‘विक्रोळी कुचिना’ आयोजित करणार ‘राईज ऑफ द कालनरी एक्सप्लोरर’

विक्रोळी कुचिना आयोजित करणार राईज ऑफ द कालनरी एक्सप्लोरर
भारतातील खाद्यपदार्थांचा कल जाणून घेण्यासाठी अन्न उद्योगातील तज्ज्ञांच्या परिसंवादांची मालिका

मुंबई : गोदरेज समुहाच्या मालकीच्या विक्रोळी कुचिना या प्लॅटफॉर्मतर्फे एक परिसंवादांची मालिका आयोजित करण्यात येत आहे. राईज ऑफ द कालनरी एक्सप्लोरर असे या कार्यक्रमाचे नाव आहे. गोदरेज फूड ट्रेंड्स रिपोर्ट-2020 मध्ये खाण्यापिण्याचे 10 आगामी कल नमूद करण्यात आले होतेत्यांपैकी 7 कल टाळेबंदीच्या काळात अधिक गतीने वाढले. या विषयी अधिक चर्चा करण्यासाठी वर्षाच्या मध्यंतरीच्या काळातच देशातील काही विचारवंतशेफखाद्यपदार्थांमधील तज्ज्ञ यांना पाचारण केले जाणार आहे.
हे परिसंवाद दोन भागांत घेण्यात येतील. पहिल्या भागात एकेका तज्ज्ञाचे विचार मालिकेच्या स्वरुपात इन्स्टाग्रामवर लाईव्ह मांडण्यात येतील. दि. 14 ते 18 सप्टेंबर या कालावधीत विक्रोळी कुचिना इन्स्टाग्राम हॅंडलवर (@Vikhrolicucina) ते प्रक्षेपित होईल.  दुसऱ्या भागात काही विशिष्ट तज्ज्ञांची परिसंवादांची मालिका झूमवर 21 सप्टेंबरपासून सादर होईल. या मालिकेत अन्न व खाद्यपदार्थ या क्षेत्रातील काही नामवंत भाग घेतील. शेफ वरुण इनामदारशेफ सुवीर सरनशेफ विकी रतनानीअभिनेते, लेखक व टीव्हीवरील कलावंत कुणाल विजयकरपाककृतींच्या लेखिका व शेफ तारा देशपांडे, गॉमे पासपोर्टचे संस्थापक व मार्गदर्शक रॉकी मोहनडाईन आऊटच्या लक्झरी डायनिंग विभागाचे सरव्यवस्थापक अस्लम गफूरफूड कन्सल्टंट व लेखिका मोनिका मनचंदापाककृती व प्रवासवर्णन लेखिका रोक्झॅन बांबोपाककृतींमधील संशोधिकाटीव्ही व वेब निर्मात्यादिग्दर्शिका शुभ्रा चटर्जी आणि रुशिना मुनशॉ गिल्डियाल यांचा या नामवंतांमध्ये समावेश आहे.
या कार्यक्रमाविषयी माहिती देताना गोदरेज इंडस्ट्रीज लि. व संलग्न कंपन्यांचे उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट ब्रॅंड व कम्युनिकेशन्स विभागाचे प्रमुख सुजित पाटील यांनी सांगितले, ‘’घरगुती जेवणाला यंदा सर्वाधिक महत्त्व येईलअसा कल गोदरेज फूड ट्रेंड्स रिपोर्ट-2020मध्ये व्यक्त करण्यात आला होता. कोरोनाच्या संकटामुळे घराबाहेर खाणे हा प्रकार मोडकळीस आला आहे. अर्थातयाच परिस्थितीमुळे घरात जेवण करण्यास सर्वाधिक महत्त्व प्राप्त झालेतसेच लहान रेस्टॉरंट्स उभी राहण्याच्या संधी निर्माण झाल्या व पौष्टिक खाण्याकडे लोकांचा कल वाढला. हा अहवाल खरोखरच अन्न उद्योगासाठी एक मापदंड ठरला आहे. आता वर्षाच्या मध्येच परिसंवाद व चर्चासत्रे घडवून आणून आम्ही पुढील वर्षाच्या अहवालाची सुरुवात करीत आहोत. पुढील वर्षी तज्ज्ञ काय अंदाज बांधतातयाची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे.
गोदरेज फूड ट्रेंड्स रिपोर्ट 2020 या सर्वेक्षणाच्या नियोजनकार रुशीना मुनशॉ गिल्डियाल म्हणाल्या, ‘’कोरोनाच्या संकटामुळे जागतिक अन्न उद्योगात आमुलाग्र बदल झाले आहेत. आम्ही यावर्षी फेब्रुवारीमध्ये जीएफटीआर 2020 सादर केलातेव्हा जागतिक आरोग्यअर्थव्यवस्था आणि उद्योग क्षेत्र यांवर काही आठवड्यांतच संकट कोसळेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. वार्षिक गोदरेज फूड ट्रेंड अहवालाची नियोजनकार या नात्याने त्यांतील ट्रेंड्सकडे मी संमिश्र भावनांनी पाहात आहे. डबघाईला आलेला व तग धरून राहण्यासाठी धडपडणाऱ्या रेस्टॉरंट उद्योगाकडे दुःखाने पाहात असतानादुसरीकडे अन्न उद्योगात काही बाबी प्रगतीपथावर असल्याचे पाहून माझे मन सुखावत आहे संकटामुळे जसा विनाश होऊ शकतो, तशाच काही सकारात्मक गोष्टीदेखील घडतातयाचे दाखले इतिहासात मिळतात. 2021 मधील गोदरेज फूड ट्रेंड अहवालावर मी काम सुरू केलेतेव्हा मला हे स्पष्ट झाले की अनेक गोष्टींची एक नवीन क्रमवारी येथे करावी लागणार आहे आणि आम्हाला त्यास तोंड देणे आवश्यक आहे. आपण पूर्वी नमूद केलेले कल गेल्या काही महिन्यांमध्ये कोणत्या दिशेने गेले आहेत आणि नवीन परिस्थितीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी आपल्या स्वतःला आणि आपल्या व्यवसायाला पुन्हा नव्याने कसे उभे केले पाहिजे, त्यासाठी काय आवश्यक आहेयाचा उहापोह करण्यासाठी जीएफटीआरच्या पथकाने परिसंवाद आयोजित केले आहेत.’’
गोदरेज फूड ट्रेंड रिपोर्ट या उपक्रमामध्ये भारतीय खाद्य उद्योगातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी व विचारवंतांशी संपर्क साधण्यात येतो, त्यांच्याकडून सर्व प्रकारची माहिती घेण्यात येतेत्या माहितीचे संकलन व विश्लेषण करण्यात येतेत्यातून पुढील वर्षभरात या उद्योगात कोणते कल असतील याचे अंदाज बांधण्यात येतात. सेलिब्रिटी शेफहोम शेफव्यावसायिक शेफफूड ब्लॉगरआरोग्य व्यावसायिकमीडिया व्यावसायिकमिक्सॉलॉजिस्टन्यूट्रिशनिस्ट्सरेस्टॉररंट्सचे मालकसोमेलीयर्सअन्नपदार्थ उत्पादक आणि इतर अनेक तज्ज्ञ अशा 150 जणांनी गोदरेज फूड ट्रेंड्स रिपोर्ट 2020 बनविण्यात आपले योगदान दिले आहे.
गोदरेज रियल गुड चिकन’, ‘गोदरेज व्हेगोइल्स’, ‘गोदरेज अप्लायन्सेस’, ‘गोदरेज इंटरिओ’, ‘गोदरेज प्रोटेक्ट’, ‘गोदरेज जर्सी’, ‘कार्टिनी चाकू अशा विविध ब्रॅंड्सच्या माध्यमातून गोदरेज समूह हा अन्न उद्योगाशी जोडला गेलेला आहे. विक्रोळी कुचिना या आपल्या मालकीच्या माध्यम प्लॅटफॉर्ममधून गोदरेज फूड ट्रेंड्स रिपोर्ट हा एक महत्वाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. गोदरेजला खाद्य उद्योगात गुंतण्यासतसेच अन्न उद्योगातील तज्ज्ञांचा समुदाय उभा करण्यास यातून प्रोत्साहन मिळते. सर्व खाद्यप्रेमी एकत्र येतीलसहभागी होतील अशा एका प्रकाशनाच्या प्लॅटफॉर्ममध्ये विक्रोली कुचिनाचे आता रुपांतर झाले आहे.
प्रत्येक खाद्य व्यावसायिकाच्या वाचनाच्या यादीमध्ये गोदरेज फूड ट्रेंड 2020 अहवालाच्या रुपाने एक महत्त्वाची भर पडली आहे. Www.vikhrolicucina.com वरून हा अहवाल डाउनलोड करता येईल.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.