के2 टीएमटीने आपल्या ब्रँडला केले वृद्धिंगत, सादर करत आहेत प्रीमिअम टीमटी ब्रँड "के2 झेनॉक्स"
के2 टीएमटीने आपल्या ब्रँडला केले वृद्धिंगत, सादर करत आहेत प्रीमिअम टीमटी ब्रँड "के2 झेनॉक्स"
• टीएमटी विभागातील आपली व्याप्ती बळकट करण्याचा उद्देश
• पुढील 2 वर्षांत उत्पादन क्षमता दुप्पट करण्याचा मानस
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2020: के2 टीएमटी या भारतातील सर्वात तरुण आणि वेगाने वाढणाऱ्या टीएमटी बार्स उत्पादक कंपनीने आज नव्या 'के2 झेनॉक्स' या प्रीमिअम टीएमटी ब्रँडच्या अनावरणासह आपली ब्रँड ओळख अधिक व्यापक करत असल्याची घोषणा केली. टीएमटी बार्सच्या उत्पादनात नवे तंत्रज्ञान वापरून टीएमटी विभागातील आपल्या व्यापकेतला अधिक वृद्धिंगत करण्याचा कंपनीचा मानस आहे.
के2 झेनॉक्स हा के2 टीएमटी बार्सचा प्रीमिअम ब्रँड आहे. कोणत्याही बांधकामाचा दर्जा आणि भक्कम पायाची खातरजमा करणारी आणि काँक्रिटसह षटकोनी स्वरुपात अत्यंत अजोड पद्धतीने जोडणारी अनोखी रीब डिझाइन यात आहे. हल्लीच्या आधुनिक बांधकामाच्या दृष्टीने अगदी भूकंप प्रवण क्षेत्रातील बांधकामासाठीही ही कंपनी प्रीमिअम टीएमटी बार्स पुरवते. यातील 720 अंश अष्टकोनी अँगल्स अधिक दमदार पकड देतात आणि त्यामुळे बांधकामाचा दर्जा प्रचंड सुधारून अधिक प्रमाणातील भारही यात लिलया पेलला जातो. इंटेलिजंट स्टील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के2 झेनॉक्सची मेश ग्रीप, मजबूत पकडीची 200 टक्के उच्च क्षमता आणि उत्कृष्ट भौतिक आणि रासायनिक वैशिष्ट्ये यामुळे समकालीन बांधकाम गरजांसाठी हे उत्पादन अगदी योग्य ठरते. उच्च दर्जाचे शुद्ध Fe 500 आणि 500D वापरून तयार करण्यात आलेल्या या बार्समुळे बांधकामातील स्टीलचा वापर 20 टक्क्यांनी कमी होतो आणि तरीही बीआयएसने आखून दिलेल्या मानांकनाप्रमाणे सातत्याने दर्जा राखला जातो.
या प्रसंगी के2 झेनॉक्सचे संचालक श्री. सुनिल अग्रवाल म्हणाले, "आमच्या ब्रँडच्या अस्तित्वाला अधिक बळकटी देत, तो अधिक वृद्धिंगत करत आम्ही बाजारपेठेत उत्तम दर्जाची उत्पादने देण्याचे आमचे वचन पाळत आहोत. नाविन्यपूर्ण उत्पादनांमध्ये कायम अग्रभागी असलेली ही कंपनी नेहमीच या क्षेत्राच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल, अशी उत्तम उत्पादने पुरवते. के2 झेनॉक्स हा एक प्रीमिअम ब्रँड आहे आणि देशात आमची उपस्थिती अधिक वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत."
देशभरात टीएमटी बार्सचे उत्पादन केंद्र उभारण्यासाठी कंपनीने अनोखे फ्रँचाईझी मॉडेल उभे केले आहे. सध्या, ही कंपनी 30 उत्पादन केंद्रांशी जोडली गेली आहे आणि देशभरात सुमारे 3500 डीलर्स आणि वितरकांचे जाळे आहे. आर्थिक वर्ष 20 मध्ये के2 टीएमटी ब्रँडच्या विक्रीने 2300 कोटींचा आकडा गाठला आणि चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपर्यंत एकूण 3500 कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज आहे.
"कोविड-19 नंतर आता अर्थव्यवस्था हळूहळू सुधारत आहे आणि भारतभरात उद्योगही सुरू होत आहेत, त्यामुळे बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातही मागणी पूर्ववत होत असल्याचे दिसून येतेय. येत्या काळात कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांनाही मोठ्या प्रमाणात चालना दिली जाईल, अशी घोषणा सरकारने केली आहे आणि याचा आमच्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे येत्या काही महिन्यांत आम्ही मुसंडी मारू अशीच सारी चिन्हे आहेत आणि आमच्या उच्च दर्जाच्या उत्पादनांसह मागणी पूर्ण करण्यास आम्ही पूर्ण रितीने सज्ज आहोत. पुढील दोन वर्षात टीएमटी बार्सची उत्पादन क्षमता 10 लाख मेट्रिक टनांहून 20 लाख मेट्रिक टन अशी दुप्पट करण्याचाही आमचा मानस आहे," असे श्री. अग्रवाल यांनी पुढे सांगितले.
Comments
Post a Comment