गोदरेज अग्रोवेटतर्फे भरघोस उत्पन्न देणारी ऑइल पाम रोपे लाँच
गोदरेज अग्रोवेटतर्फे भरघोस उत्पन्न देणारी
ऑइल पाम रोपे लाँच
ऑक्टोबर 2020 – गोदरेज अग्रोव्हेटच्या ऑइल पाम प्लँटेशन व्यवसायाने आज नव्या, उच्च दर्जाच्या, भरघोस उत्पन्न देणाऱ्या रोपांचे लाँच करत असल्याचे जाहीर केले असून ही रोपे मलेशियातून आमलेल्या सेमी क्लोनल बियांपासून तयार करण्यात आली आहेत. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील (आंध्र प्रदेश) गोदरेज अग्रोव्हेट फॅक्टरीअंतर्गत शेतकऱ्यांना ही रोपे वितरित करण्यात आली.
ऑइल पाम हे जगातील सर्वात उत्पादनक्षम खाद्यतेल पुरवणारे रोप असून भारतातील वनस्पती तेलाच्या गरजा पुरवण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतं. मात्र, सध्या प्रचलित असलेल्या रोपांची कमी उत्पादनक्षमता (तेरेना हायब्रीड्स) आणि जोडीला कमी पाऊस, दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत नव्हता. नव्या रोपांमुळे या समस्यांवर मात करून भारतातील वनस्पती तेलाची मागणी पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाईल.
सध्याच्या तेरेने रोपांमधे प्रती हेक्टर 34 ते 35 टन्स फ्रेश फ्रुट्स बंचेस (एफएफबी) उत्पादन देण्याची जेनेटिक क्षमता असून नव्या उच्च उत्पादन देणाऱ्या रोपांची क्षमता प्रती हेक्ट 37 ते 38 टन आहे. नव्या जातीचे इतरही फायदे आहेत. उदा. लहान पानं व देठं तोडण्यासाठी सोपी आणि त्यांची लागवडही जास्त कार्यक्षमपणे (सध्याच्या जातीच्या 143 रोपांच्या तुलनेत 148 रोपे) करता येते. त्यांची उंची संथपणे वाढते आणि जास्तीत जास्त 325 सेमीपर्यंत वाढते, तर जुन्या तेरेना हायब्रीड रोपांची उंची लागवडीच्या 11 वर्षांनंतर 390 सोमीपर्यंत वाढते हे लक्षात घेता कापणी सोपी होते.
गोदरेज अग्रोव्हेटच्या ऑल पाम प्लँटेशन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नसिम अली म्हणाले, ‘नैसर्गिक संकटांमुळे तयार होणाऱ्या शेतीविषयक समस्यांचा शेतकऱ्याच्या थेट उत्पन्नावर परिणाम होतो. गेल्या तीन दशकांपासून शेतकऱ्यांना सेवा देण्यात गोदरेज अग्रोव्हेट आघाडीवर आहे आणि अशाचप्रकारे भविष्यातही ती नाविन्यपूर्ण उत्पादने पुरवत राहील. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2020 पर्यंत आंध्र प्रदेशातील 160 ते 170 हेक्टर परिसरात नव्य जातीच्या ऑइल पाम रोपांची लागवड करण्याची आमची अपेक्षा आहे.’
आंध्र प्रदेश सरकारमधील फलोत्पादन आयुक्त, आयएफएस श्री. चिरंजीव चौधरी म्हणाले, ‘ऑइल पामची उच्च त्पादन देणारी सेमी क्लोनल जात लाँच केल्याबद्दल मी गोदरेज अग्रोव्हेटचे अभिनंतन करतो. ही जात आंध्र प्रदेशमधील ऑइल पामचे सर्वात मोठे उत्पादक असलेल्या शेतकऱ्यांना तसेच गोदरेज अग्रोव्हेट पॅन भारतात कार्यरत असल्यामुळे देशभरातील इतर राज्यांतील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल.’
एपी, आयसीएआर- आयआयओपीआरचे संचालक डॉ. आर. के. माथुर म्हणाले, ‘ऑइल पाम हे बारमाही पिक आहे आणि इतर तेलबियांच्या तुलनेत ऑइल पाम लागवडीतून मिळणारे परतावेही जास्त आहेत. गोदरेज अग्रोव्हेटच्या उच्च उत्पादन देणाऱ्या रोपाच्या जातीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि पर्यायाने खाद्य तेल क्षेत्र स्वयंपूर्ण होण्यास हातभार लागेल.’
उच्च उत्पादन देणाऱ्या ऑइल पाम रोपांची नवी जात लवकरच पॅन भारतातील ऑइल पाम शेतकरी आणि उत्पादकांना उपलब्ध केली जाईल व दरम्यान आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळ नाडू, ओडिशा, गुजरात, मिझोरम आणि गोव्यावर भर असेल.
Comments
Post a Comment