नवीन वर्षात आर्थिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठीचे ५ मार्ग

 नवीन वर्षात आर्थिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठीचे ५ मार्ग

नवीन वर्षाचे आगमन लवकरच होत आहे. संवत दिनदर्शिकेनुसार, दिवाळी हीच नवीन वर्षाची सुरुवात असते किंवा संवत २०७७ ची सुरुवात असते. या किंवा त्या मार्गाने, आर्थिक आरोग्याच्या दृष्टीने ही सुरुवात महत्त्वाची असते. त्यातच सध्याच्या परिस्थितीत तयारी ही यशाची गुरुकिल्ली आहे. या नवीन वर्षात आर्थिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठीच्या पाच मार्गांबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सिनियर इक्विटी रिसर्च अॅनलिस्ट श्री. जयकिशन परमार.

१. बजेटचे नियोजन करण्याला प्राधान्य द्या: स्प्रेडशीटची पद्धत काहीशी संकुचितपणाची वाटू शकते, मात्र अर्थव्यवस्थापनात चतुर असलेले लोक ही पद्धत अवलंबतात. गुंतवणूक करताना किंवा इतर गोष्टींसाठी पैसे शिल्लक ठेवण्यासाठी प्रत्येकाला मार्गदर्शनाची गरज असते. विशिष्ट मापदंडानुसार काही गोष्टी ठरवणे, त्या चौकटीत टिकून राहणे , हे वैयक्तिक आर्थिक नियोजनातील खर्च व बचत या दुहेरी घटकांतील संतुलन मिळवून देते. थोडक्यात, बजेटनुसार काम केल्याने तुमचे पुढील नियोजन कसे असेल, ते तुम्हालाच ठरवता येईल. एकूणच, बजेट निश्चित करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही हिशोबशीर निर्णय घ्याल आणि संयमित मार्गाने चालाल.

२. अनिश्चित घटनांसाठी इमर्जन्सी फंड तयार करा: २०२० हे वर्ष जगभरात प्रत्येकासाठी प्रचंड उलाढालीचे ठरले. नव्या वर्षात ही संकटे कदाचित दूर होतील किंवा नाही होणार. यासाठी आपण काही करू शकणार नाहीत. पण आगामी वर्षात गोष्टी अधिक चांगल्या गोष्टी घडतील, अशी आशा करू शकतो.

या काळात, इमर्जन्सी फंड हा कोणत्याही धोरणातील प्रथमबिंदू असला पाहिजे. अशा स्थितीला तोंड देताना नेहमीच अडचणी येतात. त्यामुळेच आधीच तयारी करून ठेवण्याचा दृष्टीकोन ठेवल्याने अशा अडथळ्यांना सामोरे जाण्यास मदत होईल. या काळात, इमर्जन्सी फंड हा कोणत्याही धोरणातील प्रथमबिंदू असला पाहिजे. अशा स्थितीला तोंड देताना नेहमीच अडचणी येतात. त्यामुळेच आधीच तयारी करून ठेवण्याचा दृष्टीकोन ठेवल्याने अशा अडथळ्यांना सामोरे जाण्यास मदत होईल.

अशा वेळी, स्वत:साठी गुंतवणूक करणे, तुमच्यासमोर भविष्यात उभ्या राहणा-या अडथळ्यांच्या दृष्टीने कधीही उउपयुक्तच ठरणार आहे. तुम्ही ट्रेडिंग करत नसाल तर ते शिकून घ्या. तुम्ही शेअर बाजारात आधीच गुंतवणूक कररत असाल तर, पायथॉन किंवा आर या क्रॅश कोर्ससाठी प्रवेश घ्या. तसेच अल्गो-ट्रेडिंग यासारख्या नव-नवीन संकल्पनांबद्दल सखोल माहिती मिळवा. प्रोग्रामिंगच्या ज्ञानासह किंवा ज्ञानाशिवाय अल्गो-ट्रेडिंग धोरण कसे आखतात, हे समजून घ्या.

३. तुमच्यासोबत अखेरपर्यंत राहतील, अशा मालमत्तांमध्ये पैसे गुंतवा: २०२० हे वर्ष चांगल्यासाठीच बदलले आहे. या काळातून काही संकेत मिळाले तर साथीनंतरचे जीवन पूर्वीसारखे कधीच नसेल. कदाचित नोकऱ्यांची स्थिती वेगळी असेल, कारण अनेक पैलू बदलले आहेत. यातील काही स्थिती तशीच राहिल तर काहींमुळे भविष्य आकारास येईल, नोक-या आणि गुंतवणुकीचे स्वरुपही बदलेल.

अशा वेळी, स्वत:साठी गुंतवणूक करणे, तुमच्यासमोर भविष्यात उभ्या राहणा-या अडथळ्यांच्या दृष्टीने कधीही उपयुक्तच ठरणार आहे. तुम्ही ट्रेडिंग करत नसाल तर ते शिकून घ्या. तुम्ही शेअर बाजारात आधीच गुंतवणूक कररत असाल तर, पायथॉन किंवा आर या क्रॅश कोर्ससाठी प्रवेश घ्या. तसेच अल्गो-ट्रेडिंग यासारख्या नव-नवीन संकल्पनांबद्दल सखोल माहिती मिळवा. प्रोग्रामिंगच्या ज्ञानासह किंवा ज्ञानाशिवाय अल्गो-ट्रेडिंग धोरण कसे आखतात, हे समजून घ्या.

४. तुमचा पैसा गुंतवा आणि दीर्घकालीन ध्येय गाठा: अनेकांसाठी गुंतवणूक म्हणजे संपत्ती निर्माण करणे होय. पण यापेक्षाही गुंतवणुकीद्वारे बरेच काही साध्य करता येते. यामुळे आपण प्रेरणादायी, आशादायी बनतो व भविष्य सुरक्षित राहते. गुंतवणुकीमुळे आपली मालमत्ता अनेक पटींनी वाढते तसेच आपल्या जबाबदा-या कमी होतात. तुम्ही बचत केलेले पैसे मोठ्या रकमेत वाढणार नाहीत. पण तुम्ही गुंतवणूक केलेल्या भांडवलात निश्चित बदल दिसेल.

म्हणूनच, आयुष्याच्या सुरुवातीलाच, स्मार्ट गुंतवणुकीचा निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला आणखी एक उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो व तुम्हाला हवी तेव्हा आर्थिक मदत मिळते.

५. आत्ता आणि लगेच कृती करा: एका क्षणासाठीही असे समजू नका की गोष्टी जशा आहेत तशाच घडतील. कारण पुढील आर्थिक वर्ष सध्यापेक्षा खूप वेगळे असू शकते. आर्थिक शिस्तीसारख्या गोष्टी आपोआपच घडत नसतात. तुम्हाला त्या जाणीवपूर्वक घडवून आणाव्या लागू शकतात. ज्या क्षेत्रात अधिक सुधारणेची गरज असते, तिथे सजगतेने मेहनत घ्यावी लागेल. सुरुवात करणा-यांनी दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टींवर विचार केला पाहिजे. आपला खर्च आणि बचत करण्याची सवय. आपल्या खर्चाचे मूल्यांकन करा आणि अनावश्यक तसेच टाळण्यासारख्या गोष्टींना दूर सारा. किराणा सामान, मनोरंजन, गॅस आणि अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये बचत करायला सुरुवात करा.

मॉर्टेज, भाड्याची बिले तसेच उपयुक्त गोष्टींवरील खर्च कपात करता येत नाही. तरीही तुमचे मासिक क्रेडिट आणि बँकिंग स्टेटमेंट सतत तपासून पाहत, त्यानुसार कृती करा. यामुळे तुम्ही कुठे खर्च करत आहात आणि कुठे कपात करू शकता, याचे स्पष्ट चित्र दिसेल. तात्पर्य असे की, आपल्याला आर्थिक गोष्टींचे पुन्हा विश्लेषण करावे लागेल. आपला बजेटचा प्लॅन योग्य पद्धतीने आखावा लागेल, क्रेडिटवर बारकाईने लक्ष द्यावे लागेल आणि यानंतर योग्य कृती करावी लागेल. त्यामुळे २०२१ हे नवे वर्ष किंवा २०७७ हे संवत आपल्या अपेक्षेनुसार सुखकर होण्यास मदत होईल.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24