एमजी मोटर व टाटा पॉवरने नागपूरमध्ये पहिले सुपरफास्ट ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू केले

 एमजी मोटर व टाटा पॉवरने नागपूरमध्ये पहिले सुपरफास्ट ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू केले


नागपूर, २९ ऑक्टोबर २०२०: एमजी मोटर इंडिया आणि टाटा पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने आज शहरातील सुपरफास्ट चार्जिंग ईव्ही स्टेशनचे उद्घाटन केले. इलेक्ट्रिक वाहनांच्या इकोसिस्टिमला आणखी बळकटी देत टाटा पॉवर सोबत एमजीनी नुकतीच केलेली भागीदारी देशभरात ५० केडब्ल्यूडीसी सुपरफास्ट चार्जिंग स्टेशनची निर्मिती करणार आहे.     

सीसीएस/सीएचएडीईएमओ फास्ट-चार्जिंग मानकांशी जुळणा-या सर्व वाहनांसाठी हे सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहेत. एमजीच्या ५ मार्गी (५ way) चार्जिंग इकोसिस्टिम प्रदान करण्याच्या वचनबद्धतेचाच हा भाग आहे. एमजी झेड एस ईव्ही या सुविधेद्वारे ५० मिनिटात ८० टक्के चार्ज होऊ शकते. एमजी झेड एस ही भारतातील पहिली प्युअर इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही असून यात ग्राहकांच्या घरी/कार्यालयात विनामूल्य-एसी फास्ट चार्जर विनामूल्य लावले जाते. हे वाहन चार्जिंग करण्यासाठीच्या इतर पर्यायांमध्ये अतिरिक्त चार्जिंग नेटवर्क, कुठेही चार्ज करण्यासाठी केबल आणि आरएसए (रोडसाइड असिस्टन्स)द्वारे चार्ज ऑन द गो सुविधा देण्यात आली आहे.

एमजी मोटर इंडियाचे मुख्य कमर्शिअल अधिकारी गौरव गुप्ता म्हणाले, “नागपूरमधील ईव्ही चार्जिंग इकोसिस्टिमला आणखी बळकटी देणा-या या भागीदारीद्वारे अधिक स्वच्छ व हरित वाहतूक पर्याय वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मजबूत चार्जिंग इकोसिस्टिम प्रदान करण्याचा उद्देश आहे. यामुळे या भागात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक वाढवण्याचा मार्ग या स्टेशनद्वारे मोकळा होईल, असा आम्हाला विश्वास आहे. नूतनीकरण ऊर्जा क्षेत्रातील प्रसिद्ध टाटा पॉवरसोबत काम करताना आम्ही एकत्रितपणे उत्तम कामगिरी करू याची खात्री आम्हाला आहे.”

टाटा पॉवर कंपनीच्या न्यू बिझनेस सर्व्हिसेसचे प्रमुख श्री राजेश नाईक म्हणाले, “टाटा पॉवरमध्ये आम्ही शाश्वत ऊर्जा उपायांसाठी ताकतीने प्रयत्न करत असतो. आता एमजी मोटरसोबत भागीदारी केल्यानंतर भारतातील ईव्हीच्या प्रसाराला वेग देण्यासाठी आमची वचनबद्धता दिसून येते. नागपूरमधील पहिले सुपरफास्ट चार्जिंग ईव्ही स्टेशन ही तर फक्त सुरुवात आहे. या रोमांचक परिवर्तनात आम्ही लवकरच आणखी काही शहरे जोडण्याची अपेक्षा करतो.”

एमजी मोटर इंडियाचे दिल्ली-एनसीआर, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू आणि हैदराबाद येथील डिलरशिप्समध्ये एकूण १० सुपरफास्ट ५० केडब्ल्यू चार्जिंग स्टेशन्स आहेत. आणखी शहरांमध्ये याचा विस्तार होण्याची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे टाटा पॉवरने ग्राहकांना सहज आणि सुलभ अनुभवासाठी ईझेड चार्ज ब्रँड अंतर्गत डिजिटल प्लॅटफॉर्मसह, विविध २४ शहरांमध्ये २०० पेक्षा जास्त चार्जिंग पॉइंट्ससह विस्तृत ईव्ही चार्जिंग इकोसिस्टिम उभारली आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE