धतीने मिळायला हवा, यावर स्टेपॲप चा विश्वास आहे. त्यांचा भारतातील सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाशी संलग्न गणित आणि विज्ञानाचा अभ्यासक्रम मुलांना मजेशीर पद्धतीने शिकण्यात आणि संकल्पनात्मक स्पष्टतेत साह्य करतो.
विद्यार्थ्यांना संकल्पना सहज समजाव्यात आणि प्रचंड माहितीचा मारा त्यांच्यावर एकत्रच होऊ नये याची खातरजमा करण्यासाठी या अॅप्लिकेशनमध्ये माहितीला विभागण्यात आले आहे. स्टेपॲप मध्ये डॅशबोर्डच्या माध्यमातून मुलांची प्रगती पाहण्यासाठी आणि त्यांच्या क्षमता ओळखण्यासाठी सहजसोपी टेस्टिंग पद्धतीही उपलब्ध आहे.
स्टेपॲप चा आजवरचा प्रवास
साधारण वर्षभरापूर्व महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाने 14 एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कूल्समध्ये गेमिफाइड ई-लर्निंग पर्याय म्हणून स्टेपॲप ला मंजुरी दिली आणि त्याचा अवलंब केला. यातून 4000 विद्यार्थ्यांना फायदा झाला. या वर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्रातील ईएमआरएसच्या 15 विद्यार्थ्यांनी (14 शाळांमधून) एनटीएसईची पहिली फेरी उत्तीर्ण केली आहे. ईएमआरएसचे विद्यार्थी आणि शिक्षकांकडून नावाजले गेल्यानंतर स्टेपॲप ने महाराष्ट्रातील सर्व 25 एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कूल्समध्ये आपल्या सेवेचा विस्तार केला. या शाळांमधील यशस्वी अमलबजावणीनंतर स्टेपॲप ला भारतातील सर्व राज्यांमधील आदिवासी शाळांमध्ये या गेमिफाइड लर्निंग अॅपच्या अमलबजावणीसाठी भारत सरकारच्या आदिवासी विकास मंत्रालयाची मंजुरी मिळाली. भारत सरकारचे एखादे खाते आणि एडटेक स्टार्टअप यांच्यात पहिल्यांदाच असा आर्थिक व्यवहार असलेला करार झाला आहे. यामुळे आदिवासी विकास विभागाला यंदाच्या शैक्षणिक वर्षात सुमारे 15 कोटींचा खर्च येणार आहे.
नुकताच स्टेपॲप ने तामिळनाडू सरकारसोबत सामंजस्य करार केला. यानुसार तामिळनाडूतील सरकारी शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देत सुमारे 10 लाख विद्यार्थ्यांना लाभ पोहोचवला जाणार आहे. त्याचबरोबर स्टेपअॅपने जवाहर नवोदय विद्यालय स्कूल्स, पोदार स्कूल्स, आर्मी स्कूल्स, एअर फोर्स स्कूल्स आणि सर्व नेवल स्कूल्समध्ये ही सुविधा दिली आहे.
दर्जेदार शिक्षण अधिक व्यापक प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी या उपक्रमाची अॅम्बेसेडर बनून श्री. अमिताभ बच्चन यांनी स्टेपॲप च्या मोहिमेला अधिक बळ दिले आहे. ते सर्व मीडिया व्यासपीठांसाठी या ब्रँडची ओळख असतील.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24