आकाश इन्स्टिट्यूटतर्फे त्यांच्या मुख्य ‘एएनटीएचई 2020’ या नॅशनल स्कॉलरशिप परिक्षेच्या नव्या तारखा जाहीर; 12-20 डिसेंबर 2020 दरम्यान परीक्षा होणार

 आकाश इन्स्टिट्यूटतर्फे त्यांच्या मुख्य ‘एएनटीएचई 2020’ या नॅशनल 

स्कॉलरशिप परिक्षेच्या नव्या तारखा जाहीर; 12-20 डिसेंबर 2020   दरम्यान परीक्षा होणार 


25 नोव्हेंबर, 2020- आकाश एड्यूकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल), ही डॉक्टर्स आणि आयआयटीयन्स होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा तयारी सेवेतील राष्ट्रीय अग्रणी संस्था असून देशभरात त्यांची 200 पेक्षा जास्त केंद्रे आहेत. त्यांची ओळख असलेल्या आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम (एएनटीएचई) या वार्षिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अकराव्या वर्षाच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक त्यांनी जाहीर केले.  12-20 डिसेंबर 2020 या 9 दिवसांच्या कालावधीत देशातील 24 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.    

ऑनलाईन परीक्षा या 12-20 डिसेंबर 2020 या दरम्यान (दररोज) दुपारी 12 ते संध्याकाळी 8.30 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहेत. विद्यार्थी या लॉगीन विंडो कालावधीत केव्हाही परीक्षा देऊ शकतात. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून ऑफलाईन परीक्षा 20 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10:30 ते 11:30 वाजता आणि संध्याकाळी 04:00 ते 05:00 वाजता अशा दोन सत्रात घेण्यात येणार आहे.   

सुरुवातीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यावर, आकाश इन्स्टिट्यूटला देशभरातील विद्यार्थी आणि पालकांकडून महासाथीच्या आणि सणासुदीच्या कारणास्तव एएनटीएचई 2020 परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यासंदर्भात असंख्य विनंत्या आल्या. याखेरीज, या काळात अनेक शाळांच्या प्री-बोर्ड परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना एएनटीएचई 2020 ची तयारी करणे अवघड गेले असते. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याच्या आपल्या मूळ तत्त्वाचा आदर करून आकाश इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन एएनटीएचई 2020 च्या वेळापत्रकात सुधारणा केल्याने विद्यार्थ्यांना आता कोणत्याही अडथळ्यांशिवाय परीक्षा देता येईल.   

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी पॅन-इंडिया परीक्षा असलेल्या एएनटीएचईमुळे पात्र विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती मिळविण्याची संधी प्राप्त होते आणि त्यांच्या डॉक्टर्स आणि आयआयटीयन्स होण्याच्या प्रयत्नांतील पहिले पाऊल उचलण्यासाठी मदत मिळते.  2019 साली परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 3.4 लाखांहून जास्त होती. एएनटीएचई 2020 साठी प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही ऑनलाईन परीक्षेच्या तारखेच्या 3 दिवस आधी आणि ऑफलाईन परीक्षेच्या तारखेच्या 7 दिवस आधीची आहे.  परीक्षेचे शुल्क केवळ रुपये 200/- इतकेच असून ते नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्डच्या माध्यमातून किंवा थेट आकाश इन्स्टिट्यूटच्या शाखेत/केंद्रात भरता येऊ येईल.   

एएनटीएचईमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरीटनेशन स्कूल बूस्टर कोर्स विनामूल्य मिळणार असल्याने त्यांना अधिक लाभ मिळणार आहे.  मेरीटनेशन ही एईएसएलची सहाय्यक संस्था आहे.    

परीक्षेचा तपशील 

एएनटीएचई ही एकूण 90 गुणांची परीक्षा असून इयत्ता 7 वी ते इयत्ता 12 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे ज्ञान तपासण्यासाठी त्यात 35 एमसीक्यू पद्धतीचे प्रश्न असतील. 

इयत्ता 7 वी ते 9 वी मधील विद्यार्थांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि मानसिक क्षमता या विषयांवरील परीक्षा घेण्यात येईल.   

मेडिकलला जाऊ इच्छिणाऱ्या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि मानसिक क्षमता या विषयांवरील परीक्षा असेल.  

इंजिनिअरिंगला जाऊ इच्छिणाऱ्या इयत्ता 10 वीतील विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि मानसिक क्षमता हे विषय असतील.  

इयत्ता 11 वी-12 वीत शिकणाऱ्या आणि मेडिकलला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र हे विषय असतील.  

इयत्ता 11 वी-12 वीत शिकणाऱ्या इंजिनिअरिंगला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय असतील.  

सर्वच परीक्षांचा कालावधी 1 तास असेल. 

परीक्षेत नकारात्मक गुण नसतील.  

 इयत्ता 10 वी, 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 4 जानेवारी 2021 रोजी आणि इयत्ता 7 वी, 8 वी आणि 9 वीचा निकाल 2 जानेवारी 2021 रोजी जाहीर होईल.   

इयत्ता 7 वी ते 12 वीतील 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी हे ट्युशन फीवर 100% शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी पात्र असतील. याशिवाय, 700 विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देण्यात येईल.  

सर्वांत जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांखेरीज, एएनटीएचई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार ट्युशन फीवर आकर्षक शिष्यवृत्ती देखील मिळणार आहे.   

आसाम, आंध्रप्रदेश, बिहार, चंडीगड, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल अशा अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा देशव्यापी टॅलेंट हंट घेण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालक किंवा शाळा अधिकाऱ्यांकडून सूचना आल्यास किमान अटींवर कोणत्याही शहरात आणखी एएनटीएचई केंद्रे उघडण्यात येतील असे एएसईएलतर्फे जाहीर करण्यात आले आहे.   

एएनटीएचई 2020 च्या सुधारित वेळापत्रकाविषयी बोलताना आकाश एड्यूकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) चे अध्यक्ष आणि सीईओ श्री. आकाश चौधरी म्हणाले, “एएनटीएचईला गेल्या दहा वर्षात जो प्रतिसाद मिळाला आहे ते पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. आज, मेडिकल किंवा आयआयटीची स्वप्ने बघणाऱ्या महत्त्वाकांक्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी हा देशातील एक सर्वात मोठा मार्ग झाला आहे.  सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी आम्ही आमच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.  जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात भाग घ्यावा यासाठी आम्ही इयत्ता 7-12 वीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत.”

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.