जीएएसआयटीआयने महामारीदरम्यान नोंदवला सहभागाचा विक्रम
जीएएसआयटीआयने महामारीदरम्यान नोंदवला सहभागाचा विक्रम
· लॉकडाऊन कालावधीदरम्यान १४० ई-ट्रेनिंग उपक्रमांचे आयोजन
· १५००० हून अधिक सहभागींची नोंदणी
२६ नोव्हेंबर २०२०: जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (जीएसआयटीआय) ही प्रमुख भू-वैज्ञानिक प्रशिक्षण संस्था मागील ४४ वर्षांपासून प्रशिक्षण देत आहे आणि संस्थेचे मुख्यालय हैद्राबादमध्ये आहे. या संस्थेने कोरोना महामारीच्या काळात, म्हणजेच एप्रिल ते ऑक्टोबर २०२० दरम्यान १४० ई-लर्निंग प्रशिक्षणांमध्ये १५००० हून अधिक सहभागींनी सहभाग घेण्याचा विक्रम केला आहे. तुलनेत कोरोना काळापूर्वी वर्षभरात सहभागींची संख्या ३००० ते ५००० दरम्यान होती.
गेल्या काही वर्षांमध्ये फॉलो केले जात असलेल्या ट्रेण्डमुळे जीएसआयटीआय सहभागींची कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण राबवत आले आहे. ज्यामुळे सहभागींना दीर्घकाळापर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करण्यास मदत होईल.
सहभागींमध्ये जीएसआयच्या स्वत:च्या कर्मचा-यांसोबत केंद्र सरकार विभाग जसे एएमडी, आयबीएम इत्यादी, पीसीयूज जसे सीआयएल, ओएनजीसी, ओआयएल, एमईसीएल, एनएमडीसी इत्यादी, राज्य डीजीएम व इतर राज्य सरकार संस्था आणि अनेक शैक्षणिक संस्थांमधील भूवैज्ञानिकांचा समावेश आहे.
जीएसआयटीआयने खाण मंत्रालयाच्या निर्देशांनुसार आयआयटी, एनआयटी, केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे आणि महाविद्यालयांसह विविध शैक्षणिक संस्थांचे प्राध्यापकवर्ग/ संशोधन विद्वान/ पीजी व पोस्ट पीजी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठीएक विशेष मोहीम देखील हाती घेतली आहे.आतापर्यंत भारतभरातील २४३ शैक्षणिक संस्थांना विविध भौगोलिक विषयांवर३० ऑनलाइन प्रशिक्षणे देण्यात आली आहेत. सहभागींमध्ये प्राध्यापक, संशोधन विद्वान, पीजी व पोस्ट पीजीविद्यार्थ्यांचा समावेश आहे.
Comments
Post a Comment