फ्लिपकार्ट होलसेलने किराणा आणि स्थानिक एमएसएमईसाठी डिजिटल व्यासपीठ


फ्लिपकार्ट होलसेलने किराणा आणि स्थानिक एमएसएमईसाठी  डिजिटल व्यासपीठ
बेंगळुरु- २ सप्टेंबर २०२०- देशात विकसित झालेल्या फ्लिपकार्ट समुहाची डिजिटल बी२बी मार्केटप्लेस फ्लिपकार्ट होलसेलने आज स्थानिक उत्पादकांना रिटेल विक्रेत्यांशी जोडण्याच्या उद्देशाने कामकाजाला सुरुवात केली आणि होलसेलची संपूर्ण बाजारपेठ तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांच्या हातात आणली.
फ्लिपकार्ट होलसेल हे रिटेल इकोसिस्टीमसाठी वन स्टॉप सोल्युशन आहे जे भारतीय व्यावसायिकांना विविध प्रकारच्या उत्पादनांमधून निवडीची संधी, तंत्रज्ञानाचे पाठबळ यासह व्यवसायवृद्धीची संधी देणार आहे. सध्या गुरुग्राम, दिल्ली आणि बेंगळुरुमधील फॅशन रिटेलर्स, प्रामुख्याने पादत्राणे आणि कपड्यांच्या क्षेत्रातील यांच्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध असून मुंबईतही विस्तार करण्याची योजना आहे.
वर्षाअखेर फ्लिपकार्ट होलसेलची आणखी २० शहरांमध्ये आणि होम, किचन आणि किराणा सामान या श्रेणीत विस्तार करण्याची योजना आहे. बी २ बी डिजिटल प्लॅटफॉर्म गुगल प्ले स्टोअरमधील ॲपच्या आधारे रिटेलर्सला सहज वापरता येईल, ३०० भागिदारांना सोबत घेऊन २ महिन्यात २ लाखापेक्षा जास्त उत्पादने उपलब्ध करुन देण्याची इथे योजना आहे. याशिवाय, या व्यासपीठावर येत्या काळात ५० ब्रँड आणि २५० स्थानिक उत्पादकांना सहभागी करुन घेणार आहे.
सीनियर व्हाइस प्रेसिडेंट आणि फ्लिपकार्ट होलसेलचे प्रमुख आदर्श मेनन म्हणाले,  भारतीय किराणा आणि एमएसएमईचा व्यवसाय तंत्रज्ञानाचा वापर करुन सोपा करुन त्यांची भरभराट करुन देणे हे फ्लिपकार्ट होलसेलचे मूलभूत उद्दिष्ट आहे. बी२बी क्षेत्रात मोठ्या क्षमतेसह किराणा आणि एमएसएमईच्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने त्यांना चांगल्या किमतीत विविध वस्तू निवडण्याची सुविधा, तंत्रज्ञानाच्या आधारे देऊन त्यांचे आयुष्य सोपे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. किराणा माल, सर्व साधारण वापराच्या वस्तू किंवा फॅशन क्षेत्रात या व्यवसायांना एकाच ठिकाणी निवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणे उत्पादने मिळतील, त्यात आकर्षक ऑफर्स आणि प्रोत्साहन योजना असतील, वस्तूंच्या निवडीसाठी डेटावर आधारित सल्ला दिला जाईल, या सर्व गोष्टी वेगवान आणि विश्वासार्ह नेटवर्कच्या आधारे अधिक कार्यक्षमतेने पोहोचवल्या जातील.  
रोख रकमेच्या व्यवस्थापनासाठी फ्लिपकार्ट होलसेल ग्राहकांना सुलभ कर्ज योजना, फ्लिपकार्टच्या खात्रीने विविध प्रकारची दर्जेदार उत्पादने, ऑर्डर परत करण्याची सोपी आणि सुलभ पद्धत, ऑर्डर ट्रॅक करण्याच्या सोप्या पद्धतीसह थेट दुकानात जलदगतीने वस्तूंची डिलिवरी होणार आहे.
त्याच्या एरियात राहणाऱ्या ग्राहकांच्या गरजा जाणून घेण्यासाठी फ्लिपकार्टच्या इकोसिस्टीमधून फ्लिपकार्ट होलसेलचे ग्राहक बी२बी आणि बी२सी विषयी सूक्ष्म अनुभव ग्राहकांना मिळतील यामुळे त्यांना कोणत्या वस्तूंची खरेदी करायची आणि कोणत्या वस्तू विकायच्या याची माहिती मिळेल. बेस्ट प्राइस टीमचा मर्कडाइझिंग क्षेत्रात चांगला अनुभव, ब्रँडसोबत असलेले मजबूत संबंध, किराणा क्षेत्राला सेवा देण्याचा दीर्घ अनुभव आणि १२ पेक्षा जास्त वर्षांचा बेस्ट प्राइस स्टोअर चालविण्याचा अनुभव फ्लिपकार्ट होलसेलच्या ग्राहकांना मिळणार आहे. यामुळे त्यांना महत्त्वपूर्ण अनुभव, प्रत्यक्ष कामातून आलेल्या तज्ञतेमुळे किराणा आणि एमएसएमई हे फ्लिपकार्ट होलसेलच्या व्यवसायाच्या केंद्रस्थानी असणार आहे.
भारत ही विस्तारणारी बाजारपेठ आहे आणि देशाच्या रिटेल इकोसिस्टीमचा अतूट भाग असलेला किराणा तसेच एमएसएमईचा व्यवसाय सोपा करण्यासाठी फ्लिपकार्ट होलसेल ही महत्त्वाची झेप आहे आणि यात फ्लिपकार्टने स्वतः विकसित केलेले तंत्रज्ञान, ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची जागा आणि देशाच्या उद्योग क्षेत्राला समजून घेण्याची अद्वितीय क्षमता याची जोड मिळणार आहे.
फ्लिपकार्ट होलसेच्या अधिक माहितीसाठी कृपया https://flipkartwholesale.com/ या वेबसाइटला भेट द्या.




Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24