ड्रायव्हर सिट मसाज फीचरसह येणार एमजी ग्लोस्टर

ड्रायव्हर सिट मसाज फीचरसह येणार एमजी ग्लोस्टर

~ ग्लोस्टर असेल भारतातील पहिली ऑटोनॉमस (लेव्हल१) प्रीमियम एसयुव्ही ~

मुंबई, ९ सप्टेंबर २०२०: एमजी मोटर इंडिया स्मार्ट मोबिलिटीची नवी लाट आणण्यास आता सज्जा आहे. कंपनीने आपले पुढचे वाहन- ग्लोस्टर सादर करत लक्झरी कार ब्रँड फेजमध्ये प्रवेश केला आहे. एमजी ग्लोस्टर नव्या पाथब्रेकिंग सुविधांसह लाँच केली जाईल. यात ड्रायव्हर सिट मसाज, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि फ्रंट कोलायजन वॉर्निंगचा समावेश असेल. ग्लोस्टरची ड्रायव्हर सिट १२ प्रकारे इलेक्ट्रॉनिकरित्या वापरता येते. तसेच प्री-सेट पोझिशनसाठी दोन मेमरी सेट ऑप्शन्स आहेत. इलेक्ट्रिकरित्या वापरता येणारे सीट केवळ एक बटण पुश केल्यावर प्री-सेट पोझिशनमध्ये हलवता येतात. मेमरी सिटींगमध्ये दोन पोझिशन सेव्ह केल्या जातात.

एमजी ग्लोस्टर ही फेब्रुवारी ऑटो एक्स्पो २०२० मध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आली होती. देशातील लँड क्रूजर प्रॅडोसारख्या प्रीमियम एसयूव्हींशी तिची स्पर्धा असेल. ग्लोस्टर भारतातील पहिली ऑटोनॉमस (लेव्हल१) प्रीमियम एसयुव्ही असेल.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.