टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी तयार केले अराईव्ह (A.R.I.V.E) ऍप

टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी तयार केले अराईव्ह (A.R.I.V.E) ऍप
दुचाकी व तीनचाकी गाड्यांची जगातील आघाडीची उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने टीव्हीएस अराईव्ह (A.R.I.V.E) हे नवीन मोबाईल ऍप्लिकेशन तयार केले आहे. दुचाकी वाहनांच्या उपयोगासंदर्भात ग्राहकांना परिवर्तनशील अनुभव मिळवून देणे हा कंपनीचा यामागचा उद्देश आहे. ऑगमेंटेड रिऍलिटी इंटरॅक्टिव्ह वेहिकल एक्सपीरियन्स (A.R.I.V.E) या ऍपच्या मदतीने घरी सुरक्षित व आरामात राहून ऑगमेंटेड रिऍलिटी तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादनाविषयी सखोल माहिती घेणे आणि खरेदीचा पुरेपूर अनुभव घेता येतो. या उद्योगक्षेत्रातील हे अशाप्रकारचे पहिलेच ऍप असून यामुळे ग्राहकांना सर्वसमावेशक अनुभव मिळेल आणि आपल्या ग्राहकांसोबत सतत संपर्कात राहण्यासाठीचे कंपनीचे प्रयत्न या अनोख्या प्लॅटफॉर्ममार्फत अधिक प्रभावी बनतील. कंपनीची प्रमुख मॉडेल्स टीव्हीएस अपाचे आरआर३१० आणि टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही सोबत एका मोड्युलसह टीव्हीएस अराईव्ह (A.R.I.V.E) ऍप पदार्पण करेल. टीव्हीएस मोटर कंपनीच्या टेक सॅव्ही ग्राहकांना याचा खूप फायदा मिळणार आहे. त्यापाठोपाठ टीव्हीएस उत्पादनांची संपूर्ण श्रेणी यामध्ये समाविष्ट केली जाईल. या ऍपमध्ये प्रत्येक उत्पादनासाठी एक स्वतंत्र मोड्यूल आहे, युजर्स आपल्या आवडीनिवडी आणि इच्छेनुसार ते डाउनलोड करू शकतात. प्रत्येक मोड्यूलची तीन वेगवेगळ्या मोड्समध्ये विभागणी करण्यात आली आहे - प्लेस टू एक्स्प्लोर (एआरवर आधारित), स्कॅन अ रिअल बाईक (एआरवर आधारित) आणि थ्रीडी मोड (नॉन-एआर कॉम्पॅटिबल डिव्हायसेससाठी). यापैकी प्रत्येक मोडमध्ये विविध हॉटस्पॉट्स आहेत, ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा ग्राहक उपयोग करून घेऊ शकतात, यामध्ये गाडीची संपूर्ण एक्सरे व्हिजन, तपशीलवार माहिती, व्हिडिओ, ऍनिमेशन्स आणि इतरही अनेक गोष्टींचा समावेश आहे. प्रत्येक ग्राहकापर्यंत जोडले जात यावे यासाठी या ऍपमध्ये सेल थ्रू प्रोसेसचा देखील पर्याय आहे. हा पर्याय निवडून ग्राहक टेस्ट राईड बुक करू शकतात, आपल्या जवळच्या डीलरचा पत्ता जाणून घेऊ शकतात आणि आपली आवडीची गाडी ऑनलाईन बुक देखील करू शकतात. टीव्हीएस मोटर कंपनीचे प्रीमियम मोटरसायकल्स (मार्केटिंग) विभागाचे प्रमुख श्री. मेघश्याम दिघोले यांनी सांगितले, "आपल्या सर्व उत्पादनांमध्ये आणि सेवांमध्ये अत्याधुनिक, सुधारित तंत्रज्ञान सादर करण्यात टीव्हीएस मोटर कंपनी नेहमीच आघाडीवर असते. याच धोरणानुसार आम्ही आता टीव्हीएस अराईव्ह ऍप घेऊन आलो आहोत. आमच्या ग्राहकांना आता एआर तंत्रज्ञानामार्फत घरी राहून आमच्या उत्पादनांची इत्यंभूत माहिती मिळवता येणार आहे. आमची प्रमुख मॉडेल्स टीव्हीएस अपाचे आरआर३१० आणि टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही सोबत आम्ही हे ऍप सादर करत आहोत. या ऍपमुळे ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि टेस्टिंग किंवा खरेदी करण्याचा निर्णय यातील अंतर नाहीसे होणार आहे कारण ऑगमेंटेड रिऍलिटी तंत्रज्ञानामार्फत ऑडिओ-व्हिज्युअल व टेक्सट्यूअल फॉरमॅट्सचा वापर करून उत्पादनाचा संपूर्ण अनुभव ग्राहकांना या ऍपमध्ये मिळवता येईल. आम्हाला खात्री आहे की, आमच्या या नवीन सेवेमुळे आमच्या संभावित व सध्याच्या ग्राहकांना अतिशय उत्तम मूल्य मिळेल." युजर्सना सर्वसमावेशक अनुभव मिळावा यासाठी या ऍपवर उपलब्ध असलेल्या तीन मोड्समध्ये काही विशिष्ट सुविधा उपलब्ध करवून देण्यात आल्या आहेत. प्लेस टू एक्स्प्लोर मोडमध्ये एआर विश्वात गाडीचे व्हर्च्युअल थ्रीडी मॉडेल तयार करून वास्तविक गाडीचा ऑगमेंटेड अनुभव निर्माण केला जातो. हे व्हर्च्युअल वाहन कोणत्याही आडव्या सपाट पृष्ठभागावर ठेवले जाऊ शकते, यामुळे युजरला त्याच्या अवतीभवती फिरून ते सगळ्या बाजूंनी पाहता येते किंवा ते स्क्रीनवर फिरवून पाहण्यासाठी स्वाईप जेस्चर्सचा वापर करता येतो. युजर्स झूम इन आणि आऊट सुविधांचा वापर करू शकतात किंवा कॅमेरा पृष्ठभागाच्या अगदी जवळ नेऊन अधिक सुस्पष्ट व गहन दृश्य पाहू शकतात. स्कॅन अ रिअल बाईक मोडमध्ये खऱ्या वस्तू आणि एआर यांचा मिलाप आहे. डिव्हाईस खऱ्या गाडीच्या समोर धरून युजर्स ती स्कॅन करू शकतात. डिटेक्ट झाल्यानंतर गाडीची विविध वैशिष्ट्ये त्यावर हॉटस्पॉट्स पल्सेटिंग होऊन आपोआप हायलाईट होऊ लागतील. त्यावर टॅप करून युजर्सना त्या-त्या वैशिष्ट्यांचे काम कसे चालते याचे एक्स-रे व्हिजन मिळते आणि दृक-श्राव्य व मजकूर स्वरूपात तपशीलवार माहिती देखील पुरवली जाते. थ्रीडी मोड हा एआर आणि एआरला कॉम्पॅटिबल नसलेल्या सर्व डिव्हायसेससाठी उपलब्ध आहे. नॉन-एआर डिव्हायसेसमध्ये फक्त थ्रीडी मोड फंक्शनॅलिटी मिळते त्यामध्ये युजर्सना वाहन संपूर्णपणे फिरवून पाहता येणे, झूम इन व आऊट सुविधा याद्वारे अधिक चांगला दृश्य अनुभव मिळवता येतो. मोटरसायकलची महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी युजर्स पल्सेटिंग हॉटस्पॉटवर क्लिक करून आयकॉन सक्रिय करू शकतात. यामुळे त्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये दिसू लागतात व दृक-श्राव्य व मजकूर स्वरूपात तपशीलवार माहिती देखील पुरवली जाते. या पर्यायामुळे अधिक सुधारित अनुभव पुरवला जाण्यासाठी उपयुक्त पार्श्वभूमी निर्माण होते. याठिकाणी युजर कॅमेरा ऑप्शन वापरून वाहनाचा एरियल व्ह्यू देखील पाहू शकतात. हे ऍप गूगल प्लेस्टोर आणि ऍपल ऍप स्टोरवर उपलब्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE