यूकेआयबीसी तर्फे डुईंग बिझिनेस इन इंडिया रिपोर्ट जाहीर
यूकेआयबीसी तर्फे डुईंग बिझिनेस इन इंडिया रिपोर्ट जाहीर
मुंबई,३० ऑक्टोबर २०२०: यूके मिनिस्टर फॉर इन्व्हेस्टमेंट लॉर्ड गेरी ग्रीमस्टोन यांनी त्यांच्या भारताला देण्यात आलेल्या भेटी दरम्यान भारतीय उद्योग संघाच्या प्रमुखांसह यूके इंडिया बिजनेस काउन्सिलचा डूइंग बिजनेस इन इंडिया २०२० रिपोर्ट जाहीर केला आहे. हा अहवाल यूकेआयबीसीच्या २०१५ पासूनच्या वार्षिक सिरीजमधील सहावा आहे या वर्षीचा अहवाल उत्पादन, सेवा आणि उच्च शिक्षण क्षेत्रात भारतात कार्यरत असलेल्या यूकेच्या १०६ संस्थांच्या सखोल सर्वेक्षणांवर आधारित आहे. सर्वेक्षण केलेल्या व्यवसायांपैकी ६६ टक्के म्हणाले की, समर्थन आणि सेवा प्रदात्यांची उपलब्धता,कुशल कामगार आणि पुरवठा साखळी यांसारख्या भारताच्या व्यावसायिक वातावरणाच्या घटकांमध्ये झालेल्या प्रगतिशील सुधारणा आणि विकासामुळे भारतात व्यवसाय करणे सोपे होत आहे,असा त्यांचा विश्वास आहे.
जयंत क्रिष्णा, सीईओ, युकेआयबीसी ग्रुप म्हणाले की, भारताच्या व्यावसायिक वातावरणाच्या रेटिंगच्या प्रगतीशील ट्रेंड तसेच २०१५ मध्ये यूकेआयबीसीच्या अहवालाच्या स्थापनेपासून व्यवसायातील अडथळे दूर करण्याबरोबरच २०२० च्या आमच्या अहवालाचे निष्कर्ष केवळ सकारात्मकच नाही तर मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणारे देखील आहे.
यूके इंडिया बिजनेस काउन्सिलच्या डूइंग बिजनेस इन इंडिया रिपोर्ट २०२० मधील निष्कर्षानुसार भारतातील व्यवसायाचे वातावरण सुधारित आहे असा यूके व्यवसायांचा विश्वास आहे आणि म्हणूनच ब्रेक्सिट, कोविड-१९, आणि जागतिक आर्थिक मंदी असूनही ते भारत आणि यूके एकत्रित येतील अशी मोठी संधी शोधत आहे. भारतातील आत्मनिर्भर भारत मिशनकडे यूकेतील कंपन्या भारतात अधिक व्यवसाय करण्याची संधी म्हणून बघत आहे जे भारतात उत्पादन वाढविण्यासाठी यूकेच्या नाविन्याचा लाभ घेत आहेत.
Comments
Post a Comment