स्तनाच्या कर्करोगासंदर्भात स्व-परीक्षणाबाबत 76% महिला सजग, न्यूबर्ग डायग्नोस्टीक सर्व्हेक्षणातून निष्कर्ष
स्तनाच्या कर्करोगासंदर्भात स्व-परीक्षणाबाबत 76% महिला सजग, न्यूबर्ग डायग्नोस्टीक सर्व्हेक्षणातून निष्कर्ष
~ स्व-परीक्षणाची ‘वारंवारता’ आणि ‘चांगली वेळ’ यासंबंधी जागरूकतेत कमतरता ~
मुंबई, 28 ऑक्टोबर, 2020: Neuberg Diagnostics - (न्यूबर्ग डायग्नोस्टीक) ही भारताची चौथी सर्वात मोठी निदान शृंखला असून त्यांच्या वतीने स्तनाच्या स्व-परीक्षण, त्याचे महत्त्व आणि अनुवांशिक पैलू याविषयी स्तन कर्करोग जागरूकता सर्व्हेक्षण करण्यात आले. स्तनाच्या कर्करोगात स्व-परीक्षणाकरिता 70 टक्के महिला सजग दिसल्या तर नियमित स्व-परीक्षण करत असल्याचे 56 टक्के महिलांनी सांगितले. तरीही, 35 टक्के महिला या स्व-परीक्षण कधी करावे याविषयी जागरूक नसल्याचे म्हणाल्या. शिवाय, स्तनात बदल आढळल्यास पुढे काय करावे याबद्दल खात्री नसल्याचे 19 टक्के महिलांनी कबूल केले.
डॉ. अनघा झोपे या अपोलो हॉस्पिटल, अहमदाबाद येथे ब्रेस्ट कॅन्सर सर्जन असून महिलांनी वयाच्या 20 व्या वर्षापासून स्तनांचे स्व-परीक्षण करण्यास सुरुवात करण्यावर जोर दिला. लहान वयापासूनच महिला वर्गाने आपल्या स्तनांच्या आकार आणि आकारमानाकडे लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून एखादा बदल चटकन लक्षात येऊ शकतो. त्यांनी महिलांनी स्व-परीक्षण करताना लक्षात घेण्याची लक्षणे देखील सुचवली. याविषयी माहिती देताना त्या म्हणाल्या, “स्तनावर किंवा काखेत गाठ अथवा गठ्ठेदारपणा किंवा स्तनावर सूज, त्वचेवर दाह, स्तनाग्र किंवा स्तनावर लालसरपणा, आकार/आकारमानात बदल, छातीत दुखणे अथवा स्तनाग्रातून रक्तस्त्राव किंवा तत्सम सूचक लक्षणे स्तनाच्या कर्करोगाची असू शकतात.”
अपोलो हॉस्पिटल, बंगळूरूच्या ब्रेस्ट ऑन्कोलॉजीच्या प्रमुख सल्लागार जयंती थुमसी यांनी पाळीनंतर एका आठवड्याने स्वत:च तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, “दर महिन्याला ठराविक दिवशी तपासणी करावी कारण या मासिक चक्राच्या ठराविक काळात स्तन फार कोमल किंवा कडक नसतात. मेनोपॉजच्या (रजोनिवृत्तीच्या) काळात दर महिन्याच्या ठराविक तारखेला स्वत:च स्वत:ची तपासणी करावी.”
जेव्हा स्तनांमध्ये काही बदल दिसून येतील तेव्हा लगेच वैद्यकीय तपासणी करून घेण्यावर कोची येथील अॅस्टर मेडीसिटीच्या मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अरुण वॉरियर यांनी भर दिला. ते म्हणाले, “कोरोना महासाथीमुळे अनेक स्त्रिया हल्ली रूग्णालयात जाण्यास घाबरतात. परंतु, स्तनाचा कर्करोग जास्त पसरण्यापूर्वीच त्याला आळा घालणे गरजेचे असते. लवकर निदान झाल्यास जगण्याची शक्यता वाढते.”
एका सर्वेक्षणानुसार असे आढळून आले आहे की, वैद्यकीय आजारांबाबत कुटुंबांमध्ये फारशी चर्चा होताना दिसत नाही. जवळपास 50 टक्के लोकांना त्यांच्या कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास माहित नसतो.
न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सच्या क्लिनिकल अनुवंशशास्त्रज्ञ डॉ. उधया कोटेचा म्हणाल्या, “अनुवांशिक स्तन आणि ओव्हरी (अंडाशय) कॅन्सर सिंड्रोममुळे जीन्समध्ये (जनुकांमध्ये) होणाऱ्या बदलांमुळे 5-10 टक्के रुग्णांना स्तनाचा कर्करोग होतो. जनुकांमधील मूलभूत बदल लक्षात आल्यास इतर अवयवांमधील कर्करोगचा धोका वेळीच ओळखता येतो आणि शस्त्रक्रियेतील धोके कमी करण्याच्या दृष्टीने निर्णय घेता येऊ शकतो.”
न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सच्या ग्रुप चीफ ओपेरेटिंग ऑफिसर ऐश्वर्या वासुदेवन म्हणाल्या, “गेल्या काही वर्षांत, भारतातील स्तनाच्या कर्करोगात वाढ झाल्याचे दिसून येते. हार्मोनल असमतोल, मूल होण्याचे वय आणि जीवन शैलीतील बदल ही याची मुख्य कारणे आहेत. स्तनाच्या कर्करोगापासून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी लवकरात लवकर निदान होणे आवश्यक आहे. अर्थातच, जेव्हा आपल्याला नक्की काय तपासायचे आहे हे आपल्याला माहीत असले तरच लवकरात लवकर निदान करणे शक्य होईल.”
त्या पुढे म्हणाल्या, “आमच्या असे लक्षात आले आहे की स्त्रिया हल्ली स्वत:च स्वत:ची तापसणी करण्याच्या बाबतीत जास्त जागरूक झाल्या असल्या तरी 35% स्त्रियांना याच्या पुढे काय पावले उचलायची ते माहीत नसते. यावर एक सोपा उपाय म्हणजे लवकरात लवकर निदान व्हावे आणि प्रभावी औषधोपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे. त्यामुळे भारतात स्तनाच्या कर्करोगातून वाचणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढण्यास हातभार लागेल, पोस्ट ब्रेस्ट सर्वायव्हल आकडे पाहता भारतात ही टक्केवारी 60% आहे तर अमेरिकेत 80% याप्रमाणे आहे.”
लक्षात असू द्या, “प्रारंभिक काळात निदानच सर्वोत्तम सुरक्षा आहे”, असे ऐश्वर्या यांनी सांगितले.
या सर्व्हेक्षणात मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, बेंगळूरू, चेन्नई, कोची आणि हैदराबाद येथील भारताच्या सुमारे 100 शहरांमधून 400 हून अधिक व्यक्तींनी प्रतिक्रिया नोंदवल्या.
Comments
Post a Comment