रुपया प्रगती पथावर असल्याचे जागतिक संकेत

 रुपया प्रगती पथावर असल्याचे जागतिक संकेत


सप्टेंबर २०२० च्या सुरुवातीपासून इतर उदयोन्मुख बाजाराच्या चलनासह रुपयाच्या मूल्यातही १.९ टक्के वाढ दिसून आली आहे. जोखिमीच्या मामत्तांचे मूल्य वाढत असताना, याच कालावधीत डॉलर निर्देशांकात ०.८५ टक्क्यांची घसरण दिसली. अमेरिका सरकारच्या दुस-या प्रोत्साहन पॅकेजसह, लसीच्या तयार होण्याच्या वेगवान हालचालींमुळे गेल्या काही महिन्यात सकारात्मक जागतिक संकेत आले. परिणामी भारतीय रुपयाचे मूल्य वधारले. आगामी कालावधीत रुपयाची प्रगती कशी असेल याबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे संशोधन विश्लेषक श्री वकारजावेद खान.



२०२१ मध्ये भारताचा जीडीपी ८.८ टक्क्यांनी वाढेल: १५ सप्टेंबर रोजी एकाच दिवसात ९७,००० रुग्णांचा आकडा गाठल्यानंतर भारतातील कोरोना विषाणूची रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. रुग्ण कमी होत असतानाच बरे होणा-यांचे प्रमाणही वाढत आहे. सध्या हे प्रमाण ८८.८ टक्क्यांपर्यंत आहे. तथापि, रुग्णांची संख्या वाढत असली तरीही अपेक्षित मागणी २०२१ वित्त वर्षातील दुस-या अर्ध्या वर्षात दिसून येईल.


आयएमएफच्या ताज्या अंदाजानुसार, २०२० मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये १०.३ टक्क्यांची घसरण होईल. जून २०२० मध्ये ४.५ टक्क्यांचा अंदाज वर्तवण्यात आला होता, त्यापेक्षा हे प्रमाण कमी आहे. पहिल्या तिमाहितील देशव्यापी लॉकडाऊनमुळे आर्थिक हालचालीत अपेक्षेपेक्षा जास्त आकुंचन दिसून आले. तरीही अर्थव्यवस्था २०२१ पर्यंत ८.८ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आयएमएफने वर्तवला आहे.


आर्थिक सुधारणेसाठी वित्तीय मदत महत्त्वाची: यूएस फेडच्या बॅलेन्सशीटमध्ये मार्च २०२० मधील ४ ट्रिलियन डॉलरनंतर सप्टेंबर २०२० मध्ये ७ ट्रिलियन डॉलरपर्यंत फुगवटा आल्याचे दिसून येत आहे. यूएस फेडच्या ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत, केंद्रीय बँकांनी पुढील वर्षात व्याजदर शून्यापर्यंत ठेवण्याचे वचन दिले. तथापि, दुसऱ्या कोरोना मदत निधीवर आर्थिक सुधारणेचा खेळ अवलंबून असेल.


जेरोम पॉवेल यांनी सांगितले की, मे २०२० पासून अमेरिकेने अपेक्षेपेक्षा चांगली आर्थिक सुधारणा केली आहे. त्यामुळे आर्थिक मदत न मिळाल्यास पुढील सुधारणेला धोका पोहोचू शकतो.


जागतिक मध्यवर्ती बँकांच्या धोरणानुसारच, आरबीआयनेदेखील आपल्या पतधोरणाबाबत अनुकूल भूमिका कायम ठेवली असून रेपो दर ४ टक्के नोंदवला आहे. तथापि, आरबीआयच्या नव्या पतधोरण बैठकीत केंद्रीय बँकेने कबूल केले की, भारतीय बाजारपेठ २०२१ या वित्त वर्षात ९.५ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.


आऊटलूक: अमेरिकेचे फेड प्रमुख जेरोम पॉवेल यांच्या मते, मे महिन्यापासून अमेरिकेची आर्थिक सुधारणा अपेक्षेपेक्षा चांगली आहे. परंतु अमेरिकेत अद्याप कोव्हिड-१९ ची रुग्णसंख्येत वाढ नोंदली जात असल्याने त्यांनी अधिक वित्तीय मदत पॅकेजसाठी प्रयत्न करण्याची विनंती सिनेटकडे केली आहे. तथापि, या वित्तीय प्रोत्साहनपर पॅकेजच्या चर्चा अनेक दिवस व आठवड्यांपासून सुरू आहेत. येत्या काही दिवसात त्याचे परिणाम येण्याबद्दलही अनिश्चितता आहे.


दरम्यान साथीला सुरुवात झाल्यापासून प्रथमच भारतीय इक्विटी बाजारात एफआयआयचा प्रवाह नकारात्मक दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये भारतीय इक्विटी मार्केटमधून ७७८३ कोटी रुपयांचा आउटफ्लो दिसून आला. तथापि, ऑक्टोबर महिन्यात निव्वळ इनफ्लो १४४१७ कोटी रुपये असा सकारात्मक दिसून आला.


ऑगस्टच्या सुरुवातीपासून ट्रेझरी उत्पादनांमध्ये उच्चांकी हालचाली दिसून येत आहेत. ऑगस्टमध्ये ०.५१५ टक्क्यांच्या तुलनेत सध्याचे उत्पादन ०.८५६ टक्के एवढे आहे. रुपयाचा विचार केल्यास तो भारतीय बाजारातील विदेशी गुंतवणुक प्रवाहावर तसेच कोव्हिड-१९ विषाणूच्या लसीच्या आशावादावर अवलंबून आहे. म्हणूनच युएसडीआयएनआर (सीएमपी: 73.65) हे गुणोत्तर नोव्हेंबर २०२० च्या अखेरपर्यंत लंबकाच्या खालील टोकापासून म्हणजेच ७३ पासून वरील टोकाच्या ७५ आकड्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE