गोदरेज एअरोस्पेस’ने ‘पीएसएलव्ही-सी49’चा वापर करून पृथ्वी निरीक्षण उपग्रह ‘इओएस-01’च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी ‘इस्रो’शी केली भागीदारी

 गोदरेज एरोस्पेसने पीएसएलव्ही-सी49चा वापर करून

पृथ्वी निरीक्षण उपग्रह ओएस-01च्या यशस्वी प्रक्षेपणसाठी इस्रोशी केली भागीदारी

10 नोव्हेंबर2020 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) 7 नोव्हेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रामधून 9 आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या उपग्रहांसह पृथ्वी निरीक्षण उपग्रह, ‘ओएस-01चे यशस्वीरित्या प्रक्षेप केले. या उपग्रहांचे प्रक्षेपण करताना ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (पीएसएलव्ही-सी49) ‘डीएल कॉन्फिगरेशनमध्ये वापरण्यात आले. हे पीएसएलव्हीचे 51 वे उड्डाण होते. विश्वसनीयतेच्या दृष्टीकोनातून ते त्याच्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट प्रक्षेपकांपैकी एक असल्याचे सिद्ध झाले.

याप्रसंगी बोलताना गोदरेज एरोस्पेसचे कार्यकारी उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख एस. एम. वैद्य म्हणाले, “ओएस-01 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनातून यशस्वीपणे करण्याच्या मोहिमेत इस्रोसह आम्ही सहभागी होतोयाचा आम्हाला मोठा अभिमान वाटतो. या उपग्रहाचा उपयोग कृषीवनीकरण व आपत्ती व्यवस्थापन या कामांमध्ये होणार आहे. या प्रक्षेपणात रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्यात वापरण्यात आलेल्या विकास इंजिनाच्या उत्पादनात गोदरेज सहभागी होती. हे प्रक्षेपण खूपच खास व असामान्य होतेकारण कोविड-19चा उद्रेक झाल्यानंतरचे हे पहिलेच प्रक्षेपण होते. वेळेची अंतिम मुदत गाठण्यासाठी आम्हाला अनेक अडचणींवर मात करावी लागली. भारताच्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये हातभार लावू शकत असल्याबद्दल गोदरेजमध्ये आम्ही खूपच रोमांचित झालो आहोत आणि इस्रोच्या भावी मोहिमांमध्ये आमचा सहभाग वाढण्याच्या प्रतीक्षेत आहोत.

पीएसएलव्ही  जीएसएलव्ही रॉकेटसाठी लिक्विड प्रोपल्शन इंजिन’, ‘उपग्रहांसाठी थ्रस्टर आणि अॅन्टीना सिस्टम यासारख्या जटिल प्रणालींच्या उत्पादनात गोदरेज एरोस्पेस कंपनी इस्त्रोरोबर गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सहभागी आहे. गोदरेज एरोस्पेसने प्रतिष्ठित चंद्रयान आणि मंगलयान मोहिमांमध्येही अविभाज्य भूमिका बजावलेली आहे. गोदरेज अँड बॉयस मॅन्यु. कंपनी लि.’ ही भारताच्या अंतराळ मोहिमांमध्ये स्वदेशी उत्पादनात सहभागी होण्यास कटिबद्ध आहेभारताच्या तांत्रिक पराक्रमाला चालना देण्यासाठी हे महत्वपूर्ण आहे.

गोदरेज अँड बॉयस मॅन्यु. कंपनी लि.विषयी :

गोदरेज अँड बॉयस (जी अँड बी’)  ही गोदरेज समुहातील कंपनी 1897 मध्ये स्थापन झाली होती. तिने मॅन्युफॅक्चरिंगच्या माध्यमातून भारताच्या स्वावलंबनाच्या प्रवासात मोलाचे योगदान दिले आहे. जी अँड बीने जगातील पहिल्या स्प्रिंगविरहीत कुलुपाचे पेटंट मिळवले. तेव्हापासून ती सुरक्षाफर्निचरएअरोस्पेस ते इन्फ्रास्ट्रक्चर व संरक्षण अशा विविध क्षेत्रांतील 14 व्यवसायांमध्ये कार्यरत आहे. गोदरेज हा भारताचा सर्वात विश्वासार्ह ब्रांड आहे. दररोज जगभरातील 1.1 अब्ज ग्राहकांना तो सेवा देत आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202