ब्ल्यू डार्टने आपल्या ३७व्या वर्धापनदिनानिमित्त लाँच केले ‘माय ब्ल्यू डार्ट अॅप’

ब्ल्यू डार्टने आपल्या ३७व्या वर्धापनदिनानिमित्त लाँच केले ‘माय ब्ल्यू डार्ट अॅप’


~ गुगल प्ले आणि अॅपल स्टोअरवर उपलब्ध ~

~ अॅपद्वारे जीपीएस लोकेशन फाइंडर, एडब्ल्यूबीजसाठी बार कोड स्कॅनिंग, नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी विनंती केल्यास पिक-अप सेवा, केवळ एक बटन दाबून, वापरता येणार ~


भारतातील आघाडीची एक्स्प्रेस लॉजिस्टिक सेवा पुरवणारी कंपनी ब्ल्यू डार्ट कायमच तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून नवोन्मेषकारी सेवा देत आली आहे. नवोन्मेष आणि ग्राहककेंद्री धोरण यांमध्ये बाजारपेठेतील आघाडीची कंपनी म्हणून असलेल्या आपल्या कौशल्याचा लाभ घेत ब्ल्यू डार्ट पार्ट ऑफ द डॉइश पोस्ट डीएचएल ग्रुपने (डीपीडीएचएल) आपले आत्तापर्यंतचे पहिलेच ग्राहक अॅप ‘माय ब्ल्यू डार्ट अॅप’ लाँच केले आहे. ग्राहकांना सहजपणे एका ठिकाणी टेलर्ड सोल्युशन्स पुरवण्याच्या उद्देशाने हे अॅप विकसित करण्यात आले आहे. ‘माय ब्ल्यू डार्ट अॅप’ सध्या गुगल प्ले आणि अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. 


ब्ल्यू डार्टने १९८३ मध्ये झालेल्या स्थापनेपासून स्वत:ला भारतातील आघाडीची लॉजिस्टिक कंपनी म्हणून यशस्वीरित्या प्रस्थापित केले आहे. याचे श्रेय ब्रॅण्डच्या समृद्ध वारशाला तसेच ३७ वर्षांच्या अनुभवाला दिले जाते. अविश्रांत ग्राहककेंद्री सेवा आणि सातत्यपूर्ण नवोन्मेष यांच्या जोरावर ब्रॅण्डने हा वारसा व आणि अनुभव उभा केला आहे. नव्याने लाँच झालेले अॅप हे ब्ल्यू डार्ट व्यवसायात डिजिटल नवोन्मेष आणण्यासाठी सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांचे यशस्वी प्रतीक आहे तसेच लॉजिस्टिक्स व हवाईवाहतूक उद्योगातील आघाडीचे स्थान टिकवून ठेवण्याच्या कंपनीच्या प्रयत्नातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे.


ब्ल्यू डार्टचे सीआयओ श्री. मनोज माधवन या अॅपच्या लाँचबद्दल म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बाजारपेठेमध्ये आघाडीचे स्थान असलेली ब्ल्यू डार्ट ग्राहकाला अधिक चांगला अनुभव देण्यासाठी कायम प्रयत्नशील असते आणि त्याचबरोबर देशभरात नेहमीच वक्तशीर व अखंडित डिलिव्हरीज दिल्या जातील हे निश्चित करते. ‘माय ब्ल्यू डार्ट अॅप’द्वारे आमची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, तर मूल्यविधान आणखी भक्कम झाले आहे. आमच्या यूजर-फ्रेण्डली, सुरक्षित आणि खात्रीशीर मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे आता ग्राहक या अॅपच्या माध्यमातून कधीही आणि कोठूनही केवळ एका बटनावर क्लिक करून आपली शिपमेंट ट्रॅक करू शकतील, नजीकचे ब्ल्यू डार्ट स्टोअर लोकेट करू शकतील किंवा सर्वोत्तम दरांबद्दल जाणून घेऊ शकतील. सर्वसमावेशक फीचर्स आणि वापरातील सुलभता यामुळे हे अॅप ग्राहकांसाठी त्यांच्या सर्व लॉजिस्टिक्सविषयक आवश्यकतांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने परिपूर्ण प्लॅटफॉर्म ठरेल.” 


ब्ल्यू डार्टच्या व्यवसाय विकास विभागाचे प्रमुख व सीएमओ केतन कुलकर्णी म्हणाले, “ग्राहककेंद्रित्व हा कायम आमचा मुलभूत पाया राहिला आहे. आम्ही प्रणाली, तंत्रज्ञान यांच्यात सातत्याने सुधारणा करत राहतो आणि ‘भारतातील सर्वांत नवोन्मेषकारी व पुरस्कारप्राप्त एक्स्प्रेस लॉजिस्टिक कंपनी’ हे स्थान कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो. ‘माय ब्ल्यू डार्ट अॅप’ हे ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या प्रवासातील आणखी एक पाऊल आहे. ब्ल्यू डार्टने व्यवसायातील सर्व कसोटीच्या कालखंडांतून यशस्वीरित्या मार्ग काढला आहे आणि आपल्या सर्व संबंधितांसाठी शाश्वत मूल्य निर्माण केले आहे. आम्हाला हा टप्पा गाठता आला, तोही आमच्या ३७व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने, याचा आम्हाला खूपच आनंद वाटतो. डिजिटायझेशनच्या उंचीवरून आम्ही करत असलेला प्रवास दीर्घ राहिला आहे. अनेक बाबींचा पाया आम्ही घातला आहे. ब्ल्यू डार्टने, डीपीडीएचएल ग्रुपचा एक भाग म्हणून, ग्रुपच्या ‘स्ट्रेटेजी २०२५ - डिलीव्हरिंग एक्सलन्स इन अ डिजिटल वर्ल्ड’ या ग्रुपच्या धोरणाशी स्वत:ला जोडून घेत स्थापन केलेल्या सुवर्ण मानकाला प्राप्त झालेली ही पावती आहे. ग्राहक अॅपचे स्वागत करतील आणि याद्वारे आम्ही देत असलेल्या अजोड अनुभवाची प्रसंशा करतील, याबाबत आम्ही आशावादी आहोत.”


हे अॅप्लिकेशन ग्राहकाला त्याच्या सर्व लॉजिस्टिक आवश्यकता केवळ ५ सुलभ व प्रभावी पर्याय वापरून लवचिकतेने पूर्ण करण्याची मुभा देते: 

ट्रॅक डार्ट - यामुळे ग्राहकाला त्याची शिपमेंट कधीही, कोठूनही ट्रॅक करणे शक्य होते. वापरकर्ते मॅन्युअल पद्धतीने एडब्ल्यूबी बिलात न जाता केवळ कॅमेरा वापरून बारकोड स्कॅन करू शकतात. 

लोकेशन फाइंडर - या फीचरचा लाभ म्हणजे ग्राहकाला जीपीएस फाइंडरद्वारे आमच्या देशभरातील १४,०००हून अधिक लोकेशन्समधून त्याच्या सर्वांत नजीकचे ब्ल्यू डार्ट स्टोअर शोधून काढता येते. 

ट्रान्झिट प्राइस अँड प्राइस फाइंडर - शिपमेंट पाठवताना/प्राप्त करताना ग्राहकाला सर्वोत्तम दर शोधून काढण्यात मदत करणारी ही यूजर-फ्रेण्डली पद्धत आहे. 

शेड्युल अ पिकअप - हे आमच्या नोंदणीकृत क्रेडिट ग्राहकांना लॉगइननंतर उपलब्ध होणारे विशेष फीचर आहे. 

काँटॅक्ट अस - ग्राहकांना आमच्या खात्रीशीर, प्रतिसादक्षम आणि स्थितीस्थापक व कोणत्याही समस्येवर उपाय शोधून देण्यास उत्सुक अशा ब्ल्यू डार्टर्सशी संपर्क साधण्यासाठी हे फीचर आहे. 


डीपीडीएचएल ग्रुपच्या ‘स्ट्रॅटेजी- ट्वेंटीट्वेंटीफाइव्ह- डिलिव्हरिंग एक्सलन्स इन अ डिजिटल वर्ल्ड’ या धोरणाचा भाग म्हणून, ब्ल्यू डार्टने डिजिटल आघाडीवर अनेक उपक्रम सुरू केले आहेत, विशेषत: सध्याच्या साथीच्या काळात ग्राहकांचा ब्रॅण्डवरील विश्वास नव्याने वाढवण्यासाठी हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या नियमांचे पालन करत ब्ल्यू डार्टने काँटेक्ट लेन्स डिलिव्हरी सुविधा आपल्या पुरस्कारप्राप्त डोअर-टू-डोअर एक्स्प्रेस पिक-अप आणि डिलिव्हरी सेवा सुरू ठेवली आहे. यामुळे ग्राहकांना साथीची भीती न वाटता सामान पाठवणे किंवा प्राप्त करणे सोपे होईल. याशिवाय ब्ल्यू डार्टचा अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) इंटिग्रेशन बेस्ड सोल्युशन्समध्ये सातत्याने सुधारणा केली जाते आणि पिक-अपपूर्व टप्प्यापासून ते पोस्ट-डिलिव्हरी टप्प्यापर्यंत पुरवठा साखळी स्वयंचलित व अखंडित राहावी हे निश्चित करण्यासाठी तपशीलवार काळजी घेतली जाते. ब्ल्यू डार्टने ग्राहकांना स्वीकारार्ह पेमेंट मोड्सचे विस्तृत पर्याय दिले आहेत. यांमध्ये १४ डिजिटल वॉलेट्स, क्रेडिट व डेबिट कार्डस्, भारत क्यूआर कोड आणि यूपीआय (भिम) यांचा समावेश आहे. 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth