अस्थिर बाजारामुळे भारतीय निर्देशांकांत घसरण

अस्थिर बाजारामुळे भारतीय निर्देशांकांत घसरण

मुंबई, ३ सप्टेंबर २०२०: वित्तीय शेअर्स गडगडले व अस्थिर बाजारामुळे भारतीय निर्देशांकांत घसरण दिसून आली. आयटी आणि एफएमीजी स्टॉक्सनीदेखील नुकसान झेलले. निफ्टी ०.०७% किंवा ७.५५ अंकांनी घसरला व ११.५२७.४५ अंकांवर स्थिरावला, मात्र निफ्टीने ११,५०० अंकांची पातळी कायम ठेवली. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.२४% किंवा ९५.०९ अंकांनी घटला व ३८,९९०.९४ अंकांवर विसावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की, आज जवळपास ११९९ शेअर्स घसरले, १४५२ शेअर्सनी नफा कमावला तर १७६ शेअर्स स्थिर राहिले. भारती इन्फ्राटेल (११.०९%), ग्रासीम इंडस्ट्रीज (७.०२%), टायटन कंपनी (५.५९%), युपीएल (४.४२%) आणि विप्रो (३.५४%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर भारती एअरटेल (१.९९%), आयसीआयसीआय बँक (२.०३%), हिंडाल्को इंडस्ट्रीज (२.१७%), अॅक्सिस बँक (१.६२%) आणि कोटक महिंद्रा बँक (१.६६%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. आयटी, ऑटो, फार्मा आणि एफएमसीजी क्षेत्रांमध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी बँक १.२% नी घसरली, त्यासह निफ्टी मेटलही लाल रंगात दिसून आल्याने बाजार घसरला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप मात्र अनुक्रमे ०.४०% आणि ०.७४% नी वधारले.

व्होडाफोन आयडिया लि.: अॅमेझॉन आणि व्हेरीझॉन ४ अब्ज डॉलरपेक्षा जास्त निधी कंपनीच्या विविध प्लॅटफॉर्मवर करणार असल्याच्या बातम्या माध्यमांत आल्यानंतर व्होडाफोन आयडियाचे स्टॉक २९.८०% नी वधारले आणि त्यांनी १२.८५ रुपयांवर व्यापार केला. अॅमेझॉन आणि व्हेरीझॉन या रिटेलर्स आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीतील मोठ्या कंपन्या आहेत.

भारती एअरटेल लि.: भारती इन्फ्राटेल लिमिटेडला इंडस टॉवर मर्जरच्या बोर्डकडून करारास मंजूरी मिळाली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ११.०९% नी वधारले व त्यांनी २१७.८० रुपयांवर व्यापार केला.

युपीएल: ग्लोबल रिसर्च फर्मने युपीएलचे शेअर्स ६२० रुपये प्रति शेअर या लक्ष्यित किंमतीवर विकत घेण्याचा निर्णय कायम ठेवला. यानंतर कंपनीचे स्टॉक्स ४.४२% नी वधारले व त्यांनी ५२३.०० रुपयांवर व्यापार केला.

पेज इंडस्ट्रिज लि.: कंपनीने २०२१ च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ तोटा ३९.६ कोटी रुपये झाल्याचे नोंदवले. तर कंपनीचा महसूलदेखील ६५.९% नी घटला व २८४.४ कोटी रुपयांवर आला. कंपनीचे स्टॉक्स २.७९% घसरले व त्यांनी १९,१४००.०० रुपयांवर व्यापार केला.

पॉवर मेक प्रोजेक्ट्स लि.: कंपनीला १,३११.७० कोटी रुपयांच्या कामाची ऑर्डर मिळाली. यासंबंधीचे लेटर ऑफ इंटेंट/एल१ पत्रही सूचना म्हणून मिळाले. कंपनीचे स्टॉक्स ४.८०% नी वाढले व त्यांनी ४५६.०० रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया: अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया घसरून ७३.४७ रुपयांवर आला. त्यामुळे सत्रातील ही सर्वात मोठी घसरण ठरली.

जागतिक बाजार: अमेरिका-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजाराने ठोसपणे व्यापार केला. युरोची विक्री करताना युरोपियन मध्यवर्ती बँकेसमोर चिंता होती, पण अमेरिकी डॉलरने आजच्या सत्रात नफा कमावला. आजच्या व्यापारी सत्रात, नॅसडॅकने ०.९८%, निक्केई २२५ ने ०.९४%, एफटीएसई १०० ने ०.८५% आणि एफटीएसई एमआयबीने १.०० ची वृद्धी घेतली तर हँगसेंगने ०.४५% ची घसरण अनुभवली.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24