डॉलरचे मूल्य वधारल्याने सोने, बेस मेटल्स आणि कच्च्या तेलाच्या दरावर दबाव

 डॉलरचे मूल्य वधारल्याने सोने, बेस मेटल्स आणि कच्च्या तेलाच्या दरावर दबाव 

मुंबई, २९ ऑक्टोबर २०२०: डॉलरच्या मूल्यात सुधारणा तसेच अमेरिका, रशिया, युरोप आणि इतर देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने सोने, कच्चे तेल आणि बेस मेटलच्या दरांवर नकारात्मक परिणाम झाला. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले कि, अमेरिकेतील तेल साठ्यात वाढ आणि जागतिक मागणीतील घट यामुळे तेलाच्या किंमती आणखी घसरल्या.

सोने: अमेरिकेकडून अतिरिक्त मदतीची चिन्हे दिसत नसल्याने सोने १.५ टक्क्यांनी घसरले व ते १८७७.१ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. या स्थितीमुळे डॉलरला आधार मिळाला व इतर चलनधारकांसाठी पिवळ्या धातूचे आकर्षण कमी झाले. डेमोक्रेट्ससोबत अनेक चर्चा अपयशी झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी अखेरीस मदत निधीसाठी परवानगी दिली, मात्र त्यावर नोव्हेंबर २०२० च्या निवडणुकांनंतर अंमलबजावणी होईल.

साथीच्या नव्या लाटेने युरोपमध्ये पुन्हा निर्बंध लादले व युरोचे मूल्य घसरले. त्यामुळे अमेरिकेचे चलनमूल्य वधारले. जगात कोरोना रुग्णांचे प्रमाण धोकादायक पातळीवर वाढल्यानंतर जागतिक अर्थकारणावर दबाव आला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अमेरिकी डॉलरअंतर्गत आश्रय घेतला.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोव्हेंबर २०२० च्या निवडणुकांनंतर मदतनिधीचे निवेदन करणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर डॉलरला आधार मिळाला आणि सोन्याचे मूल्य कमी झाले. आजच्या सत्रात एमसीएक्सवर सोन्याचे दर घसरण्याची शक्यता आहे.

कच्चे तेल : साथीचा आजार बळावल्यामुळे डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ५.५ टक्के अशा वेगाने घसरले व ३७.४ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. युरोप आणि अमेरिकेतील रुग्णसंख्या वाढल्याने तेलाच्या अर्थकारणावर नकारात्मक परिणाम झाला. अमेरिका आणि रशियात कोव्हिड-१९ चे रुग्ण वाढल्यामुळे तेलाच्या किंमती घसरल्या. युरोपियन देशांत विषाणूमुळे नवे निर्बंध लादले गेल्याने जागतिक आर्थिक सुधारणेची गती आणखी कमी होऊ शकते व त्यामुळे तेलाचे दरही आणखी घसरू शकतात.

अमेरिकेच्या क्रूड साठ्यात ४.४ दशलक्ष बॅरलची वृद्धी झाल्याचे अमेरिकन एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनने नोंदवले. मागील आठवड्यात अमेरिकेचे क्रूड उत्पादन मागील तीन महिन्यातील सर्वोच्च पातळीवर झाले. त्यामुळे तेलाच्या दरात पुन्हा घट दिसून आली. झेटा चक्रिवादळामुळे मेक्सिकोच्या आखातात तेल उत्पादन बंद होते. त्यामुळे मागील व्यापारी सत्रात तेलाचे दर काहीसे वाढले होते. तथापि, वाढीव तेल पुरवठा आणि जागतिक मागणीतील घट यामुळे या स्थितीचा लाभ तेल बाजाराला फारसा झाला नाही व दरात आणखी घसरण दिसून आली.

अमेरिकेची तेल उत्पादन प्रक्रिया बंद असल्यामुळे कच्च्या तेलाला काहीसा आधार मिळू शकतो. तथापि, अमेरिकेच्या तेलसाठ्यातील वृद्धी आणि साथीमुळे या लाभावरही मर्यादा येऊ शकतील. आजच्या सत्रात एमसीएक्सवर तेलाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

बेस मेटल्स : आज बहुतांश बेस मेटल्सचे दर एमसीएक्सवर लाल रंगात स्थिरावले. जगभरातील वाढीव कोरोना रुग्णसंख्येमुळे गुंतवणूकदारांनी डॉलरचा आश्रय घेतला. अमेरिका, रशिया, युरोप आणि इतर देशांना नव्याने लॉकडाऊनची चिंता गुंतवणूकदारांमध्ये दिसून आली. त्यामुळे औद्योगिक धातूंच्या मागणीवरही परिणाम झाला. निकेल एशिय कॉर्पच्या मालकीच्या हिनाटाऊन खाणीतील प्रक्रिया बंद असल्याने निकेलच्या दरांना आधार मिळाला.

सलग पाचव्या महिन्यात चीनच्या औद्योगिक कंपन्यांनी नफ्याची नोंद केली. त्यामुळे जगातील सर्वात मोठा धातू ग्राहक असलेल्या देशात आर्थिक सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. तथापि, ऑगस्ट २०२० मध्ये कच्च्या धातूच्या दरात वाढ आणि फॅक्टरी गेट दरात तीव्र घट यामुळे या वृद्धीची गती मंदावली.

तांबे: अमेरिकेच्या डॉलर-मूल्यात सुधारणा झाल्याने एलएमई तांब्याचे दर ०.७४ टक्क्यांनी घसरले व ते ६७४८ डॉलर प्रति टनांवर स्थिरावले. नव्या कोरोना रुग्णांच्या चिंतेमुळे लाल धातूंच्या किंमतीत आणखी घसरण झाली. डॉलरच्या मूल्यात सुधारणा आणि कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येतील वाढ यामुळे औद्योगिक धातूचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. आजच्या सत्रात एमसीएक्सवर तांब्याचे दर दुर्लक्षित राहण्याची शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE